"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

🛡 *13. एप्रिल * 🛡

🛡 *13. एप्रिल * 🛡
🔻====●●●★●●●====🔻
★ हा या वर्षातील १०३ वा (लीप वर्षातील १०४ वा) दिवस आहे.

    ~*★महत्त्वाच्या घटना★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९४२ : व्ही. शांताराम ’प्रभात फिल्म कंपनी’तून बाहेर पडले.
●१९१९ : जालियनवाला बाग हत्याकांड – रौलेट कायद्याच्या निषेधार्थ अमृतसर येथे झालेल्या सभेवर ब्रिटिश ब्रिगेडियर जनरल हॅरी डायर याच्या नेतृत्वाखालील तुकडीने केलेल्या गोळीबारात ३७९ लोक ठार व सुमारे १२०० लोक जखमी झाले.
●१८४९ : हंगेरी प्रजासत्ताक बनले.
●१७३१ : छत्रपती शाहू (सातारा) आणि छत्रपती संभाजी (कोल्हापूर) यांच्यात राज्याच्या सीमेवरुन असलेला वाद वारणेचा तह होऊन मिटला.

    ~*★जन्मदिवस / जयंती★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९६३ : गॅरी कास्पारॉव्ह – रशियन बुद्धीबळपटू
◆१९५६ : सतीश कौशिक – अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक
◆१९०६ : सॅम्युअल बेकेट – आयरिश लेखक, नाटककार, कवी आणि दिग्दर्शक
◆१८९५ : वसंत रामजी खानोलकर – भारतातील वैद्यकीय संशोधनाचा पाया घालणारे
◆१७४३ : थॉमस जेफरसन – अमेरिकेचे ३ रे राष्ट्राध्यक्ष, २ रे उपाध्यक्ष आणि १ ले परराष्ट्रमंत्री. त्यांनी मांडलेल्या विचारांवर अमेरिकेची राज्यघटना आधारित असून तेथील लोकशाहीला ’जेफरसनची लोकशाही’ असे म्हणतात.

     ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
 🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००० : विश्वास नरहर तथा ’बाळासाहेब’ सरपोतदार – चित्रपट निर्माते व वितरक, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष
●१९९९ : डॉ. हिरोजी बळीरामजी उलेमाले – कृषीतज्ञ, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू
●१९८८ : हिरामण बनकर – महाराष्ट्र केसरी
●१९७३ : अनंत काकबा प्रियोळकर – भाषा व इतिहास संशोधक, लेखक, संपादक व समीक्षक.
●१९५१ : भवानराव श्रीनिवासराव तथा ’बाळासाहेब’ पंतप्रतिनिधी – औंध संस्थानचे अधिपती, चित्रकार, कीर्तनकार तसेच व्यायामविषयक पुस्तकांचे कर्ते 

No comments:

Post a Comment