"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

🛡 ★ 04. ऑक्टोबर ★ 🛡

🔻====●●●★●●●====🔻
★ राष्ट्रीय एकात्मता दिवस.
★ हा या वर्षातील २७७ वा (लीप वर्षातील २७८ वा) दिवस आहे.
★ जागतिक प्राणी दिन.

                      ~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
                   🔹•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔹
●१९८३ : नेवाडामधील ब्लॅक रॉक डेझर्ट येथे रिचर्ड नोबल याने आपली थ्रस्ट २ ही गाडी ताशी १०१९ किमी वेगाने चालवून विश्वविक्रम प्रस्थापित केला.
●१९५७ : सोविएत रशियाने ’स्पुटनिक-१’ हा पहिला कृत्रिम उपग्रह अंतराळात सोडून अंतराळयुगाचा प्रारंभ केला.
●१९५९ : सोविएत रशियाच्या ’ल्युनिक-३’ या अंतराळयानाने चंद्राला प्रदक्षिणा घालून चंद्राच्या पृथ्वीवरुन न दिसणार्‍या भागाची छायाचित्रे घेतली.
●१९२७ : गस्टन बोरग्लम याने ’माऊंट रशमोअर’ चे शिल्प कोरण्यास सुरुवात केली.

                    ~*★ जन्मदिवस / जयंती ★*~
                  🔸•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔸
◆१९३७ : जॅकी कॉलिन्स – इंग्लिश लेखिका व  अभिनेत्री
◆१९३५ : अरुण सरनाईक – मराठी चित्रपट व नाट्य अभिनेते, तबलावादक, गायक
◆१९२८ : ऑल्विन टॉफलर – अमेरिकन पत्रकार व लेखक
◆१९१६ : धनसुखलाल तुलसीदास लाकडावाला – अर्थशास्त्रज्ञ व प्राध्यापक, सार्वजनिक अर्थकारण व आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र या क्षेत्रांतील अधिकारी व्यक्ती
◆१९१३ : सरस्वतीबाई राणे – शास्त्रीय गायिका

                    ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
                 🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९८९ : ’संगीतभूषण’ पं. राम मराठे – संगीतकार, गायक व नट
●१९८२ : सोपानदेव चौधरी – कवी, कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे पुत्र. ’काव्यकेतकी’, ’अनुपमा’, ’सोपानदेवी’ हे त्यांचे कवितासंग्रह प्रसिद्ध आहेत.
●१९४७ : मॅक्स प्लँक – नोबेल पारितोषिक विजेते जर्मन भौतिक शास्त्रज्ञ
●१९२१ : ’संगीतसूर्य’ केशवराव भोसले – ’संगीत सौभद्र’ मधील धैर्यधराच्या भूमिकेत गाजलेले गायक अभिनेते. ●१८४७ : महाराष्ट्रातील एक सद्गुणी, प्रजाहितदक्ष पण दुर्दैवी राजे प्रतापसिंह भोसले यांचे निधन. छत्रपती शाहू (दुसरे) यांचे ते थोरले चिरंजीव होत. 

No comments:

Post a Comment