"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

🛡 *22. मे * 🛡

🔻====●●●★●●●====🔻
★जागतिक जैवविवीधता दिन
★हा या वर्षातील १४२ वा (लीप वर्षातील १४३ वा) दिवस आहे.

               ~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
            🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००४ : भारताचे १३ वे पंतप्रधान म्हणून डॉ. मनमोहन सिंग सूत्रे हाती घेतली.
●१९७२ : सिलोनने नवीन राज्यघटना स्वीकारुन ते प्रजासत्ताक बनले. त्या देशाचे श्रीलंका असे नामकरण झाले आणि त्याने राष्ट्रकुल देशांत प्रवेश केला.
●१९६१ : हुंडाबंदी विधेयकाला राष्ट्रपतींची संमती मिळून हुंडाबंदी  कायदा अस्तित्त्वात आला.
●१९१५ : स्कॉटलंडच्या ग्रेटना ग्रीन गावात ३ रेल्वेगाड्यांची टक्कर होऊन २२७ जण ठार आणि २४६ जण जखमी झाले.
●१९०६ : राईट बंधूंनी उडणाऱ्या यंत्राचे (Flying Machine) पेटंट घेतले.

              ~*★ जन्मदिवस / जयंती ★*~
                🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९४० : एरापल्ली अनंतराव श्रीनिवास प्रसन्ना – भारतीय फिरकी गोलंदाज
◆१८७१ : विष्णू वामन बापट – संस्कृत विद्वान, भाषांतरकार व शास्त्रसुधारक, शंकराचार्यांच्या ग्रंथांचे व इतर संस्कृत ग्रंथांचे मराठीत अनुवाद केले.
◆१७७२ : राजा राम मोहन रॉय – समाजसुधारक, धर्मसुधारक व ब्राम्हो समाजाचे संस्थापक, कन्याविक्रय, कन्याहत्या, बालविवाह इ. चालींमधून स्त्रीला मुक्त करण्यासाठी त्यांनी आंदोलन उभारले.
 (मृत्यू: २७ सप्टेंबर १८३३)

                ~*★ मृत्यू / पुण्यतिथी ★*~
             🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९९८ : डॉ. मधुकर आष्टीकर – लेखक, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष
●१९९५ : रविंद्र बाबुराव मेस्त्री – चित्रकार व शिल्पकार, कलामहर्षी बाबूराव पेंटर यांचे ज्येष्ठ चिरंजीव, शिवाजीमहाराजांचे पुतळे करण्यात त्यांचा हातखंडा होता.
●१९९१ : कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे – भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक व कामगार पुढारी, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील अग्रणी नेते, गोवा मुक्ती समितीचे अध्यक्ष. त्यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त त्यांना तत्कालीन सोविएत संघराज्यातर्फे ‘ऑर्डर ऑफ लेनिन’ सन्मान प्रदान करण्यात आला.
(जन्म: १० ऑक्टोबर १८९९)
●१८८५ : व्हिक्टर ह्यूगो – जागतिक कीर्तीचे फ्रेन्च कादंबईकार, कवी आणि लेखक
           ●~~●~~●~~◆~~●~~●~~●

No comments:

Post a Comment