"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

*11/05/18 शुक्रवारचा परीपाठ*
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
*🌅 _महाराष्ट् शिक्षक पॅनल_* 🌅
 ━━═•●◆●★❂★●◆●•═━━
*Ⓜ💲🅿 _परीपाठ_ Ⓜ💲🅿*
====●●●★♦★●●●====

*❂ दिनांक:~ 11/05/2018 ❂*
       *🔘 वार ~ शुक्रवार 🔘*
*⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽⌘⌘⌘*
  *💥🇮🇳 राष्ट्रगीत  🇮🇳💥*
➖➖➖➖➖➖➖➖
    *💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
➖➖➖➖➖➖➖➖
  *💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐ MSP ⋑⋐⋑⛯⋐⋑*

  *💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
       🔘 *"माझी शाळा"* 🔘
   *ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
    🔗🔗👇👇🔗🔗

http://satishborkhade.blogspot.in/?m=1
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ]   ❂ आजचे पंचाग ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

     🍥 *11. मे :: शुक्रवार* 🍥
 ━━═•●◆❃★❂★❃◆●•═━━
              वैशाख कृ. ११
       तिथी : कष्ण पक्ष एकादशी,
            नक्षत्र : पूर्वभाद्रपदा,
        योग : वैद्रुति, करण : बव,
सूर्योदय : 06:06, सूर्यास्त : 19:04,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ]    ❂ सुविचार ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

11.   विचारवंत होण्यापेक्षा आचारवंत व्हा..!
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ]    ❂ म्हणी व अर्थ ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

11.   आडात नाही तर पोहऱ्यात
                कोठून येणार ?
     ★ अर्थ ::~ जर स्वत:जवळ एखादी वस्तू नसेल तर ती वस्तू दुसऱ्यास कशी देणार ?
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ]    ❂ सुभाषीत ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

11.    त्वमेव माता च पिता त्वमेव
          त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव
   त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव
   त्वमेव सर्वं मम देव देव ॥
    *⭐अर्थ :: ~* हे परमेश्वरा, तूच माझी आई, तूच माझा पिता, माझा भाऊ, तूच माझा मित्र, तूच विद्या, धन आणि तूच माझे सर्वस्व आहेस.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ]    ❂ दिनविशेष ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

      🛡 *★11. मे★* 🛡
🔻====●●●★●●●====🔻
★राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन
★हा या वर्षातील १३१ वा (लीप वर्षातील १३२ वा) दिवस आहे.

     ~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
   🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९९८ : २४ वर्षांनंतर भारताने पुन्हा राजस्थानच्या वाळवंटातील पोखरणच्या परिसरात हायड्रोजन बॉम्बनिर्मितीसाठीच्या साधनासह तीन यशस्वी आण्विक चाचण्या केल्या.
●१८८८ : मुंबईतील मांडवी येथील कोळीवाड्यात थोर समाजसुधारक जोतिबा फुले यांना रावबहादूर वड्डेदार यांनी ’महात्मा’ ही पदवी दिली.
●१८५७ : राष्ट्रीय उठाव – भारतीयांनी ब्रिटिशांकडून दिल्ली ताब्यात घेतली.

   ~*★ जन्मदिवस / जयंती ★*~
   🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९६० : सदाशिव अमरापूरकर – अभिनेता
◆१९१८ : रिचर्ड फाइनमन – क्‍वांटम इलेक्ट्रोडायनॅमिक्स मधील मूलभूत संशोधनाबद्दल नोबेल पारितोषिक मिळवणारे अमेरिकन पदार्थवैज्ञानिक
◆१९१४ : ज्योत्स्‍ना भोळे – संगीत रंगभूमीला नवचैतन्य देणार्‍या गायिका आणि अभिनेत्री.

      ~*★ मृत्यू / पुण्यतिथी ★*~
  🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००४ : कृष्णदेव मुळगुंद – चित्रकार व नृत्यदिग्दर्शक
●१८७१ : सर जॉन विल्यम हर्षेल – ब्रिटिश गणितज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ, रॉयल अ‍ॅस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचा संस्थापक
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
   💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व "मुख्य मराठी" बातम्या
 वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..

     https://goo.gl/8D33ox
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0६ ]    ❂ बोधकथा ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

