"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

🛡 * 14. मे * 🛡

🔻====●●●★●●●====🔻
★हा या वर्षातील १३४ वा (लीप वर्षातील १३५ वा) दिवस आहे.

                 ~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
                 🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९९७ : देशातील आणि महाराष्ट्रातील पहिल्या महिला सहकारी साखर कारखान्याची साखर आयुक्त कार्यालयात सहकार कायदा कलम चारखाली नोंदणी झाली. ’इंदिरा गांधी भारतीय मिहिला विकास सहकारी साखर कारखाना’ असे त्याचे नाव आहे.
●१९६५ : चीनने सकाळी साडे सात वाजता (भारतीय वेळ) आपल्या दुसर्‍या अणुबॉम्बचा यशस्वी स्फोट केला.
●१७९६ : इंग्लंडच्या ग्लूस्टर परगण्यातील बर्कले येथील जेम्स फिलीप या आठ वर्षाच्या मुलाला जगातील पहिली देवीची लस टोचण्यात आली. जेम्स फिलीप हा देवीच्या लशीचे संशोधक सर एडवर्ड जेन्नर यांच्या माळ्याचा मुलगा होता.

                  ~*★ जन्मदिवस / जयंती ★*~
                  🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९९८ : तरुणी सचदेव – ’रसना’च्या जाहिरातीतील बालकलाकार
◆१९२६ : डॉ. इंदुताई पटवर्धन – आनंदग्रामच्या संस्थापिका व थोर समाजसेविका (मृत्यू: ८ फेब्रुवारी १९९९)
◆१९२३ : मृणाल सेन – दिग्दर्शक
◆१९०९ : वसंत शिंदे – विनोदसम्राट, कलागौरव पुरस्कार, चित्रभूषण पुरस्कार व बालगंधर्व पुरस्काराने सन्मानित
◆१९०७ : आयुब खान – फील्ड मार्शल आणि पाकिस्तानचे दुसरे राष्ट्राध्यक्ष
◆१६५७ : छत्रपती संभाजी महाराज (मृत्यू: ११ मार्च १६८९)

                    ~*★ मृत्यू / पुण्यतिथी ★*~
                  🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२०१२ : तरुणी सचदेव – ’रसना’च्या जाहिरातीतील बालकलाकार (जन्म: १४ मे १९९८)
●१९९८ : फ्रँक सिनात्रा – हॉलिवूड मधील अभिनेते व गायक
●१९७८ : जगदीश चंद्र माथूर – नाटककार व लेखक
●१९६३ : डॉ. रघू वीरा-- भाषाशास्त्रज्ञ, जनसंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष, घटनासमितीचे सदस्य, राज्यसभा खासदार यांचे मोटार अपघातात निधन झाले.
●१९२३ : सर नारायण गणेश चंदावरकर – कायदेपंडित, समाजसुधारक, मुंबई उच्‍च न्यायालयाचे न्यायाधीश (१९०१ -१९१२), मुंबई विधानपरिषदेचे बिनसरकारी अध्यक्ष (१९१९), डिप्रेस्ड क्लास मिशनचे अध्यक्ष
           ●~~●~~●~~◆~~●~~●~~●

No comments:

Post a Comment