"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

🛡 ★ 12. नोव्हेंबर ★ 🛡

  🔻====●●●★●●●====🔻
★ राष्ट्रीय सार्वजनिक प्रसारण दिन
★ हा या वर्षातील ३१६ वा (लीप वर्षातील ३१७ वा) दिवस आहे.

                 ~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
               🔹•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔹
●२००० : १२ नोव्हेंबर हा दिवस *’राष्ट्रीय सार्वजनिक प्रसारण दिन’* म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. १९४७ मधे याच दिवशी महात्मा गांधी यांचे दिल्ली आकाशवाणीवरुन भाषण प्रसारित झाले होते.
●२००० : भारताची वूमन ग्रँडमास्टर विजयालक्ष्मी सुब्रम्हण्यम हिने तुर्कस्तानातील इस्तंबूल येथे झालेल्या ३४ व्या बुद्धीबळ ऑलिम्पियाडमधे वैयक्तिक रौप्यपदक मिळवले.
●१९९८ : परदेशात स्थायिक झालेल्या भारतीयांना व्हिसाशिवाय मायदेशी येण्याची सुविधा देणारी 'पर्सन्स ऑफ इंडियन ओरिजीन’ (PIO) ओळखपत्र योजना कार्यान्वित करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी जाहीर केले. १५ सप्टेंबर २००२ पासून या योजनेच्या अंमलबजावणीस प्रtत्यक्ष सुरुवात झाली.
●१९३० : पहिल्या गोलमेज परिषदेची सुरूवात झाली.
●१९१८ : ऑस्ट्रिया प्रजासत्ताक बनले.

                    ~*★जन्मदिवस / जयंती★*~
                   🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९४० : अमजद खान – हिन्दी चित्रपटसृष्टीतील नावाजलेले खलनायक
◆१९०४ : श्रीधर महादेव तथा एस. एम. जोशी – समाजवादी, कामगार नेते, पत्रकार, संयूक्त महाराष्ट्र चळवळीचे अध्वर्यू (मृत्यू: १ एप्रिल १९८९)
◆१८९६ : डॉ. सलीम अली – जागतिक कीर्तीचे पक्षीतज्ञ, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे (BNHS) एक संस्थापक (मृत्यू: २७ जुलै १९८७)
◆१८८० : पांडुरंग महादेव तथा ’सेनापती’ बापट – सशस्त्र क्रांतिकारक, तत्त्वचिंतक व लढाऊ समाजसेवक (मृत्यू: २८ नोव्हेंबर १९६७)

                    ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
                   🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००५ : प्रा. मधू दंडवते – रेल्वे मंत्री, महाराष्ट्र विधानपरिषदेचे सदस्य, अर्थतज्ञ (जन्म: २१ जानेवारी १९२४)
●१९५९ : सेवानंद गजानन नारायण तथा बाळूकाका कानिटकर – अनाथ विद्यार्थी गृहाचे एक संस्थापक
●१९५९ : केशवराव मारुतराव जेधे – स्वातंत्र्यसैनिक, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील एक प्रमुख नेते, शेतकरी कामगार पक्षाचे एक संस्थापक.
●१९४६ : पण्डित मदन मोहन मालवीय – बनारस हिन्दू विश्वविद्यालयाचे एक संस्थापक (जन्म: २५ डिसेंबर १८६१)

No comments:

Post a Comment