"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

*09/05/18 बुधवारचा परीपाठ*

  ◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
*🌅 _महाराष्ट् शिक्षक पॅनल_* 🌅
 ━━═•●◆●★❂★●◆●•═━━
*Ⓜ💲🅿 _परीपाठ_ Ⓜ💲🅿*
====●●●★♦★●●●====

*❂ दिनांक:~ 09/05/2018 ❂*
       *🔘 वार ~ बुधवार 🔘*
*⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽⌘⌘⌘*
  *💥🇮🇳 राष्ट्रगीत  🇮🇳💥*
➖➖➖➖➖➖➖➖
    *💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
➖➖➖➖➖➖➖➖
  *💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐ MSP ⋑⋐⋑⛯⋐⋑*

  *💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
       🔘 *"माझी शाळा"* 🔘
   *ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
    🔗🔗👇👇🔗🔗

http://satishborkhade.blogspot.in/?m=1
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ]   ❂ आजचे पंचाग ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

     🍥 *09. मे :: बुधवार* 🍥
 ━━═•●◆❃★❂★❃◆●•═━━
              वैशाख कृ. ९
       तिथी : कृष्ण पक्ष नवमी,
             नक्षत्र : धनिष्ठा,
       योग : ब्रह्म, करण : तैतिल,
सूर्योदय : 06:07, सूर्यास्त : 19:03,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ]    ❂ सुविचार ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

09. *बदलण्याची संधी नेहमी असते पण बदलण्यासाठी तूम्ही वेळ काढला का ?*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ]    ❂ म्हणी व अर्थ ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

09. *छत्तीसाचा आकडा –*
  ★ अर्थ ::~ विरुद्ध मत असणे
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ]    ❂ सुभाषीत ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

09. *सकलगुणभूषा च विनयः ।*
            ⭐अर्थ ::~
 नम्रता ही सर्व गुणांचे भूषण आहे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ]    ❂ दिनविशेष ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

      🛡 *★09. मे★* 🛡
🔻====●●●★●●●====🔻
★जागतिक थॅलेसेमिया दिन
हा या वर्षातील १२९ वा (लीप वर्षातील १३० वा) दिवस आहे.

                    ~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
                  🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९९९ : अटलांटा ग्रांप्री नेमबाजी स्पर्धेत भारताच्या रुपी उन्नीकृष्णनने प्रोन गटात रौप्यपदक पटकाविले.
●१९९९ : ग्वाटेमालाच्या ज्युलिओ मार्टिनेझ याने ग्रॅन्ड प्रिक्स स्पर्धेतील वीस किलोमीटर चालण्याची शर्यत शर्यत १ तास १७ मिनिटे व ४६ सेकंदात पूर्ण करुन नवा जागतिक विक्रम प्रस्थापित केला.

                   ~*★ जन्मदिवस / जयंती ★*~
                🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९२८ : वसंत नीलकंठ गुप्ते – समाजवादी कामगारनेते, लेखक व समाजवादाचे अभ्यासक
◆१८८६ : केशवराव मारुतराव जेधे – स्वातंत्र्यसैनिक, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील एक प्रमुख नेते, शेतकरी कामगार पक्षाचे एक संस्थापक.
◆१८६६ : नामदार गोपाळ कृष्ण गोखले – थोर समाजसेवक, काँग्रेसचे अध्यक्ष, संसदपटू, भारत सेवक समाजाचे (Servants of India Society) संस्थापक
◆१८१४ : दादोबा पांडुरंग तर्खडकर – इंग्लिश व्याकरणकार, ग्रंथकार व धर्मसुधारक,
◆१५४० : महाराणा प्रताप – मेवाडचा सम्राट (मृत्यू: २९ जानेवारी १५९७)

                   ~*★ मृत्यू / पुण्यतिथी ★*~
                🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९९८ : तलत महमूद – पार्श्वगायक व अभिनेता, गझलचे बादशहा
●१९९५ : अनंत माने – पाच तपांहुन अधिक काळ चित्रपटसृष्टीसाठी व्यतीत करणारे व मराठी चित्रपटसृष्टीवर आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणारे दिग्दर्शक. ’पिंजरा’, ’लक्ष्मी’, ’सुशीला’, ’आई’ हे त्यांचे गाजलेले चित्रपट आहेत. ’अनंत आठवणी’ हे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे.
●१९५९ : कर्मवीर भाऊराव पाटील – शिक्षणतज्ञ, बहुजनसमाजातील तळमळीचे कार्यकर्ते, रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक, पद्मभूषण
●१९१९ : रेव्हरंड नारायण वामन तथा ना. वा. टिळक – कवी व लेखक
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
   💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व "मुख्य मराठी" बातम्या
 वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..

     https://goo.gl/8D33ox
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0६ ]    ❂ बोधकथा ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

09.  *❃❝ कृतघ्नता ❞❃*
     ━━═•●◆●★★●◆●•═━━
      एक गाढव मोठा सहनशील होता. त्याचा धनी त्याजकडून त्याच्या शक्तिपलीकडे काम करून घेत असे व त्यास पोटभर खाऊही घालत नसे.