11.       *❃❝ सचोटी ❞❃*
     ━━═•●◆●★★●◆●•═━━
      एका साधूला पितळेच्‍या धातूचे सोन्‍यात रूपांतर करण्‍याची कला अवगत होती. पण याचा उपयोग तो गरजुंना करण्‍यासाठीच करत होता. एकेदिवशी एक गरीब ब्राह्मण त्‍याच्‍याकडे आला. त्‍याला मुलीच्‍या लग्‍नासाठी पैशांची आवश्‍यकता होती. साधूने त्‍याची अडचण ओळखून त्‍याला एका पितळेच्‍या भांड्याचे रूपांतर सोन्‍यात करून दिले. ब्राह्मण सोनाराकडे गेला. सोनाराला त्‍याच्‍याकडे सोन्‍याचे भांडे पाहून मनात संशय आला. सोनार राजाकडे गेला.राजाने त्‍याची चौकशी केली केली तेव्‍हा ब्राह्मणाने खरी घटना सांगितली. राजाच्‍या मनात लोभाची भावना उत्‍पन्न झाली. त्‍याने साधूला ती विद्या शिकविण्‍याचे फर्मान काढले. साधूने राजाला ठामपणे नकार सांगितला. राजाने साधूला 15‍ दिवसांची मुदत दिली अन्‍यथा फासावर लटकावेन अशी धमकी दिली. राजा त्‍याच्‍याकडून काय उत्तर येते यासाठी दूत पाठवित असे पण साधू काही होकार देईना. हे पाहून राजाने वेश पालटला व तो साधूच्‍या येथे राहून त्‍याची सेवा करू लागला. साधूने राजाच्‍या सेवेवर प्रसन्न होऊन त्‍याला पितळापासून सोने तयार करण्‍याची विद्या शिकविली. राजा महालात परतला. पंधराव्‍या दिवशी साधूला बोलावून त्‍याला विद्या शिकविण्‍याची आज्ञा केली. साधूने परत नकार दिला. तेव्‍हा राजा गर्वाने म्‍हणाला,’’ साधू तू मला कला शिकवली नसती हे मी जाणून होतोच पण मी ही हट्टी आहे. मी पण तुझ्याजवळ राहून ती कला शिकून तयार झालो आहे.’’ साधू म्‍हणाला,’’महाराज तुम्‍ही माझी सेवा करून ती कला शिकला आहात, धमकी देऊन नाही. ज्ञानासाठी गुरुची मर्जी सांभाळावी लागते.’’
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ] ❂ प्रेरणादायी विचार ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

11. एका ठराविक वयानंतर आपल्याला कोणीही विचारत नाही;
   की तुमची प्राॅपर्टी किती, गाड्या किती,बँक बॅलन्स किती ?
  परंतु एक गोष्ट नक्की विचारली जाते की तुमची तब्येत कशी आहे,
    *म्हणून जी गोष्ट विचारली जाते
त्यात योग्य गुंतवणूक करु.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ]   ❂ सामान्य ज्ञान ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

11. *✿ सामान्य ज्ञान प्रश्नावली ✿*
       ◑◑◑◆◑◑●★●◑◑◆◑◑◑
■ महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मुख्यालय
⇛अकोला

■ पाणी व जमीन व्यवस्थापन संस्था*
⇛औरंगाबाद

■ महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था
 ⇛(MERI)नाशिक

■ महाराष्ट्रातील सोने शुध्दीकरण कारखाना
⇛शिरपूर (धुळे)

■ महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ मुख्यालय
⇛  पुणे
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ] ❂थोरव्यक्ती परिचय ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

11.  *❒ ♦अरूण दाते♦ ❒* 
     ━━═•●◆●★◆★●◆●•═━━
सुप्रसिद्ध भावगीत गायक

       लता मंगेशकर, आशा भोसले, सुमन कल्याणपूर, सुधा मल्होत्रा, अनुराधा पौडवाल, कविता कृष्णमूर्ती या सगळ्यांबरोबर द्वंद्वगीते गाणारे अरूण दाते हे मराठीतील बहुधा एकमेव गायक असावेत. ‘शतदा प्रेम करावे’ या त्यांच्या आत्मचरित्रात त्यातील कितीतरी आठवणी अत्यंत रंजक आहेत. गजाननराव वाटवे त्यांच्या कार्यक्रमात केवळ स्वत: गायलेली गीतेच सादर करीत असत. त्यांचा हा परिपाठ अरूण दातेही पुढे चालवीत आहेत. केवळ स्वत: गायलेल्या गीतांचाच कार्यक्रम ते सादर करत असतात आणि रसिक त्यांची तीच गाणी ऐकायला पुन्हा पुन्हा उत्सुक असतात.

