"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

🔵 ★ 14. जानेवारी★ 🔵

🔻====●●●★●●●====🔻
★भूगोल दिन
★हा या वर्षातील १४ वा दिवस आहे.
★मकर संक्रमण
 
                        ~*🔺महत्त्वाच्या घटना 🔺*~
                       🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९९८ : दाक्षिणात्य गायिका एम.एस. सुब्बलक्ष्मी यांना 'भारतरत्‍न' हा सर्वोच्‍च सन्मान जाहीर.
●१९९४ : मराठवाडा विद्यापीठाचा ’डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ’ असा नामविस्तार करण्यात आला.
●१९४८ : ’लोकसत्ता’ हे मराठी वृत्तपत्र सुरू झाले.
●१९२३ : विदर्भ साहित्य संघाची स्थापना झाली.
●१७६१ : मराठे आणि अफगाणी यांमध्ये पानिपतची तिसरी लढाई झाली. दुसर्‍याच दिवशी संपलेल्या या युद्धात अफगाण्यांचा विजय झाल्यामुळे भारतीय इतिहासाचा चेहरामोहराच बदलुन गेला.

                       ~*★जन्मदिवस / जयंती★*~
                        🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸•🔸
◆१९७७ : नारायण कार्तिकेयन – भारतीय फॉर्म्यूला कार रेसिंग ड्रायव्हर
◆१९३१ : सईद अहमद शाह ऊर्फ ’अहमद फराज’ – ऊर्दू शायर
◆१९०५ : दुर्गा खोटे – हिन्दी व मराठी चित्रपटातील अभिनेत्री. १९८२ मध्ये ’मी दुर्गा खोटे’ हे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध झाले.
◆१८९६ : ’रिझर्व बँक ऑफ ईंडिया’ चे पहिले गव्हर्नर सर चिंतामणराव द्वारकानाथ देशमुख उर्फ सी. डी. देशमुख (मृत्यू: २ आक्टोबर १९८२)
◆१८९२ : शतायुषी क्रिकेटमहर्षी प्रा. दिनकर बळवंत तथा दि. ब. देवधर –  भारत सरकारतर्फे त्यांना पद्मश्री (१९६५) व पद्मविभूषण (१९९१) या पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते.
◆१८८२ : रघुनाथ धोंडो तथा र. धों. कर्वे – समाजस्वास्थ्यासाठी संततिनियमन आणि लैंगिक शिक्षण यांसाठी बुद्धिवादी विचारप्रवर्तन व प्रत्यक्ष कार्य करणारे विचारवंत, महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे ज्येष्ठ पुत्र
(मृत्यू: १४ आक्टोबर १९५३)

                          ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
                        🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९९१ : चित्रगुप्त श्रीवास्तव ऊर्फ ’चित्रगुप्त’ – संगीतकार
●१७६१ : सदाशिवराव भाऊ – पानिपतच्या  तिसर्‍या युद्धातील सरसेनापती (जन्म: ४ ऑगस्ट १७३०)
●१७६१ : विश्वासराव – पानिपतच्या ३ र्‍या युद्धात मारले गेलेले नानासाहेब पेशव्यांचे ज्येष्ठ चिरंजीव
●१७४२ : एडमंड हॅले – हॅलेच्या धूमकेतूचा शोध लावणारे ब्रिटिश खगोलशास्त्रज्ञ, भूवैज्ञानिक, गणितज्ञ, हवामानशास्त्रज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ

No comments:

Post a Comment