"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

🛡 ★ 02. मार्च ★ 🛡

🔻====●●●★●●●====🔻
★हा या वर्षातील ६१ वा (लीप वर्षातील ६२ वा) दिवस आहे.

    ~*🔺महत्त्वाच्या घटना 🔺*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००१ : मध्य अफगाणिस्तानातील बामिया शहराजवळ प्राचीन आणि अमूल्य ठेवा असलेल्या सुमारे ६,००० बुद्ध मूर्ती धर्मबाह्य ठरवून मूलतत्त्ववादी तालिबानने उखळी तोफा आणि रणगाड्यांच्या साहाय्याने उद्‍ध्वस्त करण्यास सुरूवात केली.
●१९६९ : फ्रेन्च बनावटीच्या ’कॉन्कॉर्ड’ या पहिल्या स्वनातीत (ध्वनीपेक्षा अधिक वेगाने जाणार्‍या) विमानाचे यशस्वी उड्डाण
●१९७८ : स्वित्झर्लंडमधील दफनभूमीतुन चार्ली चॅप्लिनची शवपेटिका चोरीला गेली.
●१९५२ : पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते सिंद्री येथील खत कारखान्याचे उद्‍घाटन
●१९०३ : ’मार्था वॉशिंग्टन हॉटेल’ हे फक्त महिलांसाठी असलेले जगातील पहिले हॉटेल न्यूयॉर्क मधे सुरू झाले.
●१८५७ : जे. जे. स्कूल ऑफ आर्टस सुरू झाले

    ~*★जन्मदिवस / जयंती★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९३१ : राम शेवाळकर – मराठी साहित्यिक (मृत्यू: ३ मे २००९)
◆१९३१ : मिखाईल गोर्बाचेव्ह – सोविएत संघाचे शेवटचे अध्यक्ष आणि नोबेल पारितोषिक विजेते
◆१९२५ : शांता जोग – चित्रपट  रंगभूमीवरील अभिनेत्री
◆१७४२ : विश्वासराव – पानिपतच्या र्‍या युद्धात मारले गेलेले नानासाहेब पेशव्यांचे ज्येष्ठ चिरंजीव

     ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
 🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९९४ : पं. श्रीपादशास्त्री जेरे – धर्म व अध्यात्माचे गाढे अभ्यासक, करवीरभूषण, वेदशास्त्रसंपन्न
●१९८६ : डॉ. काशिनाथ घाणेकर – मराठी रंगभूमी आणि चित्रपटातील अभिनेते
●१९४९ : सरोजिनी नायडू – प्रभावी वक्त्या, कवयित्री व स्वातंत्र्यसेनानी, रौलेट कायदा, मॉन्टेग्यू - चेम्सफर्ड सुधारणा, खिलाफत चळवळ, साबरमती करार, असहकार आंदोलन यांत त्यांचा सक्रिय सहभाग होता. (जन्म: १३ फेब्रुवारी १८७९)
●१९३० : डी. एच. लॉरेन्स – इंग्लिश कादंबरीकार, कवी, नाटककार, टीकाकार आणि चित्रकार
●१७०० : मराठा साम्राज्याचे तिसरे छत्रपती राजाराम महाराज यांचे सिंहगडावर निधन
(जन्म: २४ फेब्रुवारी १६७०)
●१५६८ : मीरा रत्‍नसिंह राठोड ऊर्फ संत मीराबाई 

No comments:

Post a Comment