"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

06. एप्रिल

🛡 *06. एप्रिल :: गुरुवार* 🛡
🔻====●●●★●●●====🔻
★ हा या वर्षातील ९६ वा (लीप वर्षातील ९७ वा) दिवस आहे.

       ~*★महत्त्वाच्या घटना★*~
     🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००० : ’मीर’ या रशियाच्या अंतरिक्ष प्रयोगशाळेला जीवदान देण्यासाठी सोडलेले ’सोयूझ’ हे अंतराळयान ’मीर’ला भेटले.
●१९८० : भारतीय जनता पक्षाची (BJP) स्थापना झाली व अटलबिहारी वाजपेयी तिचे पहिले अध्यक्ष झाले. यानंतर १९८४ मध्ये झालेल्या ८ व्या लोकसभा निवडणूकांमध्ये या पक्षाला दुसर्‍या क्रमांकाची मते मिळुनही फक्त दोनच जागा मिळाल्या!
●१९६६ : भारतीय जलतरणपटू मिहीर सेन यांनी भारत व पाकिस्तानला जोडणारी पाल्कची सामुद्रधुनी पोहून पार केली. इंग्लिश खाडीसह जगातील अनेक खाड्या त्यांनी पार केल्या होत्या.
●१९३० : प्रसिद्ध दांडीयात्रेनंतर गांधीजींनी मिठाचा सत्याग्रह सुरू केला.
●१६५६ : शिवाजीमहाराजांनी चंद्रराव मोरे यांचा पराभव करुन रायगड किल्ला ताब्यात घेतला.

       ~*★जन्मदिवस / जयंती★*~
      🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९५६ : दिलीप वेंगसरकर – क्रिकेटपटू व प्रबंधक
◆१९३१ : रमा दासगुप्ता तथा सुचित्रा सेन – बंगाली व हिन्दी चित्रपट अभिनेत्री.
◆१९२८ : जेम्स वॉटसन – फ्रान्सिस क्रीक व मॉरिस विल्कीन्स या जोडीदारांसह डीएनएची संरचना स्पष्ट करणारे नोबेल पारितोषिक (१९६२) विजेते जैवरसायनशास्त्रज्ञ
◆१९१७ : ’काव्यतीर्थ’ हणमंत नरहर जोशी तथा कवी सुधांशु – मराठी कथाकार व कवी
◆१७७३ : जेम्स मिल – स्कॉटिश तत्त्ववेत्ते, इतिहासकार व अर्थशास्त्रज्ञ

        ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
     🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९९२ : आयझॅक असिमॉव्ह – अमेरिकन जीवरसायनशास्त्रज्ञ आणि विज्ञानकथालेखक
●१९८९ : पन्नालाल पटेल – ज्ञानपीठ पारितोषिक विजेते गुजराथी कथा-कादंबरीकार.
●१९८३ : जनरल जयंतीनाथ चौधरी – भारताचे लष्करप्रमुख (१९६२ - १९६६), हैदराबादचे लष्करी प्रशासक (१९४८ - १९४९) व भारताचे कॅनडातील राजदूत, पद्‌मविभूषण (जन्म: १० जून १९०८)
●१९८१ : शंकर धोंडो तथा मामा क्षीरसागर – मानवधर्माचे उपासक. 

No comments:

Post a Comment