"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

🛡 ★ 14. नोव्हेंबर ★ 🛡

  🔻====●●●★●●●====🔻
★जागतिक मधुमेह दिन
★हा या वर्षातील ३१८ वा (लीप वर्षातील ३१९ वा) दिवस आहे.
★बाल दिन (भारत)

                    ~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
                  🔹•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔹
●२०१३ : सचिन तेंडुलकरने आपल्या कारकिर्दीतला शेवटचा (२०० वा) कसोटी सामना खेळण्यास सुरुवात केली. वेस्ट ईंडीजविरुद्ध हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियम येथे खेळण्यात आला.
●१९९१ : जर्मनीचे चॅन्सेलर डॉ. हेल्मुट कोल यांची १९९० च्या जवाहरलाल नेहरू आंतरराष्ट्रीय सामंजस्य पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
●१९७५ : स्पेनने पश्चिम सहारातून पळ काढला.
●१९६९ : जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयाची (JNU) स्थापना
●१९४० : दुसरे महायुद्ध – जर्मन वायूदलाने इंग्लंडमधील कॉव्हेंट्री शहरावर जोरदार बॉम्बहल्ला केला.

                    ~*★जन्मदिवस / जयंती★*~
                   🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९७१ : अ‍ॅडॅम गिलख्रिस्ट – ऑस्ट्रेलियाचा यष्टिरक्षक व धडाकेबाज फलंदाज
◆१९२२ : ब्यूट्रोस ब्यूट्रोस घाली – संयुक्त राष्ट्रांचे ६ वे सरचिटणीस
◆१८९१ : बिरबल सहानी – पुरावनस्पती शास्त्रज्ञ, राष्ट्रीय विज्ञान अकादमीचे  अध्यक्ष
◆१८८९ : पं. जवाहरलाल नेहरू – भारताचे पहिले पंतप्रधान, भारतरत्‍न [१९५५] (मृत्यू: २७ मे १९६४)
◆१८६३ : लिओ हेन्ड्रिक आर्थर बेकेलँड – अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ, १९०९ मधे त्यांनी लाखेवर अनेक प्रयोग करुन ’बॅकेलाईट’ नावाचा पदार्थ तयार केला. ही प्लॅस्टिक युगाची सुरुवात मानली जाते.
◆१७६५ : रॉबर्ट फुल्टन – अमेरिकन अभियंते व संशोधक, वाफेच्या शक्तीवर चालणारी जहाजे त्यांनी शोधल्यामूळे शिडाच्या जहाजांचे युग संपुष्टात आले. पाणतीराचा (torpedo) शोधही त्यांनीच लावला.

                  ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
                 🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००० : प्रा. योगेश्वर अभ्यंकर – गीतकार व सर्जनशील कवी
●१९९३ : डॉ. मणिभाई भीमभाई देसाई – स्वातंत्र्यसैनिक, महात्मा गांधींचे सच्‍चे अनुयायी, ग्रामीण विकासाचा पाया घालणारे सामाजिक कार्यकर्ते, दुधाचा महापूर योजनेचे एक शिल्पकार
●१९७७ : अभय चरणारविंद भक्तिवेदांत तथा स्वामी प्रभूपाद – हरेकृष्ण पंथाचे संस्थापक
●१९७१ : नारायण हरी आपटे – कादंबरीकार, चित्रपट कथालेखक. ’सुखाचा मूलमंत्र’, ’पहाटेपुर्वीचा काळोख’, ’उमज पडेल तर’, ’एकटी’ या त्यांच्या काही प्रसिद्ध सामाजिक कादंबर्‍या होत. ’कुंकू’ हा गाजलेला चित्रपट त्यांच्या ’न पटणारी गोष्ट’ या कादंबरीवर आधारलेला होता.

No comments:

Post a Comment