*22/05/18 मंगळवारचा परीपाठ*
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
*🌅 _महाराष्ट् शिक्षक पॅनल_* 🌅
━━═•●◆●★❂★●◆●•═━━
*Ⓜ💲🅿 _परीपाठ_ Ⓜ💲🅿*
====●●●★♦★●●●====
*❂ दिनांक:~ 22/05/2018 ❂*
*🔘 वार ~ मंगळवार 🔘*
*⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽⌘⌘⌘*
*💥🇮🇳 राष्ट्रगीत 🇮🇳💥*
➖➖➖➖➖➖➖➖
*💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
➖➖➖➖➖➖➖➖
*💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐ MSP ⋑⋐⋑⛯⋐⋑*
*💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
🔘 *"माझी शाळा"* 🔘
*ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
🔗🔗👇👇🔗🔗
https://satishborkhade.blogspot.in/?m=1
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ] ❂ आजचे पंचाग ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━
🍥 *22. मे :: मंगळवार* 🍥
━━═•●◆❃★❂★❃◆●•═━━
अधिक जेष्ठ शु. ८
तिथी : शुक्ल पक्ष अष्टमी,
नक्षत्र : मघा,
योग : व्यघात, करण : विष्टी,
सूर्योदय : 06:02, सूर्यास्त : 19:08,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ] ❂ सुविचार ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━
22. जो स्वत: दु:खातून गेला नाही त्याला दुसऱ्याचे दु:ख कसे कळणार?
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ] ❂ म्हणी व अर्थ ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━
22. *गाढवाला गुळाची चव काय –*
*★ अर्थ ::~* अडाणी, मूर्ख माणसास गुणाचे कौतुक नसते
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ] ❂ सुभाषीत ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━
22. *नास्त्युद्यमसमो बन्धु: ।*
⭐अर्थ ::~
उद्योगासारखा दुसरा मित्र नाही.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ] ❂ दिनविशेष ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━
🛡 *★22. मे★* 🛡
🔻====●●●★●●●====🔻
★जागतिक जैवविवीधता दिन
★हा या वर्षातील १४२ वा (लीप वर्षातील १४३ वा) दिवस आहे.
~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००४ : भारताचे १३ वे पंतप्रधान म्हणून डॉ. मनमोहन सिंग सूत्रे हाती घेतली.
●१९७२ : सिलोनने नवीन राज्यघटना स्वीकारुन ते प्रजासत्ताक बनले. त्या देशाचे श्रीलंका असे नामकरण झाले आणि त्याने राष्ट्रकुल देशांत प्रवेश केला.
●१९६१ : हुंडाबंदी विधेयकाला राष्ट्रपतींची संमती मिळून हुंडाबंदी कायदा अस्तित्त्वात आला.
●१९१५ : स्कॉटलंडच्या ग्रेटना ग्रीन गावात ३ रेल्वेगाड्यांची टक्कर होऊन २२७ जण ठार आणि २४६ जण जखमी झाले.
●१९०६ : राईट बंधूंनी उडणाऱ्या यंत्राचे (Flying Machine) पेटंट घेतले.
~*★ जन्मदिवस / जयंती ★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९४० : एरापल्ली अनंतराव श्रीनिवास प्रसन्ना – भारतीय फिरकी गोलंदाज
◆१८७१ : विष्णू वामन बापट – संस्कृत विद्वान, भाषांतरकार व शास्त्रसुधारक, शंकराचार्यांच्या ग्रंथांचे व इतर संस्कृत ग्रंथांचे मराठीत अनुवाद केले.
◆१७७२ : राजा राम मोहन रॉय – समाजसुधारक, धर्मसुधारक व ब्राम्हो समाजाचे संस्थापक, कन्याविक्रय, कन्याहत्या, बालविवाह इ. चालींमधून स्त्रीला मुक्त करण्यासाठी त्यांनी आंदोलन उभारले.
~*★ मृत्यू / पुण्यतिथी ★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९९८ : डॉ. मधुकर आष्टीकर – लेखक, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष
●१९९५ : रविंद्र बाबुराव मेस्त्री – चित्रकार व शिल्पकार, कलामहर्षी बाबूराव पेंटर यांचे ज्येष्ठ चिरंजीव, शिवाजीमहाराजांचे पुतळे करण्यात त्यांचा हातखंडा होता.
