"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

🛡 ★ 08. डिसेंबर ★ 🛡

🔻====●●●★●●●====🔻
★ राष्ट्रीय मतिमंद पुनर्वसन दिन
★ हा या वर्षातील ३४२ वा दिवस आहे. (लीप वर्षातील ३४३ वा)
★ जपानमध्ये हा दिवस "बोधी दिवस"  म्हणून साजरा केला जातो.

                  ~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
                🔹•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔹
●१९७१ : भारत पाक युद्ध – भारतीय आरमाराने पाकिस्तानातील कराची बंदरावर हल्ला केला.
●१९४१ : दुसरे महायुद्ध – जपानी फौजांनी एकाच वेळी मलेशिया, थायलँड, हाँगकाँग, फिलिपाइन्स व डच इस्ट इंडिज वर हल्ला केला. याच्या एकच दिवस आधी जपानने अमेरिकेतील पर्ल हार्बरवर हल्ला चढवला होता.
●१७४० : दीड वर्षाच्या लढाईनंतर रेवदंड्याचा किल्ला मराठ्यांनी पोर्तुगीजांकडून जिंकला.

                  ~*★जन्मदिवस / जयंती★*~
                🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९४४ : शर्मिला टागोर – चित्रपट अभिनेत्री
◆१९३५ : धर्मेन्द्र – चित्रपट अभिनेता
◆१९०० : उदय शंकर – जागतिक कीर्तीचे नर्तक व नृत्यदिग्दर्शक, पद्मविभूषण (१९७१), संगीत नाटक अकादमी पुरस्कार (१९६२)
◆१८९७ : पं. बाळकृष्ण शर्मा ऊर्फ ’नवीन’ – हिन्दी कवी. हिन्दीला राष्ट्रभाषा म्हणून मान्यता मिळवण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्‍न केले. (मृत्यू: २९ एप्रिल १९६०)
◆१८७७ : नारायण सदाशिव मराठे तथा ’केवलानंद सरस्वती’ – महाराष्ट्रातील धर्मसुधारणावादी श्रेष्ठ संस्कृत पंडित, संस्कृतमीमांसाकोशाचे संपादक
◆१७६५ : एली व्हिटनी – कापसाच्या जिनिंग मशीनचा संशोधक
१७२१ : बाळाजी बाजीराव तथा ’नानासाहेब पेशवा’ (मृत्यू: २३ जून १७६१)

                      ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
                   🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९७८ : गोल्डा मायर – शिक्षिका व इस्त्रायलच्या ४ थ्या पंतप्रधान  (जन्म: ३ मे १८९८)

No comments:

Post a Comment