"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

🛡 * 16. जुलै * 🛡

🔻====●●●★●●●====🔻
★हा या वर्षातील १९७ वा (लीप वर्षातील १९८ वा) दिवस आहे.

                ~*🔺महत्त्वाच्या घटना 🔺*~
                🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९९२ : भारताचे नववे राष्ट्रपती म्हणून डॉ. शंकरदयाळ शर्मा यांची निवड झाली. तत्पुर्वी ते उपराष्ट्रपती आणि महाराष्ट्राचे राज्यपाल होते.
●१९६९ : चंद्रावर पहिला मानव उतरवणार्‍या ’अपोलो-११’ अंतराळयानाचे फ्लोरिडा येथुन प्रक्षेपण
●१९४५ : अमेरिकेने तयार केलेल्या अणूबॉम्बची न्यू मेक्सिकोमधील लास अलमॉस येथील वाळवंटात चाचणी
 ● ६२२ : प्रेषित मुहम्मद पैगंबर यांनी मदिनेहून प्रयाण केले. चंद्रावर आधारित असलेल्या इस्लामिक (हिजरी) कॅलेंडरची या दिवसापासुन सुरूवात झाली.

                  ~*★जन्मदिवस / जयंती★*~
                    🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९८४ : कतरिना कैफ – चित्रपट कलाकार
◆१९६८ : धनराज पिल्ले – हॉकी पटू
◆१९२३ : के. व्ही. कृष्णराव – भूदल प्रमुख, जम्मू काश्मीर, नागालँड, मणिपूर व त्रिपूराचे राज्यपाल
◆१९१७ : जगदीश चंद्र माथूर – नाटककार व लेखक
◆१९१४ : वामनराव कृष्णाजी तथा वा. कृ. चोरघडे – साहित्यिक (लघुकथा, लोककथा, बालवाड़्मय, चरित्र, अनुवाद), विचारवंत व स्वातंत्र्यसैनिक
◆१९१३ : स्वामी शांतानंद सरस्वती – ज्योतिर्मठाचे शंकराचार्य
◆१९०९ : अरुणा असफ अली – स्वातंत्र्यसेनानी. ९ ऑगस्ट १९४२ रोजी त्यांनी मुंबईतील गोवालिया टँक मैदानावर तिरंगा फडकवला होता. लेनिन शांतता पुरस्कार, आंतरराष्ट्रीय सद्भावना पुरस्कार, भारतरत्‍न (मरणोत्तर) इ. पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले. (मृत्यू: २९ जुलै १९९६)

                        ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
                      🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९९३ : उस्ताद निसार हुसेन खाँ – पद्मभूषण (१९७०), रामपूर साहसवान घराण्याचे तराणा व ख्यालगायक, संगीत संशोधन अकादमीचे (SRA) निवासी शिक्षक, आकाशवाणी कलाकार, उस्ताद राशिद खाँ यांचे गुरू
●१९८६ : वासुदेव सीताराम तथा वा. सी. बेन्द्रे – इतिहासकार 

No comments:

Post a Comment