●१९९१ : कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे – भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक व कामगार पुढारी, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील अग्रणी नेते, गोवा मुक्ती समितीचे अध्यक्ष. त्यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त त्यांना तत्कालीन सोविएत संघराज्यातर्फे ‘ऑर्डर ऑफ लेनिन’ सन्मान प्रदान करण्यात आला.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व "मुख्य मराठी" बातम्या
वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..
https://goo.gl/8D33ox
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0६ ] ❂ बोधकथा ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━
22. *❃❝ किम्मत ❞❃*
━━═•●◆●★◆★●◆●•═━━
एका राज महालात एक बाई
मोलकरीण म्हणुन काम करत असते.
तिचा लहान मुलगा ही तिथच तिच्या बरोबर येत असे. एक दिवस त्याला राजमहालात खेळता खेळता हीरा सापडतो ,तो मुलगा तो हीरा घेऊन पळत आई कडे जातो.
"आई बघ मला हीरा सापडला"
मोलकरीण हुशार असते ,
तीला वाटते हा हीरा घेऊन आपण बाहेर नाही जाऊ शकणार, ती मुलाला म्हणते नाही रे काच आहे तो हीरा नाही .असे म्हणुन हीरा बाहेर फेकुन देते .काम आटोपल्यावर जेव्हा ती घरी जायला निघते तेव्हा ती तो हीरा सोबत घेऊन जाते.मग ती तो हीरा सोनारा कडे घेऊन जाते .
सोनाराला कळत कि हिला हा हीरा सापडला असणार कुठेतरी. हिला काय माहीत हा हीरा च आहे अस म्हणुन... तो तीला म्हणतो हा हीरा नाही ही तर काच आहे. असे म्हणुन तो पण तो हीरा बाहेर फेकुन देतो. जेव्हा ती घरी जाते तेव्हा तो सोनार बाहेर जाऊन तो हीरा घेऊन येतो व जोहरी कडे घेऊन जातो.
जोहरी हीरा पाहतो त्याला कळत हा हीरा अनमोल आहे त्याची नियत खराब होते. तो हीरा घेतो आणि बाहेर फेकुन देतो काच आहे अस म्हणतो. जसा हीरा बाहेर पडतो तसे त्याचे तुकडे तुकडे होऊन जातात. हे सगळ एक वाटसरु लांबुन पाहत असतो .
तो त्या ही-या जवळ येतो आणि त्याला म्हणतो मोलकरीण आणि सोनार ह्या दोघांनी तुला दोन वेळा फेकल तेव्हा तु तुटला नाही, पण आता का तुटला तु ,हीरा म्हणतो जेव्हा मोलकरीण व सोनाराने मला फेकले ते माझी खरी किंमत जाणत नव्हते .
परंतु जोहरी तर माझी किंमत जाणत होता. तरी त्याने मला फेकले हा आघात मी सहन करुच शकलो नाही.
म्हणुन मी तुटलो.
असेच मनुष्याच्या बाबतीत होत असते, जे तुम्ही काय आहे हे जाणुन पण तुमच मन तुडवतात तेव्हा तो आघात सहन करु शकत नाही.
*🌀❝ तात्पर्य ❞ ::~*
म्हणुन कधीही आपल्या लोकांचे जराश्या स्वार्था करता मन तोडु नका...
आपल्या आजुबाजुची खुप सारी
आपली माणस हि-यासारखी असतात, त्यांच्या भावना व मन दुखवून त्यांच्या चांगल्या गुणांचे तुकडे तुकडे करू नका.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ] ❂ प्रेरणादायी विचार ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━
22. *भविष्याची जराही कल्पना नसताना*
*आपण मोठ्या गोष्टींचे नियोजन*
*करतो तोच खरा मनाचा*
*"आत्मविश्वास"*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ] ❂ सामान्य ज्ञान ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━
22. *✿ सामान्य ज्ञान प्रश्नावली ✿*
◑◑◑◆◑◑●★●◑◑◆◑◑◑
■ सर्वाधिक लोकसंख्येचा देश?
👉 चीन
■ क्षेत्रफळाने मोठा देश कोणता?
