"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

🛡 * 12. जुलै * 🛡

🔻====●●●★●●●====🔻
★हा या वर्षातील १९३ वा (लीप वर्षातील १९४ वा) दिवस आहे.

                 ~*🔺महत्त्वाच्या घटना 🔺*~
                🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००१ : कृषीशास्त्रज्ञ डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांना ’टिळक पुरस्कार’ जाहीर
●१९९९ : ’महाराष्ट्र भूषण’ हा राज्याचा सर्वोच्‍च पुरस्कार सुनील गावसकर यांना प्रदान करण्यात आला.
●१९९५ : अभिनेते दिलीपकुमार यांना ’दादासाहेब फाळके पुरस्कार’ जाहीर
●१९८२ : राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेची (NABARD) स्थापना
●१९६१ : मुठा नदीच्या आंबी या उपनदीवरील पानशेत व खडकवासला ही धरणे फुटल्यामुळे पुण्यात आलेल्या पुरात सुमारे २,००० लोक मृत्यूमुखी पडले तर १,००,००० लोक विस्थापित झाले.
●१७९९ : रणजितसिंग यांनी लाहोर ताब्यात घेतले व ते पंजाबचे सम्राट झाले.
●१६७४ : शिवाजी महाराजांनी इंग्रजांशी मित्रत्त्वाचा तह केला.

                    ~*★जन्मदिवस / जयंती★*~
                    🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९६५ : संजय मांजरेकर – क्रिकेटपटू
◆१९२० : यशवंत विष्णू चंद्रचूड – सर्वोच्‍च न्यायालयाचे १६ वे सरन्यायाधीश
◆१९१३ : मनोहर माळगावकर – इंग्रजी लेखक
◆१८६४ : वि. का. राजवाडे – इतिहासाचार्य
◆१८६४ : जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर – अमेरिकन वनस्पतीतज्ञ, शिक्षणतज्ञ, संशोधक आणि शास्त्रज्ञ

                       ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
                      🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२०१३ : प्राण कृष्ण सिकंद ऊर्फ ’प्राण’ – चित्रपट अभिनेता
●२०१२ : दारा सिंग – मुष्टीयोद्धा आणि अभिनेता
●१९९९ : राजेंद्रकुमार – हिन्दी चित्रपट अभिनेता
●१९९४ : हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीचा चालताबोलता इतिहास मानले जाणारे पटकथाकार व ’बॉम्बे पब्लिसिटी सर्व्हिस’चे वसंत साठे (आवारा, श्री ४२०, मेरा नाम जोकर, डॉ. कोटणीसकी अमर कहानी, राम तेरी गंगा मैली)
●१६६० : बाजी प्रभू देशपांडे 

No comments:

Post a Comment