"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

*16/05/18 बुधवारचा परीपाठ*
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
*🌅 _महाराष्ट् शिक्षक पॅनल_* 🌅
 ━━═•●◆●★❂★●◆●•═━━
*Ⓜ💲🅿 _परीपाठ_ Ⓜ💲🅿*
====●●●★♦★●●●====

*❂ दिनांक:~ 16/05/2018 ❂*
       *🔘 वार ~ बुधवार 🔘*
*⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽⌘⌘⌘*
  *💥🇮🇳 राष्ट्रगीत  🇮🇳💥*
➖➖➖➖➖➖➖➖
    *💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
➖➖➖➖➖➖➖➖
  *💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐ MSP ⋑⋐⋑⛯⋐⋑*

  *💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
       🔘 *"माझी शाळा"* 🔘
   *ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
    🔗🔗👇👇🔗🔗

http://satishborkhade.blogspot.in/?m=1
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ]   ❂ आजचे पंचाग ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

     🍥 *16. मे :: बुधवार* 🍥
 ━━═•●◆❃★❂★❃◆●•═━━
                 जेष्ठ शु. १
       तिथी : शुक्ल पक्ष प्रतिपदा,
              नक्षत्र : कृतिका,
     योग : अतिगंड, करण : बव,
सूर्योदय : 06:04, सूर्यास्त : 19:06,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ]    ❂ सुविचार ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

16. *सौंदर्य हे वस्तूत नसते; पाहणाऱ्याच्या दृष्टीत असते.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ]    ❂ म्हणी व अर्थ ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

16. *दे रे हरी पलंगावरी*
       ★ अर्थ ::~ काही लोकांना काहीच श्रम नं करता आपल्याला सगळं मिळावं असं वाटत असतं. कर्म नं करता फळाची आशा बाळगणे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ]    ❂ सुभाषीत ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

16.  *विद्याधनं सर्वधनप्रधानम् ।*
               ⭐अर्थ ::~
 विद्याधन हे सर्व धनांमध्ये श्रेष्ठ होय.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ]    ❂ दिनविशेष ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

       🛡 *★16. मे ★* 🛡
🔻====●●●★●●●====🔻
★हा या वर्षातील १३६ वा (लीप वर्षातील १३७ वा) दिवस आहे.

     ~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
   🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९९६ : भारताचे १० वे पंतप्रधान म्हणून अटलबिहारी वाजपेयी यांनी सूत्रे हाती घेतली. मात्र आवश्यक पाठिंबा न मिळाल्यामुळे त्यांचे सरकार केवळ १३ दिवस टिकले.
●१९९३ : बचेन्द्री पालच्या नेतृत्वाखालील पहिल्या महिला भारतीय मोहिमेने सात मुलींसह अठरा गिर्यारोहकांना एव्हरेस्ट पादाक्रांत करण्याचा मान मिळवून दिला व नवा जागतिक विक्रम नोंदविला.
●१९७५ : सिक्कीम भारतात विलीन झाले.
●१९२९ : हॉलिवूडच्या ’अ‍ॅकेडमी ऑफ मोशन पिक्चर, आर्ट्‌स अँड सायन्सेस’या संस्थेतर्फे चित्रपटांतील उत्कृष्ट कामगिरीबद्दल स्मृतिचिन्ह देण्याचा पहिला समारंभ झाला. याच पारितोषिकांना पुढे ’ऑस्कर’ असे नाव पडले.

   ~*★ जन्मदिवस / जयंती ★*~
   🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९७० : गॅब्रिएला सॅबातिनी – अर्जेंटिनाची टेनिस खेळाडू
◆१९३१ : के. नटवर सिंह – भारतीय राजकारणी व परराष्ट्रमंत्री
◆१९२६ : माणिक वर्मा – शास्त्रीय संगीत व सुगम संगीत या दोन्ही क्षेत्रांत लोकप्रियता मिळवलेल्या गायिका. ’
◆१८२५ : केरुनाना लक्ष्मण छत्रे – आद्य गणिती, आधुनिक भास्कराचार्य

