"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

🛡 ★06.फेब्रुवारी★ 🛡

🔻====●●●★●●●====🔻
★हा या वर्षातील ३७ वा दिवस आहे.

                ~*🔺महत्त्वाच्या घटना 🔺*~
              🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९४२ : दुसरे महायुद्ध – इंग्लंडने थायलँडविरुद्ध युद्ध पुकारले.
●१९३२ : कलकत्ता विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात छत्री संघाची सदस्य असलेल्या बीना दास या विद्यार्थिनीने बंगालचे राज्यपाल स्टॅन्ले जॅक्सन यांच्यावर गोळया झाडल्या.
●१९३२ : ’प्रभात’चा ’अयोध्येचा राजा’ हा बोलपट मुंबईच्या ’कृष्णा’ या चित्रपटगृहात प्रदर्शित झाला.
●१९१८ : ३० वर्षे वयावरील ब्रिटिश महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला. १९२८ मध्ये हे वय २१ करण्यात आले.

                      ~*★जन्मदिवस / जयंती★*~
                    🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९८३ : श्रीशांत – क्रिकेटपटू, सट्टेबाज व ’फिक्सर’
◆१९५२ : डॉ. रिक चार्ल्सवर्थ – ऑस्ट्रेलियन हॉकीपटू, हॉकी प्रशिक्षक, क्रिकेटपटू आणि राजकारणी
◆१९१५ : रामचंद्र नारायण द्विवेदी ऊर्फ कवी प्रदीप – ‘ए मेरे वतन के लोगो‘ या गाण्यामुळे प्रत्येक भारतीयाच्या काळजाला भिडणार्‍या रचनेमुळे आपले वेगळेपण ठसविणारे आधुनिक राष्ट्रकवी
◆१९११ : रोनाल्ड रेगन – अभिनेते आणि अमेरिकेचे ४० वे राष्ट्राध्यक्ष

                    ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
                 🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००१ : बॅ. विठ्ठलराव गाडगीळ – केन्द्रीय नभोवाणी मंत्री
●१९७६ : ऋत्विक घटक – चित्रपट निर्माते आणि पटकथालेखक
●१९३९ : सर सयाजीराव गायकवाड (तिसरे) – बडोद्याचे महाराज, सुधारणावादी संस्थानिक, पडदा पद्धती, बालविवाह, कन्याविक्रय यांना बंदी घालणारे कायदे केले. विधवा विवाहाला संमती दिली.(जन्म: १० मार्च १८६३)
●१९३१ : मोतीलाल गंगाधर नेहरू – भारतीय स्वातंत्र्यसेनानी, स्वराज्य पक्षाचे संस्थापक सदस्य, कायदेपंडित (जन्म: ६ मे १८६१)
●१८०४ : जोसेफ प्रिस्टले – इंग्लिश रसायनशास्रज्ञ

No comments:

Post a Comment