"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

🛡 ★ 21. मार्च ★ 🛡

🔻====●●●★●●●====🔻
★ आंतरराष्ट्रीय पृथ्वी दिन
★ वंशभेद निर्मूलन दिन
★ जागतिक अरण्य दिन
★ आंतरराष्ट्रीय कविता दिन
★ हा या वर्षातील ८० वा (लीप वर्षातील ८१ वा) दिवस आहे.

                        ~*🔺महत्त्वाच्या घटना 🔺*~
                       🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००० : फ्रेंच गयानातील कोअरु येथून 'एरियन ५०५' या वाहकाद्वारे भारताचा 'इन्सॅट ३ बी ' हा उपग्रह यशस्वीपणे प्रक्षेपित करण्यात आला.
●१९९० : नामिबियाला दक्षिण अफ्रिकेपासून स्वातंत्र्य मिळाले.
●१९८० : अमेरिकेने मॉस्को ऑलिम्पिक खेळांवर बहिष्कार टाकला.
●१९७७ : भारतातील आणीबाणी संपुष्टात आली.
●१६८० : शिवाजी महाराजांनी कुलाबा (रायगड) किल्ल्याची बांधणी सुरू केली.
●१५५६ : ख्रिश्चन धर्मात सुधारणांची आवश्यकता आहे असे सांगणार्‍या आर्चबिशप थॉमस क्रॅनमरला शिक्षा म्हणून जिवंत जाळण्यात आले.

                       ~*★जन्मदिवस / जयंती★*~
                        🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९७८ : राणी मुखर्जी – अभिनेत्री
१९१६ : बिस्मिला खाँ – शहनाई नवाझ (मृत्यू: २१ ऑगस्ट २००६)
◆१८८७ : मानवेंद्रनाथ रॉय – देशभक्त, क्रांतिकारक व भारतातील कम्यूनिस्ट पक्षाचे संस्थापक
◆१८४७ : बाळाजी प्रभाकर मोडक – ’कालजंत्री’कार, शालिवाहन शक व तिथी आणि ख्रिस्ती सन यांचा मेळ घालण्याचे कोष्टक तयार करणारे, विज्ञानप्रसारक, लेखक
◆१७६८ : जोसेफ फोरियर – फ्रेन्च गणितज्ञ व भौतिकशास्त्रज्ञ

                          ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
                        🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२०१० : पांडुरंग लक्ष्मण तथा ’बाळ’ गाडगीळ – अर्थशास्त्रज्ञ व विनोदी लेखक (जन्म: २९ मार्च १९२६)
●२००५ : दिनकर द. पाटील – चित्रपट दिग्दर्शक, पटकथा व संवाद लेखक
●१९७३ : यशवंत रामकृष्ण दाते – कोशकार. चिं. ग. कर्वे यांच्या साहाय्‍याने त्यांनी ’महाराष्ट्र मंडळ कोश’ स्थापन करून आठ खंडांचा ’महाराष्ट्र शब्दकोश’ तयार केला.
●१९७३ : ’आतुन कीर्तन वरुन तमाशा’ या नाटकाचा प्रयोग करत असतानाच नटवर्य शंकर घाणेकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. 

No comments:

Post a Comment