"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

🛡 * 18. मे * 🛡

🔻====●●●★●●●====🔻
★जागतिक संग्रहालय दिन
★हा या वर्षातील १३८ वा (लीप वर्षातील १३९ वा) दिवस आहे.

                   ~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
                   🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९९८ : पुण्याच्या सुरेन्द्र चव्हाणने जगातील सर्वोच्‍च एव्हरेस्ट शिखर सर केले.
●१९९५ : स्थानिक ठिकाणचे ५,००० रुपयांपर्यंतचे धनादेश खात्यात भरल्यानंतर तिसर्‍या दिवशी ती रक्‍कम ग्राहकास काढण्याची मुभा द्यावी, असा आदेश ’रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया’ने दिला.
●१९९१ : रशियाच्या सोयुझ अंतराळातुन भ्रमण करणारी हेलन शेरमन ही महिला पहिली ब्रिटिश अंतराळयात्री बनली.
●१९७४ : भारताने पोखरण येथे आण्विक अस्त्राची पहिली यशस्वी चाचणी केली.
●१९७२ : दापोली येथे कोकण कृषी विद्यापीठाची स्थापना झाली.
●१९१२ : पूर्णपणे भारतात बनवलेला मूकपट ’पुंडलिक’ प्रदर्शित झाला.
●१८०४ : नेपोलिअन बोनापार्ट फ्रान्सचा सम्राट झाला.
●१४९८ : वास्को-द-गामा भारतातील कालिकत बंदरात दाखल झाला.

               ~*★ जन्मदिवस / जयंती ★*~
              🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९३३ : एच. डी. देवेगौडा – भारताचे ११ वे पंतप्रधान
◆१९२० : पोप जॉन पॉल (दुसरा)
◆१९१३ : पुरुषोत्तम काकोडकर – गोवा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्यसैनिक, काँग्रेसचे नेते, ५ व्या लोकसभेचे सदस्य
◆१८७२ : बर्ट्रांड रसेल – ब्रिटिश गणितज्ञ, तत्त्वज्ञ आणि इतिहासकार
◆१६८२ : छत्रपती शाहू महाराज (मूळ नाव शिवाजी) – छत्रपती संभाजी व येसूबाई यांचे चिरंजीव (मृत्यू: १५ डिसेंबर १७४९)

                  ~*★ मृत्यू / पुण्यतिथी ★*~
                 🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००९ : वेल्लुपल्ली प्रभाकरन – एल. टी. टी. ई. चा संस्थापक
●१९९९ : रामचंद्र सप्रे – पहिले राष्ट्रीय बुद्धीबळ विजेते
●१९९७ : कमलाबाई कामत तथा कमलाबाई रघुनाथ गोखले – भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिल्या स्त्री कलाकार. ’राजा हरिश्चंद्र’ या पहिल्या मूकपटात त्यांनी भूमिका केली होती. त्यांचे चिरंजीव चंद्रकांत गोखले व नातू विक्रम गोखले अशा तीन पिढ्यांनी अभिनय क्षेत्र गाजवले.
●१९६६ : पंचानन माहेश्वरी – सपुष्प वनस्पतींतील पुनरुत्पादन क्रियेसंबंधी संशोधन करणारे वनस्पतीशास्त्रज्ञ
●१८४६ : बाळशास्त्री जांभेकर – मराठी पत्रकारितेचे पितामह, १८३२ मधे ’दर्पण’ हे वृत्तपत्र काढून त्यांनी वृत्तपत्र व्यवसायाचा पाया घातला. ’दिग्दर्शन’ हे मराठीतील पहिले मासिकही त्यांनीच १८४० मधे सुरू केले.
(जन्म: ६ जानेवारी १८१२)
           ●~~●~~●~~◆~~●~~●~~●

No comments:

Post a Comment