"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

*3/05/18 गुरुवारचा परीपाठ*

   ◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
*🌅 _महाराष्ट् शिक्षक पॅनल_* 🌅
 ━━═•●◆●★❂★●◆●•═━━
*Ⓜ💲🅿 _परीपाठ_ Ⓜ💲🅿*
====●●●★♦★●●●====

*❂ दिनांक:~ 03/05/2018 ❂*
       *🔘 वार ~ गुरुवार 🔘*
*⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽⌘⌘⌘*
  *💥🇮🇳 राष्ट्रगीत  🇮🇳💥*
➖➖➖➖➖➖➖➖
    *💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
➖➖➖➖➖➖➖➖
  *💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐ MSP ⋑⋐⋑⛯⋐⋑*

  *💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
       🔘 *"माझी शाळा"* 🔘
   *ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
    🔗🔗👇👇🔗🔗

http://satishborkhade.blogspot.in/?m=1
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ]   ❂ आजचे पंचाग ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

     🍥 *03.मे :: गुरुवार* 🍥
 ━━═•●◆❃★❂★❃◆●•═━━
              वैशाख कृ. 3
      तिथी : कृष्ण पक्ष तृतिया,
             नक्षत्र : ज्येष्ठा,
     योग : परिध, करण : विष्टी,
सूर्योदय :06:10, सूर्यास्त :19:01,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ]    ❂ सुविचार ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

03. *चुकीचा व्यवहार माणसं तोडतो म्हणून तो सत्याने आणि सन्मानाने करा.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ]    ❂ म्हणी व अर्थ ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

03. *गाढवाला गुळाची चव काय –*
  ★ अर्थ ::~ अडाणी, मूर्ख माणसास गुणाचे कौतुक नसते.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ]    ❂ सुभाषीत ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

03. *गुणै: गौरवमायाति ।*
            ⭐अर्थ ::~
 गुणांनी (मनुष्याला) गौरव प्राप्त होतो.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ]    ❂ दिनविशेष ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

        🛡 *★03. मे★* 🛡
🔻====●●●★●●●====🔻
★जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य दिन
★हा या वर्षातील १२३ वा (लीप वर्षातील १२४ वा) दिवस आहे.

                ~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
               🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९९९ : होनोलूलू येथील एडविन जस्कुलस्की या ९६ वर्षीय वृद्ध गृहस्तांनी १०० मी. धावण्याची शर्यत २४.०४ सेकंदात पूर्ण करुन नवा जागतिक विक्रम प्रस्थापित केला.
●१९७३ : शिकागो येथील १४५१ फूट उंच असलेली ’सिअर्स टॉवर’ ही (त्याकाळची) जगातील सर्वात उंच इमारत बनली.
●१९४७ : इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस (INTUC) ची स्थापना.
●१९३९ : नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाची स्थापना केली.
●१९१३ : दादासाहेब फाळके यांनी दिग्दर्शित केलेला ’राजा हरिश्चंद्र’ हा पहिला भारतीय मूक चित्रपट प्रदर्शित होऊन भारतीय चित्रपट उद्योगाची सुरूवात झाली.
●१८०२ : वॉशिंग्टन (डि. सी) या शहराची स्थापना झाली.

                ~*★ जन्मदिवस / जयंती ★*~
                🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९५१ : अशोक गहलोत – राजस्थानचे मुख्यमंत्री
◆१९५९ : उमा भारती – मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्री
◆१८९८ : गोल्डा मायर – शिक्षिका व इस्त्रायलच्या ४ थ्या पंतप्रधान
◆१८९६ : व्ही. के. कृष्ण मेनन – भारताचे संरक्षणमंत्री व मुत्सद्दी

                  ~*★ मृत्यू / पुण्यतिथी ★*~
               🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००९ : राम शेवाळकर – मराठी साहित्यिक
●२००६ : प्रमोद महाजन – केन्द्रीय मंत्री व राज्यसभा खासदार
●२००० : शकुंतला परांजपे – कुटुंब नियोजनाच्या क्षेत्रात अनन्यसाधारण कार्य केलेल्या समाजसेविका
●१९८१ : फातिमा रशिद ऊर्फ ’नर्गिस’ – हिन्दी चित्रपट अभिनेत्री
●१९७१ : डॉ. धनंजय रामचंद्र तथा द. रा. गाडगीळ – अर्थशास्त्रज्ञ, भारतीय अर्थशास्त्राचे प्रणेते, सहकारी चळवळीचे खंदे समर्थक,
●१९६९ : डॉ. झाकिर हुसेन – भारताचे ३ रे राष्ट्रपती, शिक्षणतज्ञ. पद्मविभूषण व भारतरत्‍न (जन्म: ८ फेब्रुवारी १८९७)
●१९१२ : नझीर अहमद देहलवी ऊर्फ ’डिप्टी’ – ऊर्दू कादंबरीचे जनक मानले जाणारे ऊर्दू लेखक, समाजसुधारक
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
   💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व "मुख्य मराठी" बातम्या
 वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..