👉 रशिया
■ सर्वांत मोठा खंड कोणता?
👉 आशिया
■ सर्वांत मोठी गर्ता कोणती?
👉 मरियना
■ सर्वांत मोठा पक्षी कोणता?
👉 शहाम्रुग
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ] ❂थोरव्यक्ती परिचय ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━
22. *❒ राजा राममोहन राय ❒*
━━═•●◆●★◆★●◆●•═━━
●जन्म :~ २२ मे १७७२
●मृत्यू :~ २७ सप्टेंबर १८३३
राजा राममोहन रॉय
यांना भारतीय प्रबोधनाचे जनक मानले जाते. ब्रिटिशांचे भारतातील राज्य स्थिरावत असताना ब्रिटिशांच्या आगमनाने भारतीय समाजात क्रिया-प्रतिक्रियांचे चक्र सुरू झाले होते. भारतीयांची गाठ अगदी वेगळ्या प्रकारच्या सांस्कृतिकतेशी, मानसिकतेशी पडली होती. व्यक्ती, व्यक्तीची प्रतिष्ठा व व्यक्तीचे स्वातंत्र्य या बाबींना समाजरचनेच्या केंद्रस्थानी ठेवून राजकीय, सामाजिक व्यवहार करणारा ब्रिटिश समाज आणि समुच्चयात्मक पद्धतीने सामूहिक जीवन जगणारा भारतीय समाज या परस्परविरोधी वाटणाऱ्या संस्कृतींमध्ये चलनवलन सुरू झाले. या प्रक्रियेत भारतातील समाजधुरिणांसमोर दोन आव्हाने उभी होती. एक म्हणजे: ज्यांची सत्ता प्रस्थापित झाली आहे, ते सत्ताधारी, त्यांचा समाज, त्यांची संस्कृती, त्यांचे तत्त्वज्ञान यांचे आकलन करून घेणे. दुसरे म्हणजे : त्याच वेळी या सत्ताधाऱ्यांकडून भारतीयांच्या धार्मिक, सांस्कृतिक रूढींवर-प्रथांवर होत असणाऱ्या हल्ल्यांचा समर्थपणे प्रतिवाद करणे व प्रतिसाद देणे.
इ.स. १८१२ मधे त्यांचे थोरले बंधू जगन्मोहन यांचा मृत्यू झाला. त्याप्रसंगी त्यांच्या कुटुंबियांनी बळजबरीन जगन्मोहन यांच्या पत्नीला सती जायला लावल. राम मोहन यांनी त्याप्रसंगी विरोध केला, पण तो प्रकार थांबवू शकले नाहीत. त्या काळात स्त्रीया सती जाण्याच प्रमाण प्रचंड होत. तत्कालीन पंडीतांच्या मते पतीच्या मृत्यूनंतर विधवा स्त्रीपुढे दोनच पर्याय असत. एक म्हणजे सर्व सुखांचा त्याग करून अत्यंत कठोर नियमांनी बद्ध अस जीवन जगणे किंवा दुसरा पर्याय म्हणजे सती जाणे. एकदा स्त्रीनं सती जाण्याचा निर्णय घेतला असता तिला त्यापासून परत फिरता येत नसे. अर्थात ज्या समाजात स्त्रीला मूळातच दुय्यम स्थान होत (/आहे) आणि जिला स्वतःचा आवाजच नव्हता ती हा निर्णय स्वतः घेत असेल ही शक्यताही धूसरच आहे.
भावनेच्या भरात एखाद्या स्त्रीन असा निर्णय घेउन नंतर चितेवर गेल्यावर तिथून परत फिरायचा प्रयत्न केला तर तिला मोठ्या मोठ्या बांबूंच्या सहाय्यान आत ढकलंल जात असे. तिचा आक्रोश कोणाला ऐकायला येउ नये यासाठी तिथ मोठ-मोठी वाद्य वाजवली जात. कलकत्त्याच्या स्मशानभूमीत वाद्यांच्या गजरात पतीच्या चितेवरती बळजबरीन जाळल्या जाणार्या स्त्रीया हे नेहमीच दृश्य असे. बरेचदा त्या स्त्रीला नशा येणारा भांग किंवा तत्सम पदार्थ दिला जात असे आणि त्या अमलाखाली असतानाच ती चितेवर गेली की तिला तिच्या मृत पतीच्या प्रेताशी बांधून टाकण्यात येई.
