"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

🛡 *19. एप्रिल * 🛡

      🛡 *19. एप्रिल * 🛡
🔻====●●●★●●●====🔻
★ हा या वर्षातील १०९ वा (लीप वर्षातील ११० वा) दिवस आहे.

    ~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
 🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९७५ : ’आर्यभट्ट’ हा भारताचा पहिला उपग्रह रशियन अंतराळस्थानकावरुन प्रक्षेपित करण्यात आला.
●१९५६ : गीतरामायणातील शेवटचे गाणे पुणे आकाशवाणीवरुन प्रसारित झाले.
●१५२६ : मोगल साम्राज्याचा संस्थापक जहीरुद्दीन महंमद बाबर याने दिल्लीच्या इब्राहीमखान लोदीचा पराभव करुन मोगल राजसत्तेचा पाया घातला.

    ~*★ जन्मदिवस / जयंती ★*~
 🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९८७ : मारिया शारापोव्हा – रशियन लॉनटेनिस खेळाडू
◆१९५७ : मुकेश अंबानी – उद्योगपती
◆१९१२ : ग्लेन सीबोर्ग – नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ
◆१८९२ : ताराबाई मोडक – शिक्षणतज्ञ. कोसबाड येथील आदिवासींच्या जीवनात बालशिक्षण व सुधारणांचे नंदनवन त्यांनी फुलवले. गुजरातेतील बार्टन फिमेल ट्रेनिंग कॉलेजच्या त्या पहिल्या भारतीय प्राचार्या होत्या. बालमंदिरांची निर्मिती हे ताराबाईंचे प्रमुख कार्य आहे.
(मृत्यू: ३१ ऑगस्ट १९७३)
◆१८६८ : पॉल हॅरिस – रोटरी क्लबचे संस्थापक (मृत्यू: २७ जानेवारी १९४७)

     ~*★ मृत्यू / पुण्यतिथी ★*~
   🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००८ : सरोजिनी बाबर – लेखिका, संतसाहित्याच्या अभ्यासिका व राजकारणी
●१९९४ : मेजर जनरल राजिंदरसिंग ‘स्पॅरो’ – पंजाबचे माजी मंत्री. पाकिस्तानच्या ’पॅटन’ रणगाड्यांचा धुव्वा उडवल्याबद्दल त्यांचा ’ईगल’ (गरूड) म्हणून गौरव केला असता, मी तर केवळ एक ’स्पॅरो’ (चिमणी) आहे, असे त्यांनी सांगितले, आणि तेच त्यांचे टोपणनाव रुढ झाले.
●१९९३ : डॉ. उत्तमराव पाटील – स्वातंत्र्यसैनिक, पत्री सरकारमधे त्यांचा सहभाग होता.
●१९१० : अनंत कान्हेरे – क्रांतिकारक
●१९०६ : पिअर क्यूरी – नोबेल पारितोषिकविजेते फ्रेन्च भौतिकशास्त्रज्ञ
●१८८२ : चार्ल्स डार्विन – उत्क्रांतीवादाचा सिद्धांत मांडणारे ब्रिटिश जीवशास्त्रज्ञ 

No comments:

Post a Comment