"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

06/05/18 रविवारचा परीपाठ

   ◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
*🌅 _महाराष्ट् शिक्षक पॅनल_* 🌅
 ━━═•●◆●★❂★●◆●•═━━
*Ⓜ💲🅿 _परीपाठ_ Ⓜ💲🅿*
====●●●★♦★●●●====

*❂ दिनांक:~ 06/05/2018 ❂*
      *🔘 वार ~ रविवार 🔘*
*⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽⌘⌘⌘*
  *💥🇮🇳 राष्ट्रगीत  🇮🇳💥*
➖➖➖➖➖➖➖➖
    *💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
➖➖➖➖➖➖➖➖
  *💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐ MSP ⋑⋐⋑⛯⋐⋑*

  *💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
       🔘 *"माझी शाळा"* 🔘
   *ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
    🔗🔗👇👇🔗🔗

http://satishborkhade.blogspot.in/?m=1
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ]   ❂ आजचे पंचाग ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

     🍥 *06.मे :: रविवार* 🍥
 ━━═•●◆❃★❂★❃◆●•═━━
             वैशाख कृ. ६
      तिथी : कृष्ण पक्ष षष्ठी,
          नक्षत्र : उत्तराषाढा,
    योग : साध्य, करण : वणीज,
सूर्योदय : 06:08, सूर्यास्त : 19:02,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ]    ❂ सुविचार ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

06. *प्रसंगी थोडे नुकसान झाले तरी चालेल, पण शत्रू निर्माण करू नका.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ]    ❂ म्हणी व अर्थ ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

06. *दगडा पेक्षा वीट मऊ*
           *★अर्थ ::~*
 मोठ्या संकटापेक्षा लहान संकट बरे
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ]    ❂ सुभाषीत ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

06. *विद्याविहीनः पशुः ।*
   ⭐अर्थ ::~ विद्याविहीन मनुष्य हा मनुष्य नसून पशूच आहे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ]    ❂ दिनविशेष ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

        🛡 *★06. मे★* 🛡
🔻====●●●★●●●====🔻
★हा या वर्षातील १२६ वा (लीप वर्षातील १२७ वा) दिवस आहे.
★International No Diet Day

                   ~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
                🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००२ : भूपिंदर नाथ किरपाल यांनी भारताचे ३१ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
●१९९९ : महाराष्ट्र राज्यातील सर्व कृषी विद्यापीठांत महिलांना तीस टक्‍के आरक्षणाचा निर्णय घेण्यात आला. अस निर्णय घेणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले.
●१९९७ : ’बँक ऑफ इंग्लंड’ला स्वायत्तता देण्यात आली.
●१८८९ : पॅरिसमधील ’आयफेल टॉवर’चे उद्‍घाटन झाले.
●१५४२ : सेंट फ्रान्सिस झेव्हिअर तत्कालीन पोर्तुगीज गोव्याची राजधानी ओल्ड गोवा येथे पोहोचला.

                 ~*★ जन्मदिवस / जयंती ★*~
               🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९५३ : टोनी ब्लेअर – ब्रिटनचे पंतप्रधान आणि मजूर पक्षाचे अध्यक्ष
◆१९२० : बुलो चंदीराम रामचंदानी ऊर्फ बुलो सी. रानी – जुन्या पिढीतील संगीतकार व गायक
◆१८६१ : मोतीलाल गंगाधर नेहरू – भारतीय स्वातंत्र्यसेनानी, स्वराज्य पक्षाचे संस्थापक सदस्य, कायदेपंडित
◆१८५६ : सिग्मंड फ्रॉईड – ऑस्ट्रियन मानसशास्त्रज्ञ, आधुनिक मानसशास्त्राचा जनक

