"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

🛡 ★ 02. डिसेंबर ★ 🛡

🔻====●●●★●●●====🔻
★ जागतिक गुलामगिरी मुक्तता दिन
★ हा या वर्षातील ३३६ वा (लीप वर्षातील ३३७ वा) दिवस आहे.
★ International Day for the Abolition of Slavery

                    ~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
                  🔹•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔹
●२००१ : एन्‍रॉन कंपनीने दिवाळखोरी जाहीर केली.
●१९९९ : काळा पैसा अधिकृत व्यवहारात आणण्यास प्रतिबंध करणारे आणि परकीय चलन व्यवस्थापन करणारे (FEMA) ही दोन विधेयके लोकसभेत मंजूर
●१९८८ : बेनझीर भुट्टो यांनी पाकिस्तानच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली. कोणत्याही मुस्लिम राष्ट्राच्या पंतप्रधान बनणार्‍या त्या पहिल्या महिला होत.
●१९७१ : अबू धाबी, अजमान, फुजैराह, शारजाह, दुबई आणि उम-अल-क्‍वैन यांनी मिळून युनायटेड अरब एमिरातसची (UAE) स्थापना केली.
●१९४२ : एनरिको फर्मी याने प्रथमच शिकागो येथील अणूभट्टीत अणुविभाजनाची शृंखला अभिक्रिया (Chain Reaction) नियंत्रित करण्यात यश मिळवले. यामुळे अणूऊर्जेचा विधायक उपयोग करण्याचे दालन खुले झाले.

                    ~*★जन्मदिवस / जयंती★*~
                 🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९३७ : मनोहर जोशी – लोकसभेचे सभापती, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री
◆१९१३ : दत्ता उर्फ दादा धर्माधिकारी – चित्रपट अभिनेते व दिग्दर्शक
◆१९०५ : अनंत काणेकर – चतुरस्त्र साहित्यिक, कवी व पत्रकार, ’पद्मश्री’ व ’सोविएत लँड नेहरू पुरस्कार’ विजेते (मृत्यू: ४ मे १९८०)
◆१८९८ : इन्दर लाल रॉय – पहिल्या महायुद्धातील भारतीय पायलट
◆१८५५ : सर नारायण गणेश चंदावरकर – कायदेपंडित, समाजसुधारक, मुंबई उच्‍च न्यायालयाचे न्यायाधीश, डिप्रेस्ड क्लास मिशनचे अध्यक्ष (१९०६),
आणि काँग्रेसचे एक संस्थापक व आजीव सभासद

                     ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
                  🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९९६ : एम. चेन्‍ना रेड्डी – आंध्र प्रदेशचे ११ वे मुख्यमंत्री, उत्तर प्रदेशचे राज्यपाल
●१९८० : चौधरी मुहम्मद अली – पाकिस्तानचे ४ थे पंतप्रधान
●१९०६ : बाळाजी प्रभाकर मोडक – ’कालजंत्री’कार, शालिवाहन शक व तिथी आणि ख्रिस्ती सन यांचा मेळ घालण्याचे कोष्टक तयार करणारे, विज्ञानप्रसारक, लेखक
●१५९४ : गेरहार्ट मरकेटर – नकाशाकार, गणितज्ञ आणि तत्त्वज्ञ 

No comments:

Post a Comment