"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

* 09. मे * 🛡

🔻====●●●★●●●====🔻
★जागतिक थॅलेसेमिया दिन
★ हा या वर्षातील १२९ वा (लीप वर्षातील १३० वा) दिवस आहे.

                 ~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
                🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९९९ : अटलांटा ग्रांप्री नेमबाजी स्पर्धेत भारताच्या रुपी उन्नीकृष्णनने प्रोन गटात रौप्यपदक पटकाविले.
●१९९९ : ग्वाटेमालाच्या ज्युलिओ मार्टिनेझ याने ग्रॅन्ड प्रिक्स स्पर्धेतील वीस किलोमीटर चालण्याची शर्यत शर्यत १ तास १७ मिनिटे व ४६ सेकंदात पूर्ण करुन नवा जागतिक विक्रम प्रस्थापित केला.
●१९५५ : पश्चिम जर्मनीचा ’नाटो’ (North Atlantic Treaty Organisation) मधे प्रवेश

                ~*★ जन्मदिवस / जयंती ★*~
               🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९२८ : वसंत नीलकंठ गुप्ते – समाजवादी कामगारनेते, लेखक व समाजवादाचे अभ्यासक
◆१८८६ : केशवराव मारुतराव जेधे – स्वातंत्र्यसैनिक, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील एक प्रमुख नेते, शेतकरी कामगार पक्षाचे एक संस्थापक.
◆१८६६ : नामदार गोपाळ कृष्ण गोखले – थोर समाजसेवक, काँग्रेसचे अध्यक्ष, संसदपटू, भारत सेवक समाजाचे (Servants of India Society) संस्थापक (मृत्यू: १९ फेब्रुवारी १९१५)
◆१८१४ : दादोबा पांडुरंग तर्खडकर – इंग्लिश व्याकरणकार, ग्रंथकार व धर्मसुधारक,
◆१५४० : महाराणा प्रताप – मेवाडचा सम्राट (मृत्यू: २९ जानेवारी १५९७)

                 ~*★ मृत्यू / पुण्यतिथी ★*~
               🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९९८ : तलत महमूद – पार्श्वगायक व अभिनेता, गझलचे बादशहा
●१९९५ : अनंत माने – पाच तपांहुन अधिक काळ चित्रपटसृष्टीसाठी व्यतीत करणारे व मराठी चित्रपटसृष्टीवर आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणारे दिग्दर्शक. ’पिंजरा’, ’लक्ष्मी’, ’सुशीला’, ’आई’ हे त्यांचे गाजलेले चित्रपट आहेत. ’अनंत आठवणी’ हे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे. (जन्म: २२ सप्टेंबर १९१५)
●१९५९ : कर्मवीर भाऊराव पाटील – शिक्षणतज्ञ, बहुजनसमाजातील तळमळीचे कार्यकर्ते, रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक, पद्मभूषण (जन्म: २२ सप्टेंबर १८८७)
●१९१९ : रेव्हरंड नारायण वामन तथा ना. वा. टिळक – कवी व लेखक
           ●~~●~~●~~◆~~●~~●~~●

No comments:

Post a Comment