"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

🛡 ★ 03. ऑगस्ट ★ 🛡

🔻====●●●★●●●====🔻
★नायजरचा स्वातंत्र्य दिन
★हा या वर्षातील २१५ वा (लीप वर्षातील २१६ वा) दिवस आहे.

                       ~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
                   🔹•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔹
●२००० : मल्याळी दिग्दर्शक शाजी एन. करुण यांना फ्रेन्च सरकारने ’नाईट ऑफ आर्टस अँड लेटर्स’ पुरस्काराने सन्मानित केले.
●१९९४ : संगीतकार अनिल विश्वास यांना मध्य प्रदेश सरकारचा ’लता मंगेशकर पुरस्कार’ जाहीर
●१९६० : नायजरला (फ्रान्सकडून) स्वातंत्र्य मिळाले.
●१९४८ : भारतीय अणूऊर्जा आयोगाची (Indian Atomic Energy Commission) स्थापना झाली.
●१७८३ : जपानमधील माउंट असामा ज्वालामुखीचा उद्रेक होऊन सुमारे ३५,००० जण मृत्यूमुखी पडले.

                    ~*★जन्मदिवस / जयंती★*~
                  🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९५६ : बलविंदरसिंग संधू – १९८३ च्या क्रिकेट विश्वचषक विजेत्या संघातील क्रिकेटपटू
◆१९१६ : शकील बदायूँनी – गीतकार आणि शायर
◆१९०० : *क्रांतिसिंह नाना पाटील* – स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक, ’पत्री सरकार’चे (प्रति सरकार) संस्थापक आणि कम्युनिस्ट पक्षाचे खासदार (मृत्यू: ६ डिसेंबर १९७६)
◆१८९८ : उदयशंकर भट्ट – आधुनिक हिंदी नाटककार, एकांकिकाकार, कवी आणि कादंबरीकार.
◆१८८६ : मैथिलिशरण गुप्त – हिन्दी कवी. त्यांचे सुमारे ४० स्वतंत्र ग्रंथ आणि ६ अनुवादित ग्रंथ प्रसिद्ध झाले. त्यांच्या ’भारतभारती’ या काव्यग्रंथामुळे त्यांना राष्ट्रकवी म्हणून मान्यता मिळाली.

                  ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
               🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००७ : सरोजिनी वैद्य – लेखिका
●१९९३ : स्वामी चिन्मयानंद सरस्वती – अध्यात्मिक गुरू
●१९५७ : देवदास गांधी – पत्रकार, ‘हिन्दुस्तान टाइम्स‘चे संपादक, महात्मा गांधींचे चिरंजीव
●१९३० : व्यंकटेश बापूजी केतकर – विख्यात गणिती व आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्योतिर्विद

No comments:

Post a Comment