"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

🛡 ★ 14. सप्टेंबर ★ 🛡

   🔻====●●●★●●●====🔻
★ हिन्दी भाषा दिन
★ हा या वर्षातील २५७ वा (लीप वर्षातील २५८ वा) दिवस आहे.

                        ~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
                       🔹•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔹
●१९६० : ऑर्गनायझेशन ऑफ द पेट्रोलियम एक्स्पोर्टिंग कन्ट्रीज’ (OPEC) ची स्थापना झाली.
●१९५९ : सोव्हियेत संघाचे लुना २ हे अंतरिक्षयान चंद्रावर कोसळले. चंद्रापर्यंत पोचणारी ही पहिली मानवनिर्मित वस्तू होती.
●१९४८ : दोन तासांच्या चकमकीनंतर भारतीय सैन्याने दौलताबादचा किल्ला जिंकून घेतला. देवगिरीच्या यादवांचे साम्राज्य नष्ट झाल्यानंतर सुमारे साडे सहाशे वर्षांनी स्वतंत्र झालेल्या किल्ल्यात भारतमातेचे मंदिर उभारण्यात आले.
●१८९३ : सरदार खाजवीवाले, श्री. गणपतराव घोटवडेकर व भाऊ रंगारी यांनी पुण्यात पहिल्यांदा सार्वजनिक गणपती बसवले. लोकमान्य टिळकांनी हा उपक्रम उचलून धरून त्याला राष्ट्रीय उत्सवाचे स्वरुप दिले. हीच सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरूवात होय.

                      ~*★ जन्मदिवस / जयंती ★*~
                    🔸•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔸
◆१९४८ : वीणा सहस्रबुद्धे – ग्वाल्हेर/जयपूर/किराणा घराण्याच्या ख्याल व भजन गायिका
◆१९३२ : डॉ. काशिनाथ घाणेकर – मराठी रंगभूमी आणि चित्रपटातील अभिनेते
◆१९२३ : राम जेठमलानी – केन्द्रीय कायदामंत्री, कायदेपंडीत
◆१९२१ : दर्शनसिंहजी महाराज – शिख संतकवी, ’मंजील-ए-नूर’ आणि ’मता-ए-नूर’ या ऊर्दू कवितासंग्रहांबद्दल त्यांना ऊद्रू अकादमीचे पुरस्कार मिळाले.
◆१९०१ : यमुनाबाई हिर्लेकर – शिक्षणतज्ञ व विचारवंत
◆१८९७ : पार्श्वनाथ आळतेकर – नट, दिग्दर्शक व नाट्यशिक्षक
◆१८६७ : विष्णू नरसिंह जोग – वारकरी शिक्षणसंस्थेचे संस्थापक, कीर्तनकार, प्रवचनकार आणि लेखक

                        ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
                     🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२०११ : हरिश्चंद्र बिराजदार – कुस्तीगीर व प्रशिक्षक
●१९९८ : प्रा. राम जोशी – शिक्षणतज्ञ व मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू
●१९८९ : बेन्जामिन पिअरी पाल – आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भारतीय कृषी संशोधक, पद्मश्री (१९५८), पद्मभूषण (१९६८), इंडीयन कौन्सिल ऑफ अ‍ॅग्रीकल्चरल रिसर्च (ICAR) चे पहिले संचालक, तांबेरा रोगाला दाद न देणार्‍या व अधिक उत्पादन देणार्‍या गव्हाच्या जाती त्यांनी शोधून काढल्या.
●१९०१ : अमेरिकेचे २५ वे राष्ट्राध्यक्ष विल्यम मॅक किनले यांची हत्या

No comments:

Post a Comment