      अशा स्थितीत त्या गाढवाने आपल्या धन्याची नोकरी पुष्कळ वर्षे केली. तो गाढव म्हातारा झाला असता, एके दिवशी त्याच्या धन्याने त्याच्या पाठीवर एवढे ओझे लादले की त्याच्या भाराने तो अगदी खचून गेला.

     रस्ता अवघड व खांचखळग्यांचा असल्यामुळे थोडयाच वेळाने त्याच्या पाठीवर लादलेली मातीची भांडी फुटून त्यांचे तुकडे तुकडे झाले.

      हे पाहताच धनी त्याला निर्दयपणाने मारू लागला. त्यावेळी तो गाढव पडल्यापडल्याच आपली मान वर करून त्यास म्हणाला...

     अरे कृतघ्न माणसा! हे सगळे नुकसान होण्यास तुझाच दुष्टपणा कारण आहे. तू पहिल्यापासूनच मला कधीही पोटभर खाऊ घातले नाहीस व माझ्या सामर्थ्यापलीकडे ओझे माझ्या पाठीवर लादलेस, त्याचा हा परिणाम.’

             *🌀❝ तात्पर्य ❞ ::~*
  कित्येक लोक असे कृतघ्न आणि निर्दय असतात, की आपली सेवा प्रामाणिकपणाने करणाऱ्या लोकांसही छळण्यास ते कमी करीत नाहीत.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ] ❂ प्रेरणादायी विचार ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

09. *"जेव्हा माणसाची योग्यता* व
  *हेतूचा प्रामाणिकपणा सिद्ध होतो,*
         *तेव्हा त्याचे शत्रूदेखील*
   *त्याचा सन्मान करू लागतात.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ]   ❂ सामान्य ज्ञान ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

09. *✿ सामान्य ज्ञान प्रश्नावली ✿*
       ◑◑◑◆◑◑●★●◑◑◆◑◑◑

■देवगिरीचा (दौलताबादचा) किल्ला कोणत्या डोंगरात आहे?*

उत्तर:- अजंठा रांगा भाग १

■ गोदावरी व भीमा नदीना वेगळे करणारी रांग कोणती?*

उत्तर:- हरिश्चंद्र -बालाघाट

■ बालाघाट व अजंठा रांगांच्या दरम्यान कोणत्या नदीचे खोरे आहे?*

उत्तर:- गोदावरी

■ मराठवाडयात कोणत्या जिल्ह्यात अधिक तेल गिरण्या आहेत?

उत्तर:- उस्मानाबाद
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ] ❂थोरव्यक्ती परिचय ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

09. ❒ दादोबा पांडुरंग तर्खडकर ❒
     ━━═•●◆●★◆★●◆●•═━━
●जन्म :~ ९ मे, १८१४
●मृत्यू :~ १७ ऑक्टोबर, १८८२

      दादोबा पांडुरंग तर्खडकर तथा
               दादोबा पांडुरंग
    ♦हे मराठी व्याकरणकार, लेखक आणि समाजसुधारक होते. तसेच ते मानवधर्मसभा आणि परमहंससभा ह्या समाजसुधारणेसाठी प्रयत्‍न करणाऱ्या संस्थांचे संस्थापक सदस्य होते.

                 💠 शिक्षण
   🔶दादोबांचे प्राथमिक शिक्षण काही काळ पंतोजींच्या शाळांत झाले. ह्या काळातच त्यांनी आपल्या मित्रांच्या साहाय्याने फार्शी आणि संस्कृत ह्या भाषांचे प्राथमिक ज्ञान संपादित केले. १८२५ मध्ये त्यांना मुंबईच्या हैंदशाळा आणि शाळापुस्तकमंडळीच्या (म्हणजेच दि बॉम्बे नेटिव स्कूल ॲन्ड स्कूल बुक सोसायटीच्या) शाळेत घालण्यात आले. पुढे ह्या शाळेचे नाव एल्फिन्स्टन इन्स्टिट्यूट असे करण्यात आले. १८३५ साली दादोबा त्याच शाळेत "असिस्टंट टीचर" ह्या पदावर कामाला लागले.

