"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

*10/05/18 गुरुवारचा परीपाठ*
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
*🌅 _महाराष्ट् शिक्षक पॅनल_* 🌅
 ━━═•●◆●★❂★●◆●•═━━
*Ⓜ💲🅿 _परीपाठ_ Ⓜ💲🅿*
====●●●★♦★●●●====

*❂ दिनांक:~ 10/05/2018 ❂*
       *🔘 वार ~ गुरुवार 🔘*
*⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽⌘⌘⌘*
  *💥🇮🇳 राष्ट्रगीत  🇮🇳💥*
➖➖➖➖➖➖➖➖
    *💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
➖➖➖➖➖➖➖➖
  *💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐ MSP ⋑⋐⋑⛯⋐⋑*

  *💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
       🔘 *"माझी शाळा"* 🔘
   *ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
    🔗🔗👇👇🔗🔗

http://satishborkhade.blogspot.in/?m=1
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ]   ❂ आजचे पंचाग ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

     🍥 *10. मे :: गुरुवार* 🍥
 ━━═•●◆❃★❂★❃◆●•═━━
              वैशाख कृ. १०
       तिथी : कृष्ण पक्ष दशमी,
           नक्षत्र : शतभिषा
      योग : एन्द्र, करण : वणीज,
सूर्योदय : 06:06, सूर्यास्त : 19:03,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ]    ❂ सुविचार ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

10. *कडू घोट प्रेमळ माणसाच्या हातून दिल्यास तो कमी कडू लागतो.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ]    ❂ म्हणी व अर्थ ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

10. कावीळ झालेल्याला सगळे जग पिवळे--
         *★अर्थ ::~*
   पूर्वग्रहदूषित किंवा स्वत: वाईट प्रवृत्ती असलेल्या माणसांना सगळीकडे दोषच दिसत असतात.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ]    ❂ सुभाषीत ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

10. *यथा राजा तथा प्रजा ।*
  ⭐अर्थ ::~ जसा राजा तशी प्रजा.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ]    ❂ दिनविशेष ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

       🛡 *★10. मे★* 🛡
🔻====●●●★●●●====🔻
★हा या वर्षातील १३० वा (लीप वर्षातील १३१ वा) दिवस आहे.

     ~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
   🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९९३ : तीन महिला सदस्य असलेल्या एका तुकडीने माऊंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वोच्‍च शिखर सर केले. त्यातील २३ वर्षाच्या संतोष यादवने हे शिखर दुसर्‍यांदा सर करणारी पहिली भारतीय महिला होण्याचा मान मिळवला.
●१९३७ : स्वातंत्र्यवीर सावरकर यांची  रत्‍नागिरीच्या स्थानबद्धतेतून बिनशर्त मुक्तता
●१९०७ : स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी १८५७ च्या स्वातंत्र्य संग्रामाचा सुवर्णमहोत्सव लंडनमधे साजरा केला.

   ~*★ जन्मदिवस / जयंती ★*~
   🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९४० : माणिकराव गोडघाटे ऊर्फ ’ग्रेस’ –  नामवंत साहित्यिक आणि सिध्दहस्त कवी व गीतकार
◆१९३२ : जगदीश खेबूडकर – गीतकार व कवी
◆१९२७ : नयनतारा सहगल – भारतीय लेखिका
◆१९१८ : रामेश्वरनाथ काओ – रिसर्च अँड अ‍ॅनॅलेसिस विंग (RAW) या भारतीय गुप्तचर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष. काओ यांना भारतीय गुप्तचर यंत्रणेचे अध्वर्यू मानण्यात येते.
◆१९०९ : बेल्लारी शामण्णा केशवन – आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ग्रंथालयशास्त्रज्ञ, पद्मश्री, ’इंडियन नॅशनल सायंटिफिक डॉक्युमेंटेशन सेंटर’चे पहिले संचालक

