"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

🛡 ★ 18. सप्टेंबर ★🛡

 🔻====●●●★●●●====🔻
★ हा या वर्षातील २६१ वा (लीप वर्षातील २६२ वा) दिवस आहे.

                   ~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
                  🔹•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔹
●२००९ : टेलिव्हिजनवर सलग ७२ वर्षे आणि त्याआधी रेडिओवर सलग १५ वर्षे सुरू असलेल्या ’द गायडिंग लाईट’ या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित करण्यात आला.
●१९९७ : महाराष्ट्र सरकारने कवीकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाची स्थापना केली.
●१९४८ : निझामाच्या सैन्याने पराभव स्वीकारल्यामुळे ’ऑपरेशन पोलो’ स्थगित करण्यात आले.
●१९४७ : अमेरिकन गुप्तचर संघटना सी. आय. ए. (CIA) ची स्थापना.
●१९२७ : महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची स्थापना
●१९२४ : गांधीजींनी हिदू मुस्लीम ऐक्यासाठी २१ दिवसांचे उपोषण सुरू केले.
●१८८५ : कॅनडातील माँट्रिअल शहरात कांजिण्यांची लस घेणे सक्तीचे केल्याने शहरात दंगली उसळल्या.

                      ~*★ जन्मदिवस / जयंती ★*~
                   🔸•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔸
◆१९१२ : गजानन हरी तथा राजा नेने – चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेते व दिग्दर्शक
◆१९०६ : प्रभूलाल गर्ग ऊर्फ 'काका हाथरसी' – हिन्दी हास्यकवी, पद्मश्री (१९८५). ते विडंबनकाव्यासाठी प्रसिद्ध होते. त्यांची सुमारे दीडशे पुस्तके प्रसिद्ध झाली. ’मेरा जीवन ए वन’ हे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे. ◆१९३२ मध्ये त्यांनी भारतीय शास्त्रीय संगीताला वाहिलेले ’संगीत’ हे मासिक सुरू केले, ते आजतागायत चालू आहे.

                     ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
                   🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००४ : डॉ. भालचंद्र दिनकर फडके – दलित साहित्याचे मर्मग्राही समीक्षक
●२००२ : शिवाजी सावंत – साहित्यिक. त्यांची ’मृत्यूंजय’ ही कादंबरी इंग्रजी, कन्नड, गुजराती, मल्याळी इ. भाषांमध्ये प्रसिद्ध झाली. या कादंबरीला महाराष्ट्र, गुजरात व पश्चिम बंगाल या राज्यशासनांचे पुरस्कार तसेच भारतीय विद्यापीठ या संस्थेचा ’मूर्तीदेवी पुरस्कार’ मिळाला आहे. (जन्म: ३१ ऑगस्ट १९४०)
●१९९५ : प्रभूलाल गर्ग ऊर्फ 'काका हाथरसी' – हिन्दी हास्यकवी, पद्मश्री (१९८५). ते विडंबनकाव्यासाठी प्रसिद्ध होते.
 ●१९३२ मध्ये त्यांनी भारतीय शास्त्रीय संगीताला वाहिलेले ’संगीत’ हे मासिक सुरू केले, ते आजतागायत चालू आहे.
●१९९३ : असित सेन – विनोदी अभिनेते व दिग्दर्शक, त्यांनी सुमारे ५०० चित्रपटांतून भूमिका केल्या
●१९९२ : मुहम्मद हिदायतुल्लाह – भारताचे सहावे उपराष्ट्रपती (२० ऑगस्ट १९७९ - २० ऑगस्ट १९८४) आणि ११ वे सरन्यायाधीश  (जन्म:१७ डिसेंबर १९०५ - लखनौ, उत्तर प्रदेश)

No comments:

Post a Comment