      ~*★ मृत्यू / पुण्यतिथी ★*~
  🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२०१४ : रुसी मोदी – टाटा स्टीलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, पद्मभूषण
●१९९४ : माधव मनोहर – साहित्य समीक्षक, विष्णुदास भावे सुवर्णपदकाचे एकमेव मानकरी.
●१९९४ : फणी मुजुमदार – चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व पटकथा लेखक. दूरदर्शनवर लोकप्रिय झालेल्या ’रामायण’ या मालिकेची पटकथा त्यांनी लिहिली होती.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
   💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व "मुख्य मराठी" बातम्या
 वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..

     https://goo.gl/8D33ox
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0६ ]    ❂ बोधकथा ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

16.  *❃ दानातून मिळाला धडा ❃*
     ━━═•●◆●★◆★●◆●•═━━
        कानपूरमध्‍य़े गंगेच्‍या काठी बसून एक भिकारी भीक मागत होता. भिकेत त्‍याला जे मिळेल ते त्‍यातून तो आपला उदरनिर्वाह चालवित होता. त्‍याच्‍या हातात एक कटोरा असायचा. त्‍याला तो जाणा-या येणा-याच्‍या पुढे करायचा. ज्‍याला त्‍यात काही टाकावयाचे असेल ते टाकत होता. परंतु तो भिकारी तोंडाने काही मागायचा नाही. अन्‍य भिका-याप्रमाणे तो दीनवाणा होत नसे. एके दिवशी तिकडून एक श्रीमंत माणूस जात होता. भिका-याने पाहिले, श्रीमंताच्‍या अंगावर अत्‍यंत भारी कपडे होते, गळ्यात आणि अंगावर सोन्‍याचे दागिने चमकत होते. उंची राहणी ही त्‍याच्‍या वर्तनातून दिसून येत होती. श्रीमंत वाटतो म्‍हणून भिका-याने त्‍याच्‍याकडे कटोरा पुढे केला, ते पाहून त्‍या श्रीमंताच्‍या चेह-यावर तिरस्‍कार उमटला. त्‍याने खिशातून एक रूपायाचे नाणे काढले व त्‍या भिका-याकडे फेकले व छद्मी हसला. तो पुढे निघणार इतक्‍यात भिकारी जागेवरून उठला. त्‍याने त्‍या श्रीमंताचे उद्धट वर्तन व गरीबांसाठी असलेले तिरस्‍करणीय भाव पाहून ते रूपायाचे नाणे श्रीमंताकडे परत फेकले व म्‍हणाला,’’ घे सांभाळ तुझी दौलत, मला तुझ्यासारख्‍या गरीबाचा पैसा नको, ज्‍या दानामध्‍ये तिरस्‍काराचा भाव आहे असे दान स्‍वीकार करू नये असे मला सांगण्‍यात आले आहे. दान करतानासुद्धा शुद्ध मनाने, चांगल्‍या भावाने दान करावे जेणे करून घेणा-याला व देणा-याला समाधान लाभते.परमेश्‍वराने माणूस बनविताना जर काही फरक केला नाही तर तू तिरस्‍कार करून परमेश्‍वराचा अपमान करतो आहेस हे लक्षात ठेव.’’ हे ऐकताच श्रीमंताला आपली चूक लक्षात आली. त्‍याने तात्‍काळ भिका-याची क्षमा मागितली.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ] ❂ प्रेरणादायी विचार ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

16. कोणाजवळही काही बोलताना
फार विचारपूर्वक बोला; कारण...

   काही माणसं अशीही आहेत
     जी रडून ऐकतात आणि
               *हसून सांगतात..!!*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ]   ❂ सामान्य ज्ञान ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

16.   *✿ देशातील पहिले ✿*
       ◑◑◑◆◑◑●★●◑◑◆◑◑◑
■ देशातील प्रत्येक राज्यात महिला न्यायालय स्थापन करणारे पहिले राज्य
     ➜  आंध्रप्रदेश

■ देशातील पहिला सौर पवनउर्जा प्रकल्प
     ➜ आळंदी

■ देशातील पहिले सॅटेलाईट शहर
     ➜   पिलखूआ (उत्तरप्रदेश)

■ देशातील पहिले पर्यावरण ग्राम इको व्हिलेज
     ➜   काटेवाडी
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ] ❂थोरव्यक्ती परिचय ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

16. *❒ ♦चार्ल्स डार्विन♦ ❒* 
     ━━═•●◆●★◆★●◆●•═━━
      *उत्क्रांतिवादाचा जनक*

    चार्ल्स रॉबर्ट डार्विन हा जीवशास्त्रज्ञ होता. त्याला उत्क्रांतिवादाचा जनक समजले जाते. त्याने मांडलेल्या उत्क्रांतिवादाच्या सिद्धांताने जगातील जीवसृष्टीच्या उत्पत्ती व विकासाची कशी प्रगती होत गेली हे शास्त्रशुद्धरीत्या उलगडून दाखवले.
इंग्लंडमधील श्रॉपशायर परगण्यात फेब्रुवारी १२, इ.स. १८०९ रोजी चार्ल्सचा जन्म झाला. १८१८ मध्ये तो शाळेत जाऊ लागला. त्याला रसायनशास्त्राची फार आवड होती म्हणून आपल्या भावाच्या मदतीने त्याने आपल्या घराच्या बाहेर एका कोपऱ्यात छप्पर घालून एक छोटीशी प्रयोगशाळा उभारली होती व तेथे तो प्रयोग करत बसे. त्याचे शाळकरी सोबती त्याच्या या नादाची टर उडवत. कालांतराने त्याची डॉ. ग्रॅट या जीवशास्त्रज्ञाची ओळख झाली. डार्विनने १८२५ मध्ये केंब्रिज विद्यापीठाच्या क्राइस्ट महाविद्यालयात नाव नोंदवून पदवी मिळवली. तेथे त्याला जीवजिवाणू व कीटक निरीक्षणाचा नाद लागला.
१८२६ मध्ये कॅप्टन किंगने दक्षिण अमेरिकेच्या संशोधनाची मोहीम काढली. त्याच्या हेन्स्लो नावाच्या मित्राच्या निमंत्रणावरून डार्विन मोहिमेत सामील झाला. त्या मोहिमेवर तो पाच वर्षे होता. निरनिराळे पक्षी-प्राणी एकमेकांशी कसे वागतात, कसे एकमेकांशी जुळवून घेतात, याचे निरीक्षण व अभ्यास त्याने केला व तेथे उत्क्रांतिवाद, सहजीवन, 'बळी तो कान पिळी', ही मूलभूत नैसर्गिक तत्त्वे तो शिकला. माणसाचा मूळ पुरुष, चारपायी पायाच्या माकडापासून झाला असला पाहिजे असे विचार त्याच्या डोक्यात घुमू लागले. वेगवेगळे प्राणी कसे निर्माण झाले या विषयावरच्या त्याच्या Origin of Species या नोव्हेंबर २४ रोजी प्रकाशित झालेल्या शोधप्रबंधाच्या १२५० प्रति एका दिवसात खपल्या. हा सिद्धांत बायबलच्या विरुद्ध जात होता. त्याचा निषेध करण्यासाठी १८६० मध्ये ऑक्‍सफर्डमध्ये विल्बर फोर्स या बिशपने सभा बोलावली. डार्विन आपल्या प्रयोगशाळेत शांतपणे प्रयोग करत बसला होता. हक्सले डी हूकर या शास्त्रज्ञाने डार्विनची बाजू सडेतोड व सोदाहरण मांडली. बिशपला डार्विनचा सिद्धांत मान्य करावाच लागला. डार्विनला त्या यशाची ना खंत ना खेद. तो कार्यातच मग्न राहिला.

*चार्ल्स डार्विनचे मराठीतील पुस्तके*
- उत्क्रांति
- डार्विनचि आत्मकथा
- डार्विनचा सिद्धांत
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹🔅✹★✹◑◎●••
            *✍संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
   ♦📱 7875840444 ♦
 *✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❃❂❃█║▌║█║▌

*◆ बुधवार ~ 16/05/2018 ◆*
*⋐⋑⛯⋐⋑⋐ MSP ⋑⋐⋑⛯⋐⋑*

No comments:

Post a Comment