"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

*23/05/18 बुधवारचा परीपाठ*
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
*🌅 _महाराष्ट् शिक्षक पॅनल_* 🌅
 ━━═•●◆●★❂★●◆●•═━━
*Ⓜ💲🅿 _परीपाठ_ Ⓜ💲🅿*
====●●●★♦★●●●====

*❂ दिनांक:~ 23/05/2018 ❂*
       *🔘 वार ~ बुधवार 🔘*
*⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽⌘⌘⌘*
  *💥🇮🇳 राष्ट्रगीत  🇮🇳💥*
➖➖➖➖➖➖➖➖
    *💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
➖➖➖➖➖➖➖➖
  *💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐ MSP ⋑⋐⋑⛯⋐⋑*

  *💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
       🔘 *"माझी शाळा"* 🔘
   *ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
    🔗🔗👇👇🔗🔗

http://satishborkhade.blogspot.in/?m=1
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ]   ❂ आजचे पंचाग ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

     🍥 *23. मे :: बुधवार* 🍥
 ━━═•●◆❃★❂★❃◆●•═━━
          अधिक जेष्ठ शु. ९
       तिथी : शुक्ल पक्ष नवमी,
           नक्षत्र : पूर्वफाल्गुनी,
      योग : हर्शन, करण : बलव,
सूर्योदय : 06:02, सूर्यास्त : 19:08,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ]    ❂ सुविचार ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

23. कधीकधी अपमान सहन केल्याने कमीपणा येत नाही; उलट आपले सामर्थ्य वाढते.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ]    ❂ म्हणी व अर्थ ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

23. *काखेत कळसा गावाला वळसा*
      *★ अर्थ ::~* - जवळचीच वस्तू लक्षात न राहिल्याने इतरत्र शोधणे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ]    ❂ सुभाषीत ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

23. *विनयात् याति पात्रताम् ।*
  ⭐अर्थ ::~ नम्रतेमुळे पात्रता येते.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ]    ❂ दिनविशेष ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

       🛡 *★23. मे★* 🛡
🔻====●●●★●●●====🔻
★जागतिक कासव दिन
★हा या वर्षातील १४३ वा (लीप वर्षातील १४४ वा) दिवस आहे.

     ~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
   🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९९७ : माऊंट एव्हरेस्ट हे सर्वोच्‍च शिखर सर्वप्रथम सर करणार्‍या तेनसिंग नोर्गे यांचे नातू ताशी तेनसिंग यांनी माऊंट एव्हरेस्ट सर केले.
●१९८४ : बचेन्द्री पालने दुपारी १:०९ वाजता (भारतीय प्रमाण वेळ) माऊंट एव्हरेस्ट शिखर सर केले. हे शिखर सर करणारी ती पहिली भारतीय महिला आहे.
●१९५६ : आयुर्विमा व्यवसायाचे राष्ट्रीयीकरण करण्यासंबंधीचे विधेयक मंजूर झाले.
●१७३७ : पोर्तुगीजांकडुन जिंकल्यानंतर पेशव्यांनी अर्नाळा किल्ला परत बांधून घेतला.

   ~*★ जन्मदिवस / जयंती ★*~
   🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९५१ : अनातोली कार्पोव्ह – रशियन बुद्धीबळपटू
◆१९१९ : महाराणी गायत्रीदेवी – जयपूरच्या राजमाता
◆१९१८ : डेनिस कॉम्पटन – इंग्लिश क्रिकेटपटू
◆१८९६ : केशवराव भोळे – गायक, अभिनेते, संगीत समीक्षक, संगीत रचनाकार, संगीत दिग्दर्शक व लेखक.
◆१७०७ : कार्ल लिनिअस – स्वीडीश वनस्पतीतज्ञ, वनस्पतींच्या दुहेरी नामकरणाची आंतरराष्ट्रीय पद्धत त्याने विकसित केली. ही पद्धत त्याला इतकी आवडली की त्याने स्वत:चेही नाव बदलून कॅरोलस लिनिअस असे केले.

      ~*★ मृत्यू / पुण्यतिथी ★*~
  🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९३७ : जॉन डेव्हिसन रॉकफेलर – रॉकफेलर घराण्यातील पहिला उद्योगपती, स्टँडर्ड ऑईल उद्योगसमूह व अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील पहिल्या तेल उद्योगाचा संस्थापक
●१९०६ : हेन्‍रिक इब्सेन – नॉर्वेजियन नाटककार, दिग्दर्शक आणि कवी
●१८५७ : ऑगस्टिन कॉशी – फ्रेन्च गणितज्ञ
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
   💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व "मुख्य मराठी" बातम्या
 वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..

     https://goo.gl/8D33ox
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0६ ]    ❂ बोधकथा ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

23.  *❃❝ घोडा व गाढव ❞❃*
     ━━═•●◆●★◆★●◆●•═━━
   एका सरदाराचा घोडा जरतारी जीन पाठीवर घेऊन लगाम चावीत फुरफुरत वाटेने जात असता ओझ्याने खचून गेलेले एक गाढव त्याला दिसले.
       त्याला धमकी देऊन तो म्हणाला, 'अरे, सरक, सरक ! नाहीतर मी तुला आता पायाखाली तुडवून टाकेन.'
       गाढव बापडे दुर्बळ. तेव्हा ते घाईघाईने बाजूला सरकले. पुढे काही दिवसांनी त्या घोड्याला लढाईत गोळी लागली व सरदाराने त्याला एका भाडेकर्‍याला विकले. मग तो ओझी वाहू लागला.

      एकदा पाठीवर मोठे गाठोडे घेऊन तो रस्त्याने जात असता त्या गाढवाने पाहिले व त्याला हाक मारून ते म्हणाले, 'काय राव, रामराम ! त्या दिवशी मला पायाखाली तुडविणारे तुम्हीच नाही का ? मी तेव्हाच भविष्य केलं होतं की एखाद्या दिवशी तरी आपला गर्व उतरेल.'

      *🌀❝ तात्पर्य ❞ ::~*
   जो गर्वाने मोठेपणा मिळवू पाहतो