"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

🛡 ★ 13. सप्टेंबर ★ 🛡

  🔻====●●●★●●●====🔻
★ जागतिक चॉकलेट दिवस
★ हा या वर्षातील २५६ वा (लीप वर्षातील २५७ वा) दिवस आहे.

                      ~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
                    🔹•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔹
●२००८ : दिल्ली येथे झालेल्या बॉम्बस्फोटांच्या मालिकेत ३० जण ठार तर सुमारे १३० जण जखमी झाले.
●१९९६ : महिला आणि बालकल्याणासाठी लक्षणीय कामगिरी बजावणार्‍या महिलेला देण्यात येणारा ’श्रीमती जानकीदेवी बजाज पुरस्कार’ ज्येष्ठ समाजसेविका आणि स्वातंत्र्य चळवळीतील कार्यकर्त्या श्रीमती इंदुमती पारिख यांना देण्यात आला.
●१९४८ : ऑपरेशन पोलो – विलीनीकरणासाठी भारतीय सैन्याने हैदराबादवर चढाई केली.
●१९२२ : लीबीयातील अझिजीया येथे ५७.२° सेल्सिअस ही जगातील आजवरच्या सर्वाधिक तापमानाची नोंद झाली.

                     ~*★ जन्मदिवस / जयंती ★*~
                  🔸•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔸
◆१९७१ : गोरान इव्हानिसेव्हिच – क्रोएशियाचा लॉन टेनिसखेळाडू
◆१९६९ : शेन वॉर्न – ऑस्ट्रेलियन लेगस्पिनर
◆१९६७ : मायकेल जॉन्सन – अमेरिकन धावपटू
◆१९३२ : डॉ. प्रभा अत्रे – शास्त्रीय गायिका
◆१८८६ : सर रॉबर्ट रॉबिनसन –वनस्पतिज रंग व अल्कलॉईड्सवर संशोधन करणारे ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ व नोबेल पारितोषिक विजेते
◆१८५२ : गणेश जनार्दन आगाशे – नामांकित शिक्षक, संस्कृत पंडित, व्युत्पन्न ग्रंथकार, उत्तम वक्ते व इंदूर येथे भरलेल्या १० व्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष

                         ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
                      🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२०१२ : रंगनाथ मिश्रा – भारताचे २१ वे सरन्यायाधीश
●१९९५ : डॉ. महेश्वर नियोग – प्रख्यात आसामी साहित्यिक आणि इतिहासकार, पद्मश्री (१९७४), आसाम साहित्य परिषदेचे अध्यक्ष
●१९७१ : केशवराव त्र्यंबक दाते – चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेते, नाट्यशिक्षक. महाराष्ट्र नाटक मंडळी या संस्थेच्या नाटकांमधून त्यांनी काही स्त्री नायिकांच्या भूमिका केल्या.
●१९२९ : लाहोर कटातील क्रांतिकारक जतिन दास यांनी तुरुंगातील जुलुमाचा निषेध म्हणून केलेल्या उपोषणात त्यांचा ६३ व्या दिवशी मृत्यू झाला. (जन्म: २७ आक्टोबर १९०४)
●१९२६ : श्रीधर पाठक – हिन्दी कवी, लखनौ येथे भरलेल्या पाचव्या हिन्दी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष
●१८९३ : मामा परमानंद – पत्रकार व विचारवंत, प्रार्थना समाजाचे एक संस्थापक 

No comments:

Post a Comment