"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

🛡 ★ 15. ऑक्टोबर ★ 🛡

🔻====●●●★●●●====🔻
★  जागतिक अंध दिन
★  हा या वर्षातील २८८ वा (लीप वर्षातील २८९ वा) दिवस आहे.

               ~*🔺महत्त्वाच्या घटना 🔺*~
              🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९९७ : भारतीय लेखिका अरुंधती रॉय यांच्या ’द गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज’ या कादंबरीला साहित्य क्षेत्रात प्रतिष्ठेचा समजला जाणारा ’बुकर पुरस्कार’ मिळाला.
●१९९३ : वर्णभेदामुळे निर्माण झालेला अविश्वास दूर करुन, दक्षिण अफ्रिकेत लोकशाही रुजवण्याच्या प्रयत्‍नांबद्दल अफ्रिकन नॅशनल काँग्रेसचे नेते नेल्सन मंडेला आणि दक्षिण अफ्रिकेचे अध्यक्ष एफ. डब्ल्यू. डी. क्लर्क यांना शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार जाहीर
●१९३५ : टाटा एअरलाइन्सचे पहिले उड्डाण झाले. जे. आर. डी. टाटा यांनी हे विमान कराचीहुन मुंबई येथे आणले व नागरी विमानसेवेची सुरुवात केली.
●१८८८ : गोपाळ गणेश आगरकरांच्या ’सुधारक’ पत्राची सुरूवात

                ~*★ जन्मदिवस / जयंती ★*~
                🔸•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔸
◆१९६९ : पं. संजीव अभ्यंकर – मेवाती घराण्याचे शास्त्रीय गायक
◆१९५७ : मीरा नायर – भारतीय वंशाच्या अमेरिकन चित्रपट निर्मात्या व दिग्दर्शिका
◆१९३१ : अवुल पाकिर जैनुलब्दीन उर्फ ए. पी. जे. अब्दुल कलाम – वैज्ञानिक आणि भारताचे ११ वे राष्ट्रपती, एकात्मिक क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमाचे जनक, पंतप्रधानांचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार, पद्मभूषण (१९८१), पद्मविभूषण (१९९०), भारतरत्‍न (१९९७). राष्ट्रपती होण्यापुर्वी ’भारतरत्‍न’ हा भारताचा सर्वोच्‍च नागरी सन्मान मिळालेले ते भारताचे तिसरे राष्ट्रपती आहेत.
◆१९२६ : नारायण गंगाराम सुर्वे – कवी
◆१५४२ : बादशाह अकबर – हिन्दुस्तानचा तिसरा मुघल सम्राट

                 ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
               🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००२ : वसंत सबनीस – लेखक व पटकथाकार
●१९६१ : सूर्यकांत त्रिपाठी ’निराला’ – हिन्दी साहित्यिक. त्यांनी ४४ ग्रंथ लिहिले. कन्येच्या मृत्यूनंतर त्यांनी लिहिलेल्या ’सरोजस्मृती’ या शोकगीताची हिन्दीतील सर्वश्रेष्ठ विलापिकांमध्ये गणना होते.
●१९१७ : माता हारी – पहिल्या महायुद्धात गाजलेली डच नर्तिका, सौंदर्यवती व गुप्तहेर
●१७८९ : रामचंद्र विश्वनाथ तथा रामशास्त्री प्रभुणे – उत्तर पेशवाईतील प्रामाणिक, निष्पक्षपाती, निर्भीड आणि प्रसिद्ध न्यायाधीश, पुणे दरबारात १५७१ मधे त्यांची शास्त्री म्हणून नेमणूक झाली. थोरले माधवराव जेव्हा पेशवे झाले तेव्हा रामशास्त्री सरन्यायाधीश होते. 

No comments:

Post a Comment