"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

🛡 ★ 02. ऑक्टोबर ★ 🛡

🔻====●●●★●●●====🔻
★जागतिक अहिंसा दिन
★हा या वर्षातील २७५ वा (लीप वर्षातील २७६ वा) दिवस आहे.
★महात्मा गांधी जयंती
★लाल बहादूर शास्त्री जयंती
★बालसुरक्षा दिन
★स्वच्छता  दिन
★गिनीचा स्वातंत्र्यदिन

                   ~*★ मृत्यू / पुण्यतिथी ★*~
                 🔹•••°°~°°°••◆••°°°~°°•••🔹
●२००६ : निकेल माइन्स, पेनसिल्व्हानिया येथे चार्ल्स कार्ल रॉबर्ट्सने आमिश शाळेत पाच शाळकरी मुलींना गोळ्या घालून ठार मारले व नंतर आत्महत्या केली.
●१९६९ : महात्मा गांधींच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून त्यांची प्रतिमा व सही असलेल्या २, ५, १० व १०० रुपयांच्या नोटा रिझर्व्ह बँकेने जारी केल्या.
●१९५८ : गिनीला (फ्रान्सपासुन) स्वातंत्र्य मिळाले.
●१९५५ : पेरांबूर येथे ’इन्टिग्रल कोच  याने पहिल्या दूरदर्शन संचाचे प्रात्यक्षिक दाखवले.
●१९०९ : रमाबाई रानडे यांनी पुणे सेवासदन सोसायटीची स्थापना केली.

                  ~*★ जन्मदिवस / जयंती ★*~
               🔸•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔸
◆१९४२ : आशा पारेख – चित्रपट अभिनेत्री
◆१९२७ : पं. दिनकर कैकिणी – शास्त्रीय गायक
◆१९०८ : गंगाधर बाळकृष्ण तथा ‘गं. बा.‘ सरदार – विचारवंत व साहित्यिक, पुरोगामी चळवळीचे भाष्यकार, दलित साहित्य संमेलनाचे अध्यक्ष
◆१९०४ : लाल बहादूर शास्त्री – स्वतंत्र भारताचे तिसरे पंतप्रधान. त्यांना मरणोत्तर ’भारतरत्‍न’ सन्मानाने गौरविण्यात आले  होते. (मृत्यू: ११ जानेवारी १९६६)
◆१८९१ : विनायक पांडुरंग करमरकर – शिल्पकार, १९२३ मधे पुण्याच्या श्री शिवाजी प्रिपरेटरी मिलिटरी स्कूलच्या आवारात बसवलेला शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा त्यांनी बनवला आहे. पद्मश्री
◆१८६९ : महात्मा गांधी (मृत्यू: ३० जानेवारी १९४८ - नवी दिल्ली)

                     ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
                  🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
१९८५ : रॉक हडसन – अमेरिकन अभिनेता
●१९७५ : के. कामराज – स्वातंत्र्यसैनिक, खासदार व तामिळनाडुचे मुख्यमंत्री
●१९२७ : स्वांते अर्‍हेनिअस – स्वीडीश भौतिक व रसायनशास्त्रज्ञ
●१९०६ : राजा रविवर्मा – चित्रकार 

No comments:

Post a Comment