"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

🛡 ★ 03. मार्च ★ 🛡

🔻====●●●★●●●====🔻
★ हा या वर्षातील ६२ वा (लीप वर्षातील ६३ वा) दिवस आहे.

                     ~*🔺महत्त्वाच्या घटना 🔺*~
                    🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००५ : स्टीव्ह फॉसेट यांनी ’ग्लोबल फायर’ या मुलुखावेगळ्या विमानातून एकट्याने आणि पुन्हा इंधन न भरता ६७ तासात पृथ्वीप्रदक्षिणा पूर्ण केली.
●१९७३ : ओरिसात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली.
●१९४३ : दुसरे महायुद्ध – लंडनमधे बॉम्बविरोधी आश्रयस्थानात घुसताना झालेल्या चेंगराचेंगरीत १४३ ठार
●१९३० : नाशिक येथील काळा राम मंदिरात सर्वांना प्रवेश मिळावा यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सत्याग्रह केला.

                 ~*★जन्मदिवस / जयंती★*~
                🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९७७ : अभिजीत कुंटे – भारताचा चौथा आणि महाराष्ट्राचा दुसरा ग्रँडमास्टर
◆१९६७ : शंकर महादेवन – गायक व संगीतकार
◆१९५५ : जसपाल भट्टी – विनोदी अभिनेते (मृत्यू: २५ आक्टो. २०१२)
◆१९२६ : रवि शंकर शर्मा ऊर्फ ’रवि’ – संगीतकार (मृत्यू: ७ मार्च २०१२)
◆१८४७ : अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल – स्कॉटिश - अमेरिकन पदार्थ वैज्ञानिक, टेलिफोनचा संशोधक
(मृत्यू: २ ऑगस्ट १९२२)
◆१८३९ : जमशेदजी नसरवानजी टाटा – आधुनिक औद्योगिक भारताचे शिल्पकार व टाटा उद्योग समुहाचे संस्थापक

                    ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
                 🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९९५ : पं. निखिल घोष – तबलावादक
●१९८२ : रघुपती सहाय ऊर्फ फिराक गोरखपुरी – ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ऊर्दू शायर
●१९६५ : अमीरबाई कर्नाटकी – पार्श्वगायिका व अभिनेत्री
●१९१९ : हरी नारायण आपटे – कादंबरीकार
●१७०७ : औरंगजेब – सहावा मोगल सम्राट (जन्म: ४ नोव्हेंबर १६१८)
●१७०३ : रॉबर्ट हूक – इंग्लिश वैज्ञानिक 

No comments:

Post a Comment