     https://goo.gl/8D33ox
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0६ ]    ❂ बोधकथा ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

03.  *❃❝ ससा व त्याचे मित्र❞❃*
     ━━═•●◆●★◆★●◆●•═━━
     एक जंगल होते. गाय, घोड़ा, गाढव, आणि बकरी तेथे चरायला येत असत. त्या चौघांमध्ये मैत्री झाली. ते जेथे चरायला जात असत तेथे एका झाडाखाली सशाचे बीळ होते. एक दिवस सशाने त्या चौघांना एकत्र फिरताना पाहिले त्यांची मैत्री पाहिली आणि त्याला वाटले आपणही त्यांच्याशी मैत्री करावी. ससा त्यांच्यापाशी गेला व म्हणाला," तुम्ही चौघे जसे मित्र आहात तसेच मलाही तुमचा मित्र करून घ्या. त्यांनी सर्वांनी या गोष्टीला मान्यता दिली व त्याला मित्र करून घेतले. सशाला मोठा आनंद झाला. ससापण त्यांच्यासोबत फिरू लागला. एके दिवशी ससा त्यांच्याजवळ बसला होता. अचानक शिकारी कुत्रे जवळ आल्याची त्यांना सर्वाना जाणीव झाली, ससा गाईला म्हणाला,"तू मला तुझ्या पाठीवर बसव जेंव्हा शिकारी कुत्रे जवळ येतील त्यांना तू तुझ्या शिंगांनी मारून पळवून लाव." गाय म्हणाली,"आता तर माझी घरी परतण्याची वेळ झाली आहे." तेंव्हा ससा घोडयाकडे गेला आणि म्हणाला," तू मला तुझ्या पाठीवर बसव आणि माझा जीव वाचव" घोडा म्हणाला,"मित्र मी तुला पाठीवर घेतले असते पण मला खाली बसताच येत नाही मी तुला कसे पाठीवर घेवू?" तेंव्हा ससा गाढवाला म्हणाला,"मित्रा तू तरी मला मदत कर" गाढव म्हणाले" मी तर आता घरी चाललो तू बघ" मग शेवटी ससा बकरी कडे गेला व म्हणाला,"बकरीताई तू तुझ्या पाठीवर मला घेतेस काय?" बकरी म्हणाली,"अरे सशा, मीच शिकारी कुत्र्यांना घाबरते आणि तुला वाचावयाच्या नादात त्यांनी मलाच फाडून खातील. तेंव्हा तू तुझे बघ" एवढ्यात कुत्रे तेथे पोहोचले, ससा जीवाचा आकांत करून पळाला आणि एका झाडाच्या पाठीमागे जाऊन लपला. कुत्रे निघून गेले आणि ससा मरणापासून वाचला. त्याने मनात विचार केला,"असे मित्र असण्यापेक्षा मित्र नसलेले बरे!!"*

      *🌀❝ तात्पर्य ❞ ::~*
    मित्राची खरी ओळख संकटात होते. आपले म्हणणारे संकटात सोडून जातात याचा अनुभव नेहमी येतोच.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ] ❂ प्रेरणादायी विचार ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

03. आयुष्यातील सगळ्यात
             *मोठा गुन्हा*
    *आपल्यामुळे एखाद्याच्या*
*डोळ्यात पाणी येणे...*
           आणि
*आयुष्यातील सगळ्यात मोठ यश*
     *आपल्यासाठी एखाद्याच्या*
           *डोळ्यात पाणी येणे...!!*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ]   ❂ सामान्य ज्ञान ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

03. *✿भुगोल सामान्य माहिती ✿*
       ◑◑◑◆◑◑●★●◑◑◆◑◑◑
■ वातावरणातील सर्वात कमी तापमान मध्यांबरात आढळते..

■ संदेशवहनासाठी *आयनांबर* या थराचा उपयोग होतो..

■ क्षेत्रफळाच्या बाबतीत भारताचा जगात *7 वा क्रमांक* आहे..

■ मुख्य भूमी व सागरी बेटे मिळून भारतास *7517 किमी* लांबीचा सागर किनारा लाभला आहे..
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ] ❂थोरव्यक्ती परिचय ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

03. *❒ राम शेवाळकर ❒*
    ─┅━━●●★◆★●●━━┅─
जन्म :~ २ मार्च १९३१
मृत्यू :~ ३ मे २००९

      हे मराठी लेखक, कवी होते.

