"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

🛡 * 11. जून * 🛡

 🔻====●●●★●●●====🔻
★हा या वर्षातील १६२ वा (लीप वर्षातील १६३ वा) दिवस आहे.

                ~*🔺महत्त्वाच्या घटना 🔺*~
                 🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००७ : बांगलादेशातील चितगावमधे भूस्खलनामुळे १३० लोक ठार झाले.
●१९९७ : पंतप्रधान इंद्रकुमार गुजराल यांच्या उपस्थितीत 'सुखोई-३० के' ही रशियन बनावटीची विमाने भारतीय हवाई दलात दाखल झाली.
●१९७० : अ‍ॅना मे हेस आणि एलिझाबेथ पी. हॉइसिंग्टन या अमेरिकन सैन्यातील पहिल्या स्त्री जनरल झाल्या.
●१९३७ : जोसेफ स्टालिनने आपल्याच ८ लष्करी अधिकार्‍यांना ठार केले.
●१८६६ : अलाहाबाद उच्‍च न्यायालयाची स्थापना
●१६६५ : मिर्झा राजे जयसिंग व शिवाजी महाराज यांच्यात पुरंदरचा तह झाला.

                 ~*★जन्मदिवस / जयंती★*~
                  🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९४७ : लालूप्रसाद यादव – केंद्रीय मंत्री व बिहारचे मुख्यमंत्री
◆१८९७ : राम प्रसाद बिस्मिल – क्रांतिकारक (मृत्यू: १९ डिसेंबर १९२७)
◆१८९४ : काइचिरो टोयोडा – टोयोटा मोटर कंपनीचे संस्थापक

                   ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
                 🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००० : राजेश पायलट – केंद्रीय मंत्री
●१९९७ : मिहिर सेन – इंग्लिश खाडी पोहुन जाणारे पहिले भारतीय
●१९५० : पांडुरंग सदाशिव साने ऊर्फ ’साने गुरूजी’ – नामवंत साहित्यिक, बालसाहित्यिक, समाजवादी नेते, समाजसुधारक व स्वातंत्र्यसैनिक. त्यांचे ’श्यामची आई’ हे पुस्तक प्रकाशनक्षेत्रातील सर्व विक्रम मोडणारे ठरले आहे. (जन्म: २४ डिसेंबर १८९९)
●१९२४ : वासुदेव वामन तथा ’वासुदेवशास्त्री’ खरे – इतिहासाचार्य, लेखक, नाटककार व कवी
●१७२७ : जॉर्ज (पहिला) – इंग्लंडचा राजा. याला इंग्लिश आजिबात येत नसे व तो दुभाषांमार्फत दरबार्‍याशी संपर्क साधत असे किंवा लॅटिनमध्ये त्याचे म्हणणे मांडत असे.

No comments:

Post a Comment