"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

🛡 *14. एप्रिल* 🛡

🛡 *14. एप्रिल* 🛡
🔻====●●●★●●●====🔻
★ डॉ.आंबेडकर जयंती
★ हा या वर्षातील १०४ वा (लीप वर्षातील १०५ वा) दिवस आहे.
★ राष्ट्रीय अग्निशामक दल दिन

    ~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९४४ : मुंबई गोदीत उभ्या असलेल्या ’फोर्ट स्टिकिन’ या मालवाहू जहाजावर दुपारी ४ वाजुन ५ मिनिटांनी भीषण स्फोट होऊन ३०० जण ठार झाले आणि (त्याकाळच्या) सुमारे २ कोटि पौंडा इतके आर्थिक नुकसान झाले.
●१९१२ : आर. एम. एस. टायटॅनिक हे जहाज रात्री ११:४० वाजता (स्थानिक वेळ) उत्तर अटलांटिक महासागरात एका हिमनगावर धडकले.
●१७३६ : चिमाजीअप्पाने अद्वितीय पराक्रम करुन जंजिर्‍याच्या सिद्दीसाताचा पराभव केला.
●१६६१ : प्रिन्स सेसी या शास्त्रज्ञाने प्रथमच दुर्बिणीसाठी टेलिस्कोप ही संज्ञा वापरली.

  ~*★ जन्मदिवस / जयंती ★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
●१९४२ : मार्गारेट अल्वा – केंद्रीय मंत्री व राजस्थानच्या राज्यपाल
●१९२७ : द. मा. मिरासदार – विनोदी लेखक
●१९२२ : उस्ताद अली अकबर खाँ तथा खाँसाहेब – मैहर घराण्याचे जागतिक कीर्तीचे सरोदवादक, पद्‌मविभूषण
●१८९१ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर – भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, अस्पृश्यांच्या मुक्तिसंग्रामाचे खंदे नेते, अस्पृश्य समजल्या जाणार्‍या जातितील पहिले मॅट्रिक व पहिले पदवीधर, इंग्लंडमध्ये वकिलीतील बॅरिस्टरची परीक्षा दिली आणि अर्थशास्त्रात डॉक्टरेट मिळवली. (मृत्यू: ६ डिसेंबर १९५६)
●१६२९ : क्रिस्टियन हायगेन्स – डच गणितज्ञ, खगोलविद्‌ आणि पदार्थवैज्ञानिक, लंबकाच्या घड्याळाचा शोध

   ~*★ मृत्यू / पुण्यतिथी ★*~
 🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२०१३ : राम प्रसाद गोएंका – उद्योगपती (जन्म: १ मार्च १९३०)
●१९९७ : चंदू पारखी – चित्रपट आणि नाट्य अभिनेते
●१९६२ : भारतरत्‍न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या – अभियंते, विद्वान, मुत्सद्दी आणि मैसूर संस्थानचे दिवाण, त्यांच्या सन्मानार्थ त्यांचा जन्मदिन हा भारतीय अभियंता दिन म्हणून पाळण्यात येतो. पुण्याच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात त्यांचे शिक्षण झाले. पुण्याची भुयारी गटार योजना, खडकवासला धरण, भाटघर धरणाचे स्वयंचलित दरवाजे, म्हैसूरचे कृष्णराजसागर धरण या कामांच्या उभारणीत त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. (जन्म: १५ सप्टेंबर १८६०)
●१९५० : भारतीय तत्त्ववेत्ते योगी रमण महर्षी तथा वेंकटरमण अय्यर समाधिस्थ झाले. 

No comments:

Post a Comment