                    ~*★ मृत्यू / पुण्यतिथी ★*~
                🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९६६ : रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे – भारतातील पहिले सिनिअर रँग्लर, फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य, पुणे विद्यापीठाचे कुलगुरू, मुंबई राज्याचे शिक्षणमंत्री, भारताचे ऑस्ट्रेलियातील उच्‍चायुक्त
●१९५२ : मारिया माँटेसरी – इटालियन डॉक्टर व शिक्षणतज्ञ. पूर्वप्राथमिक शिक्षणाविषयीच्या त्यांच्या उपक्रमामुळे तशा शाळा ’माँटेसरी’ या नावाने ओळखल्या जातात.
●१९४६ : भुलाभाई देसाई – स्वातंत्र्यसेनानी व कायदेपंडित, त्यांनी होमरुल चळवळीतील कार्यकर्ते,
●१९२२ : छत्रपती शाहू महाराज – सामाजिक सुधारणांचे कृतीशील पुरस्कर्ते, कला, नाटक, संगीत यांचे प्रोत्साहक
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
   💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व "मुख्य मराठी" बातम्या
 वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..

     https://goo.gl/8D33ox
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0६ ]    ❂ बोधकथा ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

06.  *❃❝ कष्टाची कमाई ❞❃*
     ━━═•●◆●★◆★●◆●•═━━
     एका नगरात दोन चोर राहत होते. प्रत्‍येक दिवशी ते चोरी करत आणि दोन हिस्‍से करून वाटत असत. एक हिस्‍सा स्‍वत:साठी व दुसरा हिस्‍सा ईश्‍वराला देत असत. एका रात्री ते चोरीसाठी निघाले. बरीच भटकंती करूनही त्‍यांना चोरी करण्‍याची संधी मिळाली नाही. दोघेही थकून मंदिराच्‍या ओट्यावर बसले. तेथे त्‍यांना एक संत भेटले. संताने त्‍यांना परिचय विचारला तर त्‍यांनी स्‍वत:बाबत खरे सांगितले. हे ऐकून संत म्‍हणाला, तुम्‍ही जे करत आहात ते चांगले की वाईट आहे यावर कधी तुम्‍ही विचार केला आहे? चोर म्‍हणाले,'' आम्‍ही करत आहोत ते चांगलेच असणार कारण चोरी करून आम्‍ही जे धन किंवा वस्‍तू प्राप्‍त करतो ते आम्‍ही दोन भागांमध्‍ये वाटतो. एक भाग आम्‍ही स्‍वत:कडे ठेवतो आणि दुसरा भाग ईश्‍वराला चरणी अर्पण करतो. तेव्‍हा त्‍या संताने आपल्‍या झोळीतून एक जिवंत कोंबडा काढला आणि त्‍यांना देत म्‍हणाला,'' आज तुम्‍ही चोरी करू श्‍कला नाहीत त्‍यामुळे निराश वाटत आहात हा कोंबडा ठेवा. याचे दोन हिस्‍से करा एक स्‍वत:साठी ठेवा आणि दुसरा ईश्‍वरचरणी ठेवा.'' दोघेही चोर आश्‍चर्यचकित झाले संतांच्‍या बोलण्‍याचा आशय समजून म्‍हणाले,''महाराज इथून पुढे आम्‍ही चोरी न करता कष्‍टाची कमाई करून खाऊ आणि त्‍यातील एक हिस्‍सा ईश्‍वरचरणी ठेवू.'' दोघेही संताला नमस्‍कार करून निघून गेले.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ] ❂ प्रेरणादायी विचार ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

06. *स्वतःला* असे तयार करा की,
    तुमच्या विरोधकाला
     तुमचा पाय खेचण्याच्या ऐवजी...
          तुमचा हात पकडून
            पुढे  जाण्याची इच्छा
        निर्माण झाली पाहिजे...!!
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ]   ❂ सामान्य ज्ञान ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

06.   *✿ देशातील पहिले ✿*
       ◑◑◑◆◑◑●★●◑◑◆◑◑◑
■ देशातील पहिले सोलर सिटी*

  ➜ मलकापूर (सातारा)

■ देशातील पहिले बाल न्यायालय*

   ➜ दिल्ली

■ देशातील पहिले महिला न्यायालय*

   ➜ आंधप्रदेश

■ देशातील पहिले आधार गाव

     ➜  टेंभली (नंदूरबार)

■ देशातील पहिले हरीत शहर

     ➜  आगरतळा
 (त्रिपुरा) (दूसरे - नागपूर)
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ] ❂थोरव्यक्ती परिचय ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