      ~*★ मृत्यू / पुण्यतिथी ★*~
  🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००२ : सय्यद अख्तर हुसेन रिझवी ऊर्फ ’कैफी आझमी’ – गीतकार
●२००१ : सुधाकरराव नाईक – महाराष्ट्राचे १३ वे मुख्यमंत्री, हिमाचल प्रदेशचे राज्यपाल
●२००० : नागोराव घन:श्याम तथा ‘ना. घ.‘ देशपांडे – कवी
●१९९८ : यदुनाथ दत्तात्रय थत्ते – पत्रकार, समाजसेवक, लेखक, चरित्रकार’ ’साधना’ मासिकाचे संपादक
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
   💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व "मुख्य मराठी" बातम्या
 वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..

     https://goo.gl/8D33ox
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0६ ]    ❂ बोधकथा ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

10.     *❃❝ मानवसेवा ❞❃*
     ━━═•●◆●★★●◆●•═━━
      एका मोठ्या शहरात भगवान श्रीविष्‍णुचे मोठे मंदिर होते. रोज अनेक भक्त त्‍या मंदिरात दर्शनासाठी येत असत. हळूहळू मंदिराची ख्‍याती वाढू लागली, भक्तांची गर्दी होऊ लागली, मंदिराचा विस्‍तार होऊ लागला मग काही लोकांनी ठरविले भगवान विष्‍णुला एक सोन्‍याचा मुकुट करावा. त्‍यासाठी निधी गोळा करण्‍याचे ठरविले. गावाच्‍या बाजूलाच एक अनाथ, अपंग मुलांचा आश्रम होता. त्‍या आश्रमालाही गावातील काही लोक दानधर्म करत. गावात भिकुशेठ नावाचे एक श्रीमंत सावकार राहत होते. भिकुशेट आपल्‍या पैशातून, नफ्यातून काही वाटा हा दानधर्मासाठी वापरत असत. भक्तमंडळींना वाटले की भिकुशेटसारखा दिलदार मनाचा माणूस आपल्‍याला मदत करेल. सगळे मिळून भिकुशेटकडे गेले. भक्तमंडळीना आपल्‍या पेढीवर आलेले पाहून भिकुशेटला मोठा आनंद झाला. त्‍यांनी भक्तांचा मोठा आदरसत्‍कार केला. लोकांनी भगवान श्रीविष्‍णुसाठी सोन्‍याचा मुकुट करण्‍याचे सांगितले व भिकुशेटकडून मदतीची मागणी केली. यावर भिकुशेट म्‍हणाले, मंडळी मी तुमच्‍या कामात काही मदत करू शकत नाही कारण मी विष्‍णुला सोन्‍याचा मुकुट करण्‍यापेक्षा चांदीचे पाय करण्‍याचा विचार करत आहे. लोक म्‍हणाले आम्‍हाला निश्चित काय ते खरे सांगा. भिकुशेट सर्वांना दोन दिवसांनी येण्‍यासाठी सांगितले. दोन दिवस निघुन गेले. लोक पुन्‍हा भिकुशेटच्‍या पेढीवर गेले असता भिकुशेटच्‍या शेजारी एक लहान मुलगा बसला होता. भिकुशेटने त्‍या मुलाला उठायला सांगितले. त्‍या मुलाला दोन्‍ही पाय नव्‍हते. मग भिकुशेटच्‍या नोकराने एका पेटीतून दोन वस्‍तू काढल्‍या ते कृत्रिम पाय होते ते त्‍या नोकराने त्‍या अपंग मुलाला व्‍यवस्थितपणे बसविले. मुलगा हळूहळू चालू लागला. भिकुशेट म्‍हणाले, भक्तांनो, या मुलाचे नाव विष्‍णु, हा अपंग असून अनाथ आहे. याला पाय नव्‍हते म्‍हणून मी शहरातून हे पाय विकत आणले असून तो आता हिंडू फिरू शकतो. त्‍या विष्‍णुला सोन्‍याचा मुकुटाचा तसा फारसा उपयोग नव्‍हता पण या विष्‍णुला पायांची गरज होती. मी याला दिलेले कृत्रिम पाय याच्‍या दृष्‍टीने सोन्‍याचांदीपेक्षा जास्‍त महत्‍वाचे आहेत.

