"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

🛡 * 12. मे * 🛡

🔻====●●●★●●●====🔻
★जागतिक परिचारिका दिन
★हा या वर्षातील १३२ वा (लीप वर्षातील १३३ वा) दिवस आहे.

                ~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
                🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२०१० : एस. एच. कपाडीया यांनी भारताचे ३८ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
●१९९८ : केन्द्र सरकारी कर्मचार्‍यांचे निवृत्तीचे वय ५८ वर्षांवरुन वरुन ६० वर्षे करण्याचा केन्द्र सरकारचा निर्णय
●१९९८ : भाषातज्ज्ञ आणि वैदिक संस्कृतीचे अभ्यासक रामचंद्र नारायण दांडेकर यांना ’बिर्ला अ‍ॅकॅडमी ऑफ आर्ट अँड कल्चर’ या संस्थेचा जी. डी. बिर्ला आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर
●१९५५ : दुसरे महायुद्ध संपल्यावर ऑस्ट्रियाने दोस्त राष्ट्रांकडून स्वातंत्र्य मिळवले.
●१९५२ : प्रजासत्ताक भारताच्या संसदेचे पहिले अधिवेशन सुरू झाले.
●१९०९ : 'सेवानंद' बाळुकाका कानिटकर, डॉ. गजानन श्रीपत तथा अण्णासाहेब खेर आणि वि. ग. केतकर यांनी पुणे अनाथ विद्यार्थी गृहाची स्थापना केली. या संस्थेमुळे महाराष्ट्रातील हजारो गरजू मुलांचे शिक्षणाचे स्वप्न पूर्ण झाले. पुढे संस्थेच्या नावातील अनाथ हा शब्द वगळून संस्थेचे नाव पुणे विद्यार्थी गृह असे करण्यात आले.
●१७९७ : पहिले महायुद्ध – नेपोलिअनने व्हेनिस जिंकले.
●१६६६ : आग्रा येथे शिवाजी महाराज व औरंगजेब यांची पहिली व शेवटची भेट झाली.

                 ~*★ जन्मदिवस / जयंती ★*~
                   🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९०७ : विजयशंकर जग्नेश्वर तथा विजय भट – चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व पटकथालेखक,
फिल्म अँड टेलिव्हिजन प्रोड्युसर्स गिल्ड ऑफ इंडिया’ या संस्थेचे ते संस्थापक सदस्य होते.
◆१९०५ : आत्माराम रावजी भट – कृतिशील विचारवंत, ’मराठा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज’चे संस्थापक
◆१८९९ : इंद्रा देवी – लाटव्हियाच्या योगशिक्षिका
◆१८९५ : जे. कृष्णमूर्ती – भारतीय तत्त्वज्ञ (मृत्यू: १७ फेब्रुवारी १९८६)
◆१८२० : आधुनिक शुश्रूषा शास्त्राचा (नर्सिंग) पाया घालणार्‍या ब्रिटिश परिचारिका फ्लॉरेन्स नायटिंगेल यांचा जन्म.

                   ~*★ मृत्यू / पुण्यतिथी ★*~
                  🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१८८९ : जॉन कॅडबरी – ब्रिटिश उद्योगपती व ’कॅडबरी’ चे संस्थापक
●२०१० : तारा वनारसे (रिचर्डस) – लेखिका
           ●~~●~~●~~◆~~●~~●~~●

No comments:

Post a Comment