                 💠 मराठी व्याकरण
    १८३३मध्ये शाळेत असताना आपणही मराठीचे व्याकरण लिहावे अशी दादोबांना इच्छा झाली. त्यांनी तसे एक व्याकरण प्रश्नोत्तर-स्वरूपात लिहूनही काढले. परंतु त्यांना स्वतःलाच ते न आवडल्याने लिंडली मर्फी ह्याच्या इंग्लिश व्याकरणाच्या धर्तीवर त्यांनी आपले व्याकरण नव्याने लिहून काढले. ह्या व्याकरणाची पहिली आवृत्ती १८३६ साली गणपत कृष्णाजीच्या छापखान्यात छापून महाराष्ट्र भाषेचे व्याकरण ह्या नावाने स्वतः दादोबांनीच प्रकाशित केली.

     १८५० साली शिक्षण विभागाकरता ह्या व्याकरणाची दुसरी आवृत्ती दादोबांनी तयार केली. ही आवृत्ती शाळा खात्याकरता असल्याने मेजर थॉमस कॅन्डी, कृष्णशास्त्री चिपळूणकर ह्यांसारख्या शिक्षण विभागातील समकालीन विद्वानांकडून त्या आवृत्तीचे कसून परीक्षण करण्यात आले. ही आवृत्ती अमेरिकन मिशन प्रेसच्या छापखान्यात छापून प्रकाशित करण्यात आली.

    १८६५ साली दादोबांनी आपल्या व्याकरणाची संक्षिप्त आवृत्ती मराठी लघु व्याकरण ह्या नावाने प्रकाशित केली. हे पुस्तक पुढे बराच काळ शालेय शिक्षणात प्रचलित होते. १८८२पर्यंत ह्या लघु व्याकरणाच्या १२ आव़ृत्त्या प्रकाशित झाल्या. १९४४पर्यंत ह्या ग्रंथांच्या सुमारे १ लाख प्रती विकल्या गेल्या.

     दादोबांच्या मृत्यूपर्यंत महाराष्ट्र भाषेच्या व्याकरणाच्या़ ७ आवृत्त्या प्रकाशित झाल्या. १८७९च्या सातव्या आवृत्तीपर्यंत दादोबा आपल्या व्याकरणात सुधारणा करत राहिले. १८८१ साली दादोबांनी मोठ्या महाराष्ट्र व्याकरणाची पूरणिका हा ग्रंथ प्रकाशित केला. ह्या ग्रंथात आपल्या मोठ्या व्याकरणात समाविष्ट करता न आलेली मराठी भाषेविषयीची निरीक्षणे त्यांनी संकलित केली आहेत.

    दादोजींचे मराठी व्याकरण विषयक कार्य अग्रेसर महत्त्वाचे असून त्यायोगे मराठी गद्याला प्रमाणरूप प्राप्त झाले असल्याने ‘मराठी भाषेचे पाणिनी’ हे रास्त बिरुद त्यांना लावले जाते.

                     *💠आत्मचरित्र*
    तर्खडकरांचे इ.स. १८४६ सालापर्यंतचे आत्मचरित्र हे मराठी आत्मचरित्रात्मक वाङ्मयात महत्त्वाचे आत्मचरित्र मानण्यात येते. हे आत्मचरित्र १९४७मध्ये अ.का. प्रियोळकर यांनी संपादित करून पुन:प्रकाशित केले. अव्वल इंग्रजीतील जवळजवळ एकमेव आत्मचरित्र म्हणून दादोबांच्या आत्मचरित्राचे महत्त्व आहेच. तथापि त्यांच्या काळातील धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय स्थितीचे त्यात पडलेले प्रतिबिंबही अभ्यासकांच्या दृष्टीने मोलाचे आहे. स्वतः दादोबांचे जीवन अशा काही चळवळींशी वेगवेगळ्या प्रकारे निगडित झालेले असले, तरी त्यांच्या आत्मचरित्रातून त्या चळवळींबरोबरच दादोबांचे व्यक्तिमत्त्वही स्पष्टपणे प्रत्ययास येते. साधी भाषाशैली आणि प्रांजळ निवेदन ही ह्या आत्मचरित्राची काही उल्लेखनीय वैशिष्ट्ये आहेत.
      या आत्मचरित्राचे ’दादोबा पांडुरंग यांचे आत्मवृत्त’ नावाचे मराठी रूपांतर झाले आहे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹🔅✹★✹◑◎●••
          *✍संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
   ♦📱 7875840444 ♦
 *✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❃❂❃█║▌║█║▌

*◆ बुधवार ~ 09/05/2018 ◆*
*⋐⋑⛯⋐⋑⋐ MSP ⋑⋐⋑⛯⋐⋑*

No comments:

Post a Comment