"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

🛡 ★18.फेब्रुवारी★ 🛡

🔻====●●●★●●●====🔻
★हा या वर्षातील ४९ वा दिवस आहे.
★’गांबिया’चा स्वातंत्र्यदिन

                   ~*🔺महत्त्वाच्या घटना 🔺*~
                 🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००१ : संगीतकार व गायक भूपेन हजारिका यांना मध्यप्रदेश सरकारचा 'लता मंगेशकर पुरस्कार' प्रदान
●१९९८ : ज्येष्ठ गांधीवादी नेते, माजी केंद्रीय मंत्री व महाराष्ट्राचे माजी राज्यपाल सी. सुब्रमण्यन यांना 'भारतरत्‍न' हा सर्वोच्‍च नागरी सन्मान जाहीर
●१९७९ : सहारा वाळवंटाच्या दक्षिण अल्जीरियातील भागात बर्फ पडले. सहारा वाळवंटात बर्फ पडण्याची ही एकमेव नोंद आहे.

                   ~*★जन्मदिवस / जयंती★*~
                  🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
●१८९८ : एन्झो फेरारी – रेस कार निर्माते आणि ड्रायव्हर
●१८८३ : क्रांतिवीर मदनलाल धिंग्रा (मृत्यू: १७ ऑगस्ट १९०९)
●१८७१ : बॅ. विठ्ठलभाई पटेल – थोर देशभक्त, राजकीय नेते आणि हिंदुस्थानच्या केंद्रीय कायदेमंडळाचे पहिले भारतीय अध्यक्ष, सरदार वल्लभभाई पटेल यांचे थोरले बंधू
●१८३६ : रामकृष्ण खुदिराम परमहंस तथा गदाधर चट्टोपाध्याय – स्वामी विवेकानंदांचे गुरू
●१८२३ : रावबहादूर गोपाळ हरी देशमुख ऊर्फ ’लोकहितवादी’ – पत्रकार, समाजसुधारक व इतिहासकार. १८४८ ते १८५० या काळात ’प्रभाकर’ या साप्ताहिकातून त्यांनी शतपत्रांचे लेखन केले. स्त्रियांचा कोंडमारा करणार्‍या रुढींवर त्यांनी प्रहार केला. त्यांनी ४३ मराठी ग्रंथ लिहिले. ’लक्ष्मीज्ञान’ हा त्यांचा ग्रंथ हा अर्थशास्र्तावरील पहिला मराठी ग्रंथ आहे. (मृत्यू: ९ आक्टोबर १८९२)

                    ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
                 🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९९४ : पंडित गोपीकृष्ण – कथ्थक नृत्यशैलीचे बनारस घराण्याचे नर्तक, नृत्यदिग्दर्शक व अभिनेते.
●१९९२ : नारायण श्रीधर बेन्द्रे – आदिम कलेपासून चिनी चित्रकलेपर्यंत अनेक शैलीविशेष आत्मसात केलेले चित्रकार
●१९६७ : जे. रॉबर्ट ओपेनहायमर – अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ, अणूबॉम्बचे जनक
●१५६४ : मायकेल अँजेलो – इटालियन शिल्पकार आणि चित्रकार 

No comments:

Post a Comment