बंधू च्या मृत्यूनंतर अशाप्रकारे त्यांच्या पत्नीला देखील जाळल्यामुळ राम मोहन प्रचंड व्यथित झाले आणि त्यांनी सती प्रथे विरोधात मोहीम उघडली. राम मोहन बाबू स्मशानात जाउन सती जाणार्या स्त्रीयांच मन वळवायचा, त्यांना सती जाण्यापासून थांबवण्याचा प्रयत्न करत. ब्रिटीश इस्ट इंडीया कंपनीन १७९८ साली कलकत्त्यामधे सर्वप्रथम सतीबंदी कायदा लागू केला. परंतु हा फक्त कलकत्ता शहरापुरताच लागू होता. त्यानंतर विल्यम कॅरे हा ख्रीश्चन मिशनरी आणि विल्यम विल्बरफोर्स या दोघांनी सती प्रथेविरुद्ध आंदोलन आणि प्रचार सुरु केला. याची दखल घेउन कंपनी सरकारन १८१३ मधे सती जाणार्या स्त्रीयांची मोजणी सुरु केली. राम मोहन रॉय यांच्यामते संपूर्ण बंगाल प्रांतात (जो आजच्या पश्चीम बंगालपेक्षा बराच मोठा होता) प्रत्यक्षात सती जाणार्या स्त्रीयांची संख्या या आकडेवारिच्या दसपट तरी असेल. ज्येष्ठ बंधूंच्या पत्नीच्या मृत्यूनंतर राम मोहन यांनी थेट स्मशानात जाउन सती जाणार्या स्त्रीयांना थांबवण्याचा प्रयत्न केला. काही प्रसंगी ते यशस्वी देखील झाले.
१८१८ मधे प्रथेला विरोध करणारा एक लेख प्रसिद्ध केला. यामधे एक प्रथेचा समर्थक आणि एक विरोधक यांच्या संवादातून त्यांनी सती प्रथेच्या समर्थनार्थ दिल्या जाणार्या कारणांच खंडन केल आहे. त्यांनी मांडलेले बहुतांश मुद्दे हे आजही जसेच्या तसे, लागू होतात.
ह्या लेखात त्यांनी चर्चेला घेतलेले प्रमुख मुद्दे म्हणजे स्त्रीया ह्या मुळातच पुरुषांपेक्षा हीन आहेत, त्यांची शारिरिक क्षमता पुरुषांपेक्षा कमी आहे. स्त्रीया निर्बुद्ध असतात, निर्णय घ्यायला सक्षम नसतात. त्यांच्यावरती (चारित्र्या बाबतीत) विश्वास ठेवला जाउ शकत नाही . त्या फार भावनिक असतात. हे आणि इतरही काही मुद्दयांचा समाचार त्या निबंधात घेतला आहे.
त्या काळच्या प्रथेच्या समर्थकांनी ही सगळी कारण हे स्त्रीच अस्तीत्वच गौण असत, तिला तिचा पती हाच परमेश्वर असतो आणि त्याच्याशिवाय तिच अस्तित्वच नाही हे सिद्ध करण्यासाठी हा सगळा प्रपंच केला होता अस दिसतय. सती जाणे ही वरवर जरी धार्मिक प्रथा दिसत असली तरी अनेकदा एखाद्या स्त्रीला सती जायला लावण्यात लोभी नातेवाईकांचादेखील हात असे. ह्यामुळ धर्माचा सर्रास आधार याकामी घेतला जात असे. त्यामुळ १८३० मधे, सरकारन १८२९ मधे या अमानुष प्रथेवर बंदी घातल्यानंतर, राम मोहन बाबूंनी Suttee and the Shastras असा एक लेख लिहीला. यामधे त्यांनी वेद, स्मृती, भगवद्गीता यांतील अनेक श्लोकांचा आधारे या प्रथेला शास्त्राधार नाही हे दाखवून दिल. त्यात त्यांनी अंगिर आणि व्यास ऋषी यांचे प्रथेचे समर्थन करणारे तर मनु, याज्ञवल्क्य, भगवद्गीता यांचे ही प्रथा सक्तीची नसून सर्वस्वी ऐच्छीक असल्याचे दाखले दिले आहेत.
