"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

🛡 *09. एप्रिल * 🛡

      🛡 *09. एप्रिल * 🛡
🔻====●●●★●●●====🔻
★ जलसंधारण दिन
★ हा या वर्षातील ९९ वा (लीप वर्षातील १०० वा) दिवस आहे.
★ गोव्यामध्ये हा दिवस ’जागतिक कोंकणी भाषा दिन’ म्हणून साजरा केला जातो.

    ~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
  🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९९५ : लता मंगेशकर यांना उत्तर प्रदेशचे राज्यपाल मोतीलाल व्होरा यांच्या हस्ते ’अवधरत्‍न’ व साहू सूरसम्मान’ या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.
●१९९४ : सूक्ष्मजीवशास्त्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल शास्त्रज्ञ पी. एम. भार्गव यांना ’आर. डी. बिर्ला राष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान
●१९६७ : बोइंग-७६७ ने पहिले उड्डाण केले.

    ~*★ जन्मदिवस / जयंती ★*~
  🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१८९३ : राहूल सांकृतायन – इतिहासकार
◆१८८७ : विष्णू गंगाधर तथा ’दादासाहेब’ केतकर – पुणे विद्यार्थी गृहाचे एक संस्थापक
◆१८२८ : गणेश वासुदेव जोशी उर्फ ’सार्वजनिक काका’ – समाजसुधारक, राष्ट्रवादी विचारसरणीचे व स्वदेशी चळवळीचे प्रणेते आणि पुणे सार्वजनिक सभेचे संस्थापक
 (मृत्यू: २५ जुलै १८८०)
◆१३३६ : तैमूरलंग – मंगोल सरदार

     ~*★ मृत्यू / पुण्यतिथी ★*~
    🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००१ : बेहराम कॉन्ट्रॅक्टर ऊर्फ ’बिझी बी’ – पत्रकार व स्तंभलेखक, ’आफ्टरनून डिस्पॅच अँड कुरियर’ या सायंदैनिकाचे संपादक
●२००१ : शंकरराव खरात – दलित साहित्यिक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू (जन्म: ११ जुलै १९२१)
●१९९८ : डॉ. विष्णू भिकाजी तथा वि. भि. कोलते – महानुभाव पंथाचे अभ्यासक, विचारवंत व तत्त्वज्ञ, नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू
●१९९४ : चंद्र राजेश्वर राव – स्वातंत्र्यसैनिक, तेलंगणाच्या लढ्याचे प्रवर्तक, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस 

No comments:

Post a Comment