06. *❒ छत्रपती शाहू महाराज ❒* 
     ━━═•●◆●★◆★●◆●•═━━
●पूर्ण नाव :~ यशवंत आप्पासाहेब घाटगे
●जन्म :~ २६ जून इ.स.१८७४, कागल, कोल्हापूर
●राज्याभिषेक :~ २ एप्रिल १८९४
●मृत्यू :~ ६ में १९२२ मुंबई
●राज्यव्याप्ती :~ कोल्हापूर जिल्हा

                      ◆ राजर्षी शाहू महाराज ◆
    चौथे शाहू, अर्थात राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे कोल्हापूर संस्थानाचे इ.स. १८८४- १९२२ सालांदरम्यान छत्रपती होते.

                        ◆ प्रेरणादाई कार्य
    शाहू महाराजांनी बहुजन समाजात शिक्षणप्रसार करण्यावर विशेष भर दिला. त्यांनी कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले. स्त्री शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी राजाज्ञा काढली. अस्पृश्यता नष्ट करण्याच्या दृष्टीने त्यांनी इ.स. १९१९ साली सवर्ण व अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा भरवण्याची पद्धत बंद केली. जातिभेद दूर करण्यासाठी त्यांनी आपल्या राज्यात आंतरजातीय विवाहाला मान्यता देणारा कायदा केला. इ.स. १९१७ साली त्यांनी पुनर्विवाहाचा कायदा करून विधवाविवाहाला कायदेशीर मान्यता मिळवून दिली.

    ‘शाहू छत्रपती स्पिनिंग अँड वीव्हिंग मिल’, शाहुपुरी व्यापारपेठ, शेतकऱ्यांची सहकारी संस्था, शेतकी तंत्रज्ञानाच्या संशोधनासाठी ‘किंग एडवर्ड अ‍ॅग्रिकल्चरल इन्स्टिट्यूट’ इत्यादी संस्था कोल्हापुरात स्थापण्यात त्यांचा प्रमुख वाटा होता. राधानगरी धरणाची उभारणी, शेतकऱ्यांना कर्जे उपलब्ध करून देणे अशा उपक्रमांतूनही त्यांनी कृषिविकासाकडे लक्ष पुरवले.

    त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या शिक्षणासाठी, तसेच मूकनायक वृत्तपत्रासाठीही सहकार्य केले होते. त्यांनी चित्रकार आबालाल रहिमान यांच्यासारख्या कलावंतांना राजाश्रय देऊन प्रोत्साहन दिले.

    स्वातंत्र्यापूर्वी कैक वर्षे आधी समता, बंधुता, धर्मनिरपेक्षता, सर्व घटकांना विकासाची समान संधी ही तत्त्वे राजर्षी शाहू महाराजांनी करवीर संस्थानात अमलात आणली. म्हणूनच त्यांचा देशभरात "महाराजांचे महाराज‘ असा गौरव होतो..शाहू महाराजांना "राजर्षी" ही उपाधी कानपूरच्या कुर्मी क्षत्रिय समाजाने दिली.

     राजर्षी शाहू महाराजांच्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, औद्योगिक, सांस्कृतिक व कृषी-सिंचन या सर्वच क्षेत्रांतील कार्याचा दूरगामी परिणाम केवळ कोल्हापूर परिसरावरच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रावर झालेला स्पष्टपणे जाणवतो. कोल्हापूर संस्थानाचे राजे असूनही त्यांनी लोकशाही पद्धतीने राज्यकारभार केला. डॉ. आंबेडकरांनी ‘सामाजिक लोकशाहीचे आधारस्तंभ’ अशा समर्पक शब्दांत राजर्षी शाहूंचे वर्णन केले आहे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹🔅✹★✹◑◎●••
           *✍संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
   ♦📱 7875840444 ♦
 *✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❃❂❃█║▌║█║▌

*◆ रविवार ~ 06/05/2018 ◆*
*⋐⋑⛯⋐⋑⋐ MSP ⋑⋐⋑⛯⋐⋑*

No comments:

Post a Comment