◆ फलित :~
४ डिसेंबर १८२९ रोजी, राजा राम मोहन रॉय आणि इतरांच्या प्रयत्नाला यश येउन, सती प्रथा बंद करण्याविषयीच विधेयक लॉर्ड विल्यम बेंन्टीन्क गव्हर्नर जनरल, व्ह्यायकाऊंट काँबरमीअर कमांडर-इन-चीफ, डब्ल्यू. बी. बेयले आणि सर सी. टी. मेटकाफ यांच्या संयुक्त समीतीन संमत केल. १६ जानेवारी १८३० ला राम मोहन रॉय यांनी लॉर्ड विल्यम बेन्टीन्कला सती प्रथेवर कायद्यान बंदी घातल्याबद्दल अभिनंदन आणि आभाराच एक पत्र पाठवल. परंतू यानंतरही सती प्रथेच्या समर्थक धर्म मार्तंडांनी, तत्कालीन सर्वोच्च न्यायपीठ म्हणजेच प्रीव्ही कौन्सीलपुढे याचिका दाखल केली. दिल्लीचा मुघल बादशहा अकबर दुसरा याच्यावतीन त्याची तनखा वाढवून देण्यासाठी “राजा” हा किताब देउन राम मोहन रॉय यांची नियुक्ती झाली होती. त्या बादशहाची बाजू मांडण्यासाठी राजा राम मोहन रॉय १८३० साली इंग्लडला गेले. तिथे असतानाच त्यांनी सरकारपुढे सती प्रथेविरोधात पुन्हा एकदा बाजू मांडली. ११ जुलै १८३२ रोजी इंग्लंडच्या प्रीव्ही कौन्सीलपुढे या विधेयकाला विरोध करणारी याचिका फेटाळण्यात आली.
कार्य: –
तत्कालीन भारतीय विचारवंत या दोन्ही आघाड्यांवर काय करावे, या पेचात होते. या दोन्ही आघाड्यांवर राजा राममोहन रॉय यांनी अतिशय समर्थपणे कार्य तर केलेच; पण आपल्या कार्यातून आधुनिक भारताची पायाभरणी करून तिची दिशाही सूचित केली. यासाठी त्यांनी एका बाजूला भारतीय परंपरा, धर्म यांची चिकित्सा केलीच; पण ख्रिस्ती धर्माचा अभ्यास करून त्याचीही चिकित्सा केली (त्यातून त्यांनी ढीळपळीूंची कल्पना नाकारली), तर दुसऱ्या बाजूला सतीसारख्या सर्वस्वी अमानुष प्रथेवर सातत्याने टीका करून ती प्रथा बंद होण्यासाठी प्रयत्न केले व त्यांना त्यात यशही मिळाले. या दोन्ही आघाड्यांवर लढताना, कार्ये करताना ब्रिटिशांबाबत त्यांनी संवाद, सहकार्य; प्रसंगी टीका यांचा वापर केला. धार्मिक, आर्थिक, सांस्कृतिक, शेतीव्यवस्था, न्यायव्यवस्था या विषयांवर चिंतन व लेखन केले.
राजा राममोहन रॉय यांच्या या साऱ्या कर्तृत्वावर इंग्लिशमध्ये, बंगालीमध्ये पुष्कळच लिहिले गेले आहे. मराठीत मात्र याचा दुष्काळच आहे. इतिहासाच्या पाठ्यपुस्तकात केवळ सतीबंदीची चाल आणि रॉय एवढेच समीकरण आढळते. यापेक्षा जास्त समग्र स्वरूपाची माहिती मराठीत उपलब्ध नाही.
इंग्लंडमधील स्टेपलटन या गावी २७ सप्टेंबर १८३३ रोजी या महात्म्यान या जगाचा निरोप घेतला. दक्षिण ब्रिस्टल म धील आर्नोस वॅले दफनभूमीत त्यांच दफन करण्यात आले.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹🔅✹★✹◑◎●••
*✍संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
♦📱 7875840444 ♦
*✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❃❂❃█║▌║█║▌
*◆ मंगळवार ~ 22/05/2018 ◆*

No comments:
Post a Comment