      *🌀❝ तात्पर्य ❞ ::~*
 मानवसेवा हीच खरी ईश्‍वरसेवा..!!
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ] ❂ प्रेरणादायी विचार ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

10.   पैशाने पुर्ण झालेली स्वप्न,
           मरेपर्यत टिकतात....

       कष्टाने पुर्ण झालेली स्वप्न,
           इतिहास घडवतात...!!
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ]   ❂ सामान्य ज्ञान ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

10. *✿ सामान्य ज्ञान प्रश्नावली ✿*
       ◑◑◑◆◑◑●★●◑◑◆◑◑◑

■ औरंगजेबाची समाधी कोठे आहे?

उत्तर:- खुलताबाद

■ महाराष्ट्राची दक्षिण गंगा कोणती?

उत्तर:- गोदावरी

■ 'Planned Economy for India' (भारतासाठी नियोजीत अर्थव्यवस्था) हा ग्रंथ कोणी लिहीला?*

उत्तर:- एम. विश्वेश्वरैय्या

■ १९३६ मध्ये 'नियोजन करा अन्यथा नष्ट व्हा' असा संदेश कोणी दिला?*

उत्तर:- एम. विश्वेश्वरैय्या
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ] ❂थोरव्यक्ती परिचय ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

 10.    *❒ माणिक गोडघाटे ❒* 
    ━━═•●◆●★◆★●◆●•═━━
●जन्म :~ १० मे १९३७
●मृत्यू :~  २६ मार्च २०१२
★नाव :~ माणिक सीताराम गोडघाटे
               (कवी ग्रेस)

      नामवंत साहित्यिक आणि सिध्दहस्त कवी असलेल्या माणिक सीताराम गोडघाटे ऊर्फ कवी ग्रेस

     “इन्ग्रिड बर्गमन“ या पाश्चात्य अभिनेत्रीच्या अभिनयाने प्रभावित होऊन माणिक गोडघाटेंनी “ग्रेस” हे साहित्यिक नाव धारण केले होते. मर्ढेकरोत्तर नवकवींच्या दुसर्‍या पिढीतील प्रमुख कवींमध्ये यांची गणना होते. ग्रेस यांचे वडील लष्करी व्यवसायात होते. त्यांची रसिकता कर्नल बाग या नागपुरातील वस्तीत त्यांचे कुटुंब राहत होते. ग्रेस यांचे सुरुवातीचे जीवन कष्टमय होते. आईच्या अकाली निधनामुळे घराची जबाबदारी त्यांना स्वीकारावी लागली तसंच नोकरी आणि शिक्षणासाठी सुध्दा प्रचंड संघर्ष करावे लागले. डॉ. लीला माटे यांच्याशी विवाह झाल्यानंतरही हा संघर्ष सुरूच राहिला. एम. ए. ची परीक्षा जवळ आलेली असताना त्यांना बसचा अपघात झाला.

    १९६६ मध्ये मराठी विषयातील “ना. के. बेहरे सुवर्णपदक” जिंकून नागपूर विद्यापीठातून माणिक गोडघाटे एम. ए. झाले. प्लास्टर लावलेल्या हातांनी त्यांनी प्रमाणपत्र आणि सुवर्णपदक घेतले.

    १९६६ ते १९६८ या काळात नागपूरच्या धनवटे नॅशनल कॉलेजमध्ये अधिव्याख्याता म्हणून त्यांनी काम केले, तर १९६८ पासून ते नागपूरच्याच वसंतराव नाईक समाजविज्ञान संस्थेत (मॉरिस कॉलेज) मराठीचे अध्यापन करू लागले. प्राध्यापक म्हणून १९९७ मध्ये ते सेवानिवृत्त झाले. त्यानंतर २००४ पर्यंत नागपूरच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठातील मराठी व ललित कला विभागात संशोधन मार्गदर्शक म्हणून ते कार्यरत होते, तसंच “सौंदर्यशास्त्र” या विषयाचे अध्यापनही ग्रेस यांनी विद्यापीठात त्यांनी केले. १९७१ ते १९७६ या काळात दिल्लीच्या भारतीय साहित्य अकादमीच्या मराठी सल्लागार समितीचे ते सदस्य होते, तर “महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळा”चे १९८२ ते १९८६ या काळात ते सदस्य होते.

