"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

🛡 * 20. मे * 🛡

🔻====●●●★●●●====🔻
★हा या वर्षातील १४० वा (लीप वर्षातील १४१ वा) दिवस आहे.

              ~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
             🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००१ : चित्रपट निर्माते व लेखक अण्णासाहेब देऊळगावकर यांना अखिल भारतीय चित्रपट महामंडळातर्फे ’चित्रभूषण पुरस्कार’ जाहीर
●२००० : राष्ट्रकुल संसदीय संघटनेच्या आशिया विभागाच्या अध्यक्षपदी लोकसभेचे सभापती जी. एम. सी. बालयोगी यांची एकमताने निवड झाली.
●१९९६ : देशाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल माजी केंद्रीय अर्थमंत्री डॉ. मनमोहन सिंग यांना ’ऑनेस्ट मॅन ऑफ द ’इयर हा पुरस्कार जाहीर
●१४९८ : पोर्तुगीज खलाशी वास्को-द-गामा हा ’केप ऑफ गुड होप’ला वळसा घालून कालिकत बंदरात दाखल झाला.

               ~*★ जन्मदिवस / जयंती ★*~
               🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९१५ : मोशे दायान – इस्त्रायलचे परराष्ट्रमंत्री, कृषीमंत्री आणि संरक्षणमंत्री, इस्रायली सेना प्रमुख
◆१९०० : सुमित्रानंदन पंत – छायावादी विचारधारेतील हिन्दी कवी
◆१८५० : विष्णूशास्त्री चिपळूणकर – आधुनिक मराठी गद्याचे जनक, ग्रंथकार आणि ’केसरी’चे एक संस्थापक. चित्रशाळा, आर्यभूषण छापखाना अनेक समाजोपयोगी उपक्रम त्यांनी सुरू केले. (मृत्यू: १७ मार्च १८८२)

                   ~*★ मृत्यू / पुण्यतिथी ★*~
                  🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९९७ : माणिकराव लोटलीकर – इंडियन एज्युकेशन सोसायटीचे (IES) विश्वस्त, शिक्षणक्षेत्रातील ’विश्वकर्मा’
●१९९४ : के. ब्रम्हानंद रेड्डी – आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री, महाराष्ट्राचे राज्यपाल आणि काँग्रेसचे अध्यक्ष
●१९९२ : डॉ. लीला मूळगांवकर – सामाजिक कार्यकर्त्या, मुंबईच्या माजी नगरपाल, भारतातील ऐच्छिक रक्तदान सेवेच्या प्रवर्तक
●१९६१ : भाई विष्णूपंत चितळे – कम्युनिस्ट नेते व प्रभावी वक्ते
●१९३२ : बिपिन चंद्र पाल – ’लाल-बाल-पाल’ या त्रयीतील स्वातंत्र्यसेनानी (जन्म: ७ नोव्हेंबर १८५८)
●१८७८ : कृष्णशास्त्री चिपळूणकर – समाजसुधारक व संस्कृत विद्वान
●१७६६ : मल्हारराव होळकर – इंदूरच्या राज्याचे संस्थापक, मराठेशाहीतील पराक्रमी सेनापती व मुत्सद्दी (जन्म: १६ मार्च १६९३)
●१५०६ : ख्रिस्तोफर कोलंबस – इटालियन दर्यावर्दी व संशोधक
           ●~~●~~●~~◆~~●~~●~~●

No comments:

Post a Comment