            ◆ राम शेवाळकर ◆
   कयाधू नदीच्या काठावरील शेवाळ हे राम शेवाळकरांचे मूळ गाव. तिथूनच त्यांच्या घरून शेवाळकरांकडे साहित्याचा वसा आणि वारसा आला. त्यांचे मूळचे आडनाव धर्माधिकारी. कालांतराने अचलपुरास वस्तीला आल्यावर शेवाळकर झाले. गोपिका बाळकृष्ण शेवाळकर या त्यांच्या आई. वेदशास्त्रसंपन्न रामशास्त्री शेवाळकर हे राम शेवाळकरांचे पणजोबा, बाळकृष्ण काशीनाथ ऊर्फ भाऊसाहेब शेवाळकर हे त्यांचे वडील. त्यांनी पासष्ट वर्षे कीर्तनाने लोकांना मंत्रमुग्ध केले. अशा घराण्यात जन्मल्यामुळे राम शेवाळकरांना संस्कृत साहित्याची आवड लागली. त्यांच्यावर संस्कृत महाकाव्ये, मराठी संतसाहित्याच्या माध्यमातून वाङ्मयीन संस्कार झाले.
राम शेवाळकरांचा जन्म मार्च २, १९३१ रोजी महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यामध्ये अचलपूर गावात झाला. पुढे त्यांनी नागपूर विद्यापीठातून संस्कृत व मराठीत एम.ए. केल्यानंतर शिक्षकी पेशा स्वीकारला. वाशीम येथे शासकीय प्रशालेत ते शिक्षक होते. पुढे यवतमाळ महाविद्यालय, नांदेडातील पीपल्स कॉलेज, वणीतील लोकमान्य टिळक महाविद्यालयात त्यांनी प्राध्यापक म्हणून शिकवले. या सुमारासच त्यांनी संस्कृतीविषयक साहित्यनिर्मितीही आरंभली.
१९९४ साली गोव्यात पणजी येथे भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. मराठी साहित्य महामंडळ, विश्वकोष निर्मिती मंडळ, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, अखिल भारतीय सानेगुरूजी कथामाला, महाराष्ट्र साहित्य परिषद, साहित्य अकादमी, नाट्य परीक्षण मंडळ, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ, कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ अशा संस्थांच्या कामात शेवाळकरांचा सहभाग होता.

          संस्थाविषयक कार्य
  राम शेवाळकरांना अनेक साहित्य संस्थामध्ये महत्त्वाच्या पदांवर काम केले होते. विदर्भ साहित्य संघाचे ते अध्यक्ष होते. त्याचप्रमाणे मराठी साहित्य महामंडळ, विश्वकोष निर्मिती मंडळ, महाराष्ट्र राष्ट्रभाषा, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, अखिल भारतीय सानेगुरूजी कथामाला, महाराष्ट्र साहित्य परिषद, साहित्य अकादमी, नाट्य परीक्षण मंडळ, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ, आकाशवाणी सल्लागार मंडळ, संतपीठ सल्लागार समिती, कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ अशा कितीतरी संस्थाचे अध्यक्ष-उपाध्यक्ष किंवा सदस्य या नात्यानं शेवाळकरांनी मोठी कामगिरी केली.

    नागपूर विद्यपीठ मराठी प्राध्यापक परिषदेचे ते संस्थापक होते. विदर्भातील लेखकांनाही एकत्रित करून त्यांनी 'अभिव्यक्ती' नावाची संस्था स्थापन केली होती.

       ◆ पुरस्कार आणि सन्मान
   'मॅन ऑफ द इयर ' हा अमेरिकेचा पुरस्कार,
'साहित्य धुरंधर' पुरस्कार बोस्टन येथील संस्थेतर्फे,
स्वामी विवेकानंद पुरस्कार,
श्रीमद् जगद्गुरू शंकराचार्य पीठ पुरस्कार,
दीनानाथ मंगेशकर प्रतिष्ठानचा कुसुमाग्रज पुरस्कार,
नागपूर विद्यापीठाची डी. लिट्.
डॉ. राधाकृष्णन पुरस्कार,
समाजभूषण पुरस्कार,
विदर्भ गौरव पुरस्कार,
विदर्भ भूषण पुरस्कार,
जीवनव्रती पुरस्कार,
नागभूषण पुरस्कार,
राष्ट्रसेवा पुरस्कार,
साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद (पणजी, १९९४); शिवाय जागतिक मराठी संमेलन, जागतिक कीर्तन संमेलन, भंडारा येथे १९७८ मध्ये झालेले विदर्भ साहित्य संमेलन, महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संमेलन, पहिले आदिवासी साहित्य संमेलन, स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलन, गुजरात प्रदेश मराठी साहित्य संमेलन, मराठी संत साहित्य संमेलनाचेही ते अध्यक्ष होते.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹🔅✹★✹◑◎●••
             *✍संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
   ♦📱 7875840444 ♦
 *✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❃❂❃█║▌║█║▌

*◆ गुरुवार ~ 03/05/2018 ◆*
*⋐⋑⛯⋐⋑⋐ MSP ⋑⋐⋑⛯⋐⋑*

No comments:

Post a Comment