    यशवंत देव, मंगेश पाडगावकर आणि अरूण दाते या त्रिकुटाने मराठी भावगीताला पुन्हा एकवार झळाळी प्राप्त करून दिली. श्रीनिवास खळे, हृदयनाथ मंगेशकर यांच्यासारख्या दिग्गजांनाही अरूण दाते यांच्या आवाजावर स्वत:च्या रचना चढवण्याचा मोह आवरता आला नाही. त्यातूनच ‘भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी’, ‘सूर मागू तुला मी कसा’, ‘स्वरगंगेच्या काठावरती वचन दिले तू मला’, ‘या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे’, ‘भेट तुझी माझी स्मरते’, ‘अखेरचे येतील माझ्या, तेच शब्द ओठी’ यासारख्या सुंदर रचना दाते यांच्या गळ्यातून थेट रसिकांच्या हृदयात जाऊन पोहोचल्या.
मराठी भावगीतांचे ‘बादशहा’ गजाननराव वाटवे यांच्या नावाने मिळणाऱ्या पहिल्या पुरस्काराचे मानकरी होण्याचा मान अरूण दाते यांना मिळणे स्वाभाविकच म्हटले पाहिजे. आपल्या भावासारखा असलेल्या आणि भारतीय संगीतात अत्यंत मोलाची भर घालणाऱ्या प्रतिभावान अशा कुमार गंधर्वाकडेच जर स्वरांचे पहिले धडे गिरवण्याची संधी मिळाली, तर त्याचे सोने का होणार नाही? तरुणपणात मुंबईला टेक्स्टाइल इंजीनिअरची पदवी मिळवण्यासाठी ते जेव्हा गेले, तेव्हा ते गायला लागले आहेत, याचा साक्षात्कार त्यांचे वडील रामूभय्यांना झाला होता. साक्षात पु. ल. देशपांडे यांनीच हे गुपित त्यांच्या कानी घातले होते. त्यामुळे परीक्षेत पहिल्यांदा नापास होण्याचा दुर्धर प्रसंग ओढवला,
तेव्हा वडिलांना कसे सांगायचे या चिंतेत असलेल्या अरूण दाते यांना मोठाच धक्का बसला. नापास होण्याबद्दल काही बोलण्याऐवजी रामूभय्या त्यांना म्हणाले, ‘टेक्स्टाइल इंजीनिअर होणारे अनेक जण आहेत, तूही होशील, पण तुझ्यासारखे गाणे किती जणांना येते, ते सांग!’ त्यामुळे यशस्वी टेक्स्टाइल इंजीनिअर म्हणून उत्तम कारकीर्द सुरू असताना वयाच्या पन्नाशीत म्हणजे १९८४ मध्ये पूर्ण वेळ भावगीत गायनाला वाहून घेण्याचा, त्यांनी घेतलेला निर्णय रसिकांसाठी फार मोलाचा ठरला.

     के. महावीर यांच्याकडे संगीताचे शिक्षण घेत असतानाच १९५५ पासून आकाशवाणीवर गायन सुरू असले, तरीही पदार्पणात रसिकांची भरभरून मिळालेली पावती दाते यांच्या पुढील कारकीर्दीसाठी महत्त्वाची ठरली. १९६२ मध्ये ‘शुक्रतारा मंदवारा’ हे त्यांचे पहिले गीत ध्वनिमुद्रिकेच्या रूपाने बाहेर आले आणि त्यानंतर आजपर्यंत अरूण दाते यांना जराही उसंत मिळालेली नाही. ‘शुक्रतारा’ याच नावाने ते करीत असलेल्या भावगीत गायनाच्या कार्यक्रमाचे आजवर जगभरात एकूण २५०० प्रयोग झाले आहेत आणि आजही हा प्रयोग ‘हाऊसफुल्ल’चा धनी असतो. त्यांचे मराठी आणि उर्दूतील पंधरा अल्बम आजही लोकप्रियतेच्या शिखरावर आहेत. 
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹🔅✹★✹◑◎●••
             *✍संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
   ♦📱 7875840444 ♦
 *✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❃❂❃█║▌║█║▌

*◆ शुक्रवार ~ 11/05/2018 ◆*
*⋐⋑⛯⋐⋑⋐ MSP ⋑⋐⋑⛯⋐⋑*

No comments:

Post a Comment