     त्यांचे पाच काविता व सात ललितलेखसंग्रह आजवर प्रकाशित झाले असून यामध्ये “संध्याकाळच्या कविता“, “राजपुत्र आणि डार्लिंग”, “चर्चबेल”, “मितवा”, “सांध्यपर्वातील”, “वैष्णवी”, “सांजभयाच्या साजणी”, “ओल्या वेळूची बासरी”, “असे रंग आणि ढगांच्या किनारी”, “अज्ञेयाहून गूढ गूढ दिसती झाडातली वर्तुळे”, “आठवण”, “कंठात दिशांचे हार”, “कर्णधून”, “कर्णभूल” या नावाने प्रसिध्द झालेले साहित्य लोकप्रिय ठरले आहे.

     वेळोवेळी दर्जेदार वाड्मयाची निर्मिती केल्याबद्दल तसंच क्षेत्राला दिलेल्या अमूल्य योगदानासाठी ग्रेस यांना अनेक पुरस्काराने सन्मानित केले गेले आहे ज्यामध्ये “जी. ए. कुलकर्णी सन्मान पुरस्कार”, “महाराष्ट्र शासन उत्कृष्ट वाङ्मयनिर्मिती पुरस्कार, चंद्रमाधवीचे प्रदेश (काव्य)”, “महाराष्ट्र शासन उत्कृष्ट वाङ्मयनिर्मिती पुरस्कार, चर्चबेल (ललितबंध)”, “महाराष्ट्र शासन उत्कृष्ट वाङ्मयनिर्मिती पुरस्कार, संध्याकाळच्या कविता (काव्य)”, “वाग्विलासिनी पुरस्कार, दीनानाथ मंगेशकर प्रतिष्ठान, पुणे”, २०११ सालचा “विदर्भ भूषण पुरस्कार”,”नागभूषण फाऊंडेशन चा नागभूषण पुरस्कार”, “विदर्भ साहित्य संघ नागपूर चा “जीवनव्रती पुरस्कार”, “दमाणी पुरस्कारांचा” समावेश आहे;

    सर्वात महत्त्वाचे म्हणजे ग्रेस यांच्या “वार्‍याने हलते रान” ह्या ललितलेख संग्रहासाठी त्यांना २०११ सालचा साहित्य अकादमी पुरस्कार देऊन गौरवण्यात आले होते; तर २०१२ साली आयोजित करण्यात आलेल्या ई-साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद देखील कवी ग्रेस यांनी भुषविले होते.

     विशेष म्हणजे डॉ. जया मेहता यांनी ग्रेस यांच्या “चर्चबेल” व “मितवा” या ललित लेखसंग्रहांचे गुजरातीत भाषांतर केले असून, ग्रेस यांच्या काही निवडक कवितांचे डॉ. उमाशंकर जोशी यांनी गुजरातीत अनुवादित केलेल्या आहेत.

    प्रसिद्ध संगीतकार हृदयनाथ मंगेशकर यांच्यासोबत काव्यगायन आणि विवेचन अशा द्विदल कार्यक्रमाचे सादरीकरण कवी ग्रेस यांनी २००८ मध्ये सुरू केले. इचलकरंजी येथे “मैत्र जीवाचे” या नावाने अशा द्विदल कार्यक्रमांचा पहिला प्रयोग सादर झाला होता.

    कर्करोगाशी सुमारे तीन वर्षे लढा दिल्यानंतर अखेर वयाच्या पंचाहत्तराव्या वर्षी म्हणजे २६ मार्च २०१२ या दिवशी ग्रेस यांचे पुण्यात निधन झाले.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹🔅✹★✹◑◎●••
         *✍संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
   ♦📱 7875840444 ♦
 *✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❃❂❃█║▌║█║▌

*◆ गुरुवार ~ 10/05/2018 ◆*
*⋐⋑⛯⋐⋑⋐ MSP ⋑⋐⋑⛯⋐⋑*

No comments:

Post a Comment