"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

🛡 ★ 16. ऑक्टोबर ★ 🛡

🔻====●●●★●●●====🔻
★ जागतिक अन्न दिन
★ हा या वर्षातील २८९ वा (लीप वर्षातील २९० वा) दिवस आहे.      

               ~*🔺महत्त्वाच्या घटना 🔺*~
               🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९९९ : जागतिक व्यावसायिक बिलियर्ड्‌स, स्‍नूकर संघटनेतर्फे वर्षातील सर्वोत्कृष्ट बिलियर्ड्‌स खेळाडूसाठी दिला जाणारा ’फ्रेड डेव्हिस पुरस्कार’ भारताच्या गीत सेठीला देण्यात आला.
●१९६८ : हर गोविंद खुराना यांना नोबेल पारितोषिक प्रदान
●१९५१ : पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान लियाकत अली खान यांची रावळपिंडी येथे हत्या करण्यात आली.
●१९०५ : भारताचे व्हॉइसरॉय लॉर्ड कर्झन यांनी बंगालची फाळणी करण्याचा आदेश दिला.
●१८४६ : डॉ. जॉन वॉरेन या अमेरिकन डॉक्टरने शस्त्रक्रिया करताना भूल देण्यासाठी सर्वप्रथम इथर या रसायनाचा वापर केला.    

                ~*★ जन्मदिवस / जयंती ★*~
             🔸•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔸
◆२००३ : कृत्तिका –नेपाळची राजकन्या
◆१९५९ : अजय सरपोतदार – मराठी चित्रपट निर्माते व दिग्दर्शक आणि अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष
◆१९४८ : हेमा मालिनी – अभिनेत्री, दिग्दर्शिका, निर्माती, भरतनाट्यम नर्तिका आणि नृत्यदिग्दर्शक
◆१९०७ : सोपानदेव चौधरी – कवी, कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे पुत्र. ’काव्यकेतकी’, ’अनुपमा’, ’सोपानदेवी’ हे त्यांचे कवितासंग्रह प्रसिद्ध आहेत.
◆१८९६ : सेठ गोविंद दास – स्वातंत्र्यसैनिक, लोकसभेचे हंगामी सभापती, साहित्यिक
◆१८९० : अनंत हरी गद्रे तथा समतानंद – वार्ताहर, संपादक, थोर समाजसुधारक आणि नाटिका संप्रदायाचे प्रवर्तक, जाहिरातशास्त्रातील तज्ञ.
◆१८५४ : ऑस्कर वाईल्ड – आयरिश लेखक व नाटककार, ’कलेसाठी कला’ या मताचे कट्टर पुरस्कर्ते.
◆१८४१ : इटो हिरोबुमी – जपानचे पहिले पंतप्रधान
◆१६७० : बंदा सिंग बहादूर – शिख सेनापती

                ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
               🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००२ : नागनाथ संतराम तथा ’ना. सं.’ इनामदार – लेखक
●१९९७ : दत्ता गोर्ले – मराठी चित्रपटसृष्टीतील छायालेखक
●१९८१ : मोशे दायान – इस्त्रायलचे परराष्ट्रमंत्री, कृषीमंत्री आणि संरक्षणमंत्री, इस्रायली सेना प्रमुख
●१९५१ : पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान लियाकत अली खान यांची भर सभेत गोळ्या घालून हत्या
●१९५० : वि. गं. तथा दादासाहेब केतकर – अनाथ विद्यार्थी गृहाचे एक संस्थापक
●१९४८ : माधव नारायण तथा माधवराव जोशी – नाटककार. जळगाव येथे झालेल्या ३४ व्या अखिल भारतीय नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष. पालिकांच्या कारभारावरील टीकेमुळे गाजलेले ’म्युनिसिपालिटी’ हे नाटक त्यांनी लिहिले होते. 

No comments:

Post a Comment