"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

*18/05/18 शुक्रवारचा परीपाठ*
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
*🌅 _महाराष्ट् शिक्षक पॅनल_* 🌅
 ━━═•●◆●★❂★●◆●•═━━
*Ⓜ💲🅿 _परीपाठ_ Ⓜ💲🅿*
====●●●★♦★●●●====

*❂ दिनांक:~ 18/05/2018 ❂*
       *🔘 वार ~ शुक्रवार 🔘*
*⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽⌘⌘⌘*
  *💥🇮🇳 राष्ट्रगीत  🇮🇳💥*
➖➖➖➖➖➖➖➖
    *💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
➖➖➖➖➖➖➖➖
  *💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐ MSP ⋑⋐⋑⛯⋐⋑*

  *💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
       🔘 *"माझी शाळा"* 🔘
   *ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
    🔗🔗👇👇🔗🔗

http://satishborkhade.blogspot.in/?m=1
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ]   ❂ आजचे पंचाग ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

     🍥 *18. मे :: शुक्रवार* 🍥
 ━━═•●◆❃★❂★❃◆●•═━━
              जेष्ठ शु. ३/४
       तिथी : शुक्ल पक्ष तृतिया,
              नक्षत्र : आर्द्रा,
       योग : ध्रुति, करण : गर,
सूर्योदय : 06:03, सूर्यास्त : 19:06,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ]    ❂ सुविचार ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

18. *संभ्रमाच्या वेळी नेहमी आपल्या कर्तव्याला प्राधान्य द्या.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ]    ❂ म्हणी व अर्थ ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

18. *झाकली मूठ सव्वा लाखाची –*
  ★ अर्थ ::~ दुर्गुण असले तरी प्रकट करू नयेत
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ]    ❂ सुभाषीत ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

18.     *शीलं परं भूषणम् ।*
  ⭐अर्थ :: ~ शील (चारित्र्य) हेच
         श्रेष्ठ भूषण होय.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ]    ❂ दिनविशेष ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

       🛡 *★18. मे★* 🛡
🔻====●●●★●●●====🔻
★जागतिक संग्रहालय दिन
★हा या वर्षातील १३८ वा (लीप वर्षातील १३९ वा) दिवस आहे.

     ~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
   🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९९८ : पुण्याच्या सुरेन्द्र चव्हाणने जगातील सर्वोच्‍च एव्हरेस्ट शिखर सर केले.
●१९९५ : स्थानिक ठिकाणचे ५,००० रुपयांपर्यंतचे धनादेश खात्यात भरल्यानंतर तिसर्‍या दिवशी ती रक्‍कम ग्राहकास काढण्याची मुभा द्यावी, असा आदेश ’रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया’ने दिला.
●१९९१ : रशियाच्या सोयुझ अंतराळातुन भ्रमण करणारी हेलन शेरमन ही महिला पहिली ब्रिटिश अंतराळयात्री बनली.
●१९७४ : भारताने पोखरण येथे आण्विक अस्त्राची पहिली यशस्वी चाचणी केली.
●१९७२ : दापोली येथे कोकण कृषी विद्यापीठाची स्थापना झाली.
●१९१२ : पूर्णपणे भारतात बनवलेला मूकपट ’पुंडलिक’ प्रदर्शित झाला.
●१८०४ : नेपोलिअन बोनापार्ट फ्रान्सचा सम्राट झाला.
●१४९८ : वास्को-द-गामा भारतातील कालिकत बंदरात दाखल झाला.

   ~*★ जन्मदिवस / जयंती ★*~
   🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९३३ : एच. डी. देवेगौडा – भारताचे ११ वे पंतप्रधान
◆१९२० : पोप जॉन पॉल (दुसरा)
◆१९१३ : पुरुषोत्तम काकोडकर – गोवा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्यसैनिक, काँग्रेसचे नेते, ५ व्या लोकसभेचे सदस्य
◆१८७२ : बर्ट्रांड रसेल – ब्रिटिश गणितज्ञ, तत्त्वज्ञ आणि इतिहासकार
◆१६८२ : छत्रपती शाहू महाराज (मूळ नाव शिवाजी) – छत्रपती संभाजी व येसूबाई यांचे चिरंजीव (मृत्यू: १५ डिसेंबर १७४९)

      ~*★ मृत्यू / पुण्यतिथी ★*~
  🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००९ : वेल्लुपल्ली प्रभाकरन – एल. टी. टी. ई. चा संस्थापक
●१९९९ : रामचंद्र सप्रे – पहिले राष्ट्रीय बुद्धीबळ विजेते
●१९९७ : कमलाबाई कामत तथा कमलाबाई रघुनाथ गोखले – भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिल्या स्त्री कलाकार. ’राजा हरिश्चंद्र’ या पहिल्या मूकपटात त्यांनी भूमिका केली होती. त्यांचे चिरंजीव चंद्रकांत गोखले व नातू विक्रम गोखले अशा तीन पिढ्यांनी अभिनय क्षेत्र गाजवले.
●१९६६ : पंचानन माहेश्वरी – सपुष्प वनस्पतींतील पुनरुत्पादन क्रियेसंबंधी संशोधन करणारे वनस्पतीशास्त्रज्ञ
●१८४६ : बाळशास्त्री जांभेकर – मराठी पत्रकारितेचे पितामह, १८३२ मधे ’दर्पण’ हे वृत्तपत्र काढून त्यांनी वृत्तपत्र व्यवसायाचा पाया घातला. ’दिग्दर्शन’ हे मराठीतील पहिले मासिकही त्यांनीच १८४० मधे सुरू केले.
(जन्म: ६ जानेवारी १८१२)
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
   💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व "मुख्य मराठी" बातम्या
 वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..

     https://goo.gl/8D33ox
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0६ ]    ❂ बोधकथा ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

18.  *❃❝ दोन कवड्या ❞❃*
     ━━═•●◆●★◆★●◆●•═━━
     बादशहाच्या अकबराच्‍या दरबारात कलाकारांना मानसन्‍मान दिला जात असे. तानसेनासारखा महान संगीतकार अकबराच्‍या दरबाराची शोभ होती. त्‍यावेळी तानसेनच्‍या तुलनेत दुसरा कोणीच संगीतकार नव्‍हता. त्‍यामुळे तानसेनला थोडा अहंकार झाला होता. त्‍यावेळी काही संगीतसाधकांनी आपल्‍या संगीत साधनेतून ईश्र्वराला लक्ष्‍य बनवले होते. हे लोक संगीताच्‍या माध्‍यमातून ईश्र्वराची उपासना लीन होऊन करत होते. यात अष्‍टछापचे कवी तसेच वल्लभ संप्रदायाचे काही आचार्य होते. एक दिवस तानसेन आचार्य विठ्ठलनाथ यांना भेटायला गेला. काही वेळ चर्चा केल्यावर तानसेनने विठ्ठलनाथांच्‍या सांगण्‍यावरून आपले गायन प्रस्‍तुत केले. विठ्ठलनाथांनी गायनाची स्‍तुती केली व तानसेनाला दहा सहस्त्र रूपये व दोन कवड्या इनामाच्‍या रूपात भेट दिल्या. तानसेनने कवडी देण्‍याचे कारण विचारले असता विठ्ठलनाथ म्‍हणाले,’’तुम्‍ही मुघल दरबाराचे प्रमुख गायक आहात त्‍यामुळे दहा हजारांचा इनाम देण्‍यात आला आहे आणि दोन कवड्या ही व्‍यक्तिगत माझ्या दृष्‍टीने तुमच्‍या गायनाची किंमत आहे.’’ तानसेनाला फार वाईट वाटले. तो जायला निघणार इतक्‍यात श्रीकृष्‍णाचे दुसरे भक्त गोविंद स्‍वामी तेथे आले आणि विठ्ठलनाथांच्‍या आग्रहावरून त्‍यांनी कृष्‍णाचे एक पद गायिले. ते ऐकून तानसेनच्‍या डोक्‍यात असलेला स्‍वत:च्‍या गायनाविषयीचा भ्रम कमी झाला व तो म्‍हणाला,’’ विठ्ठलनाथजी महाराज, माझ्या गायनाची वास्‍तवात खरेच किंमत दोन कवड्याइतकीच आहे. मी बादशहाला खुश करण्‍यासाठी गातो आणि तुम्‍ही ईश्र्वराला प्रसन्न करण्‍यासाठी गात असता. मखमल आणि गोणपाट यांची कधीच तुलना होऊ शकत नाही त्‍याप्रमाणे तुमचे गायन ईश्र्वरी आहे तर माझे मानवी आहे. आपण चांगले केले की माझा अहंकार तोडला’.’

        *🌀तात्पर्य ::~*
 कोणतेही काम  ईश्वरासाठी व ईश्वराचे  कार्य मानून केल्यास त्यात आपोआपच दैवी गुण प्रगट होतात.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ] ❂ प्रेरणादायी विचार ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

18.    *जितके  मोठे  मन*
    *तितके सोपे  जीवन...*
    *वादाने  अधोगती*
    *संवादाने  प्रगती...*
*जग काय म्हणेल हा विचार करु नका.*
*कारण लोक फार विचित्र आहेत.*
*अपयशी लोकांची थट्टा करतात.*
*आणि यशस्वी लोकांवर जळतात.!!*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ]   ❂ सामान्य ज्ञान ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

18.   *✿ देशातील पहिले ✿*
       ◑◑◑◆◑◑●★●◑◑◆◑◑◑
■ देशातील पहिले जन सुरक्षा कायदा करणारे राज्य ~
    ➜ आंध्रप्रदेश

■ देशातील पहिले फुलपाखराला राज्य फुलपाखराचा दर्जा देणारे राज्य~
     ➜  महाराष्ट्र

■ देशातील पहिला विशेष आर्थिक क्षेत्र (SEZ) प्रकल्प ~
     ➜  कांडला (गुजरात)

■ देशातील पहिले मानवाधिकार न्यायालय सुरु करणारे राज्य ~
     ➜  प.बंगाल

■ देशातील पहिले राईट इ सव्हिसेस अक्ट (RTS) पास करणारे राज्य ~
     ➜  मध्यप्रदेश
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ] ❂थोरव्यक्ती परिचय ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

18. *❒ छत्रपती शाहूराजे भोसले ❒*
       ┄─┅•●●★◆★●●•┅─
अधिकारकाळ :~ १७०७ - १७४९
राज्याभिषेक :~ १७०७
राज्यव्याप्ती :~ महाराष्ट्र, कोकण,
दक्षिण भारत, उत्तर भारत मध्य भारत आणि बहुतांश भारताचा भाग
राजधानी :~ सातारा
पूर्णनाव: शाहूराजे संभाजीराजे भोसले
जन्म :~ १८ मे १६८२
             माणगाव , सातारा ,
मृत्यू :~ १५ डिसेंबर १७४९, सातारा

      ◆छत्रपती शाहूराजे भोसले◆
   भारताचा इतिहासातील धुरंधर राजकारणी, उत्कृष्ट योद्धा, प्रभावशाली मराठा शासनकर्ता,मराठा साम्राज्याचा सर्वाधिक विस्तार करणारा राजा म्हणून भारतीय आणि विशेषत्वाने महाराष्ट्रीय इतिहासावर महत्वपूर्ण ठसा उमटवला. शाहू महाराजांच्या कारकिर्दीत शिवाजी महाराजांनी उभ्या केलेल्या आणि संभाजी महाराजांनी मोठ्या शौर्याने सांभाळलेल्या स्वराज्याचा सर्वात मोठा विस्तार झाला.सातारा हे त्याकाळात भारताच्या राजकारणाचे केंद्रस्थान आणि सत्तास्थान ठरले. मध्य भारत,उत्तर भारत,माळवा,गुजरात हे महाराष्ट्राबाहेरील प्रांत मराठ्यांच्या अधिपत्याखाली आले, मुघल
 साम्राज्याचा अस्त होऊन मराठा साम्राज्याचा झेंडा भारतभर फडकला.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹🔅✹★✹◑◎●••
            *✍संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
   ♦📱 7875840444 ♦
 *✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❃❂❃█║▌║█║▌

*◆ शुक्रवार ~ 18/05/2018 ◆*
*⋐⋑⛯⋐⋑⋐ MSP ⋑⋐⋑⛯⋐⋑*

No comments:

Post a Comment