"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

🛡 ★ 18. ऑक्टोबर ★ 🛡

🔻====●●●★●●●====🔻
★  जागतिक रजोनिवृत्ती दिन
★ हा या वर्षातील २९१ वा (लीप वर्षातील २९२ वा) दिवस आहे.

                  ~*🔺महत्त्वाच्या घटना 🔺*~
                🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००२ : कसोटी व एकदिवसीय क्रिकेट सामन्यात वीस हजार धावा करणारा सचिन तेंडुलकर पहिला क्रिकेटपटू ठरला.
●१९६७ : सोविएत रशियाचे ’व्हेनेरा-४’ हे अंतराळयान शुक्रावर उतरले.
●१९०६ : महर्षि विठ्ठल रामजी शिंदे यांनी ’डिप्रेस्ड क्लास मिशन’ची स्थापना केली.
●१८७९ : थिऑसॉफिकल सोसायटीची स्थापना

                    ~*★ जन्मदिवस / जयंती ★*~
                  🔸•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔸
◆१९५० : ओम पुरी – अभिनेता
◆१९३९ : ली हार्वे ओस्वाल्ड – राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडीचा मारेकरी
◆१९२५ : इब्राहिम अल्काझी – नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (NSD) चे संचालक
◆१८६१ : ’भारताचार्य’ चिंतामणराव वैद्य – न्यायाधीश, कायदेपंडित, लेखक, आणि इंग्रजी व संस्कृतचे जाणकार. महाभारताच्या मराठी भाषांतराचा समारोप म्हणून त्यांनी लिहिलेल्या ‘महाभारताचा उपसंहार‘ या ग्रंथामुळे लोकमान्यांनी त्यांना ‘भारताचार्य‘ ही पदवी दिली.
◆१८०४ : मोंगकुट ऊर्फ राम (चौथा) - थायलंडचा राजा

                   ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
                🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००४ : वीरप्पन – चंदन तस्कर
●१९९३ : मंदाकिनी विश्वनाथ आठवले – भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिल्या बालअभिनेत्री. दादासाहेब फाळके यांच्या त्या कन्या .
●१९८३ : विजय मांजरेकर – क्रिकेटपटू
●१९५१ : हिराबाई पेडणेकर – पहिल्या स्त्री नाटककार, गायिका,
●१९०९ : लालमोहन घोष – देशभक्त, काँग्रेसचे १६ वे अध्यक्ष,
●१८७१ : चार्ल्स बॅबेज – इंग्लिश गणितज्ञ, संशोधक, अभियंता आणि तत्त्वज्ञ, पहिल्या यांत्रिकी संगणकाचा जनक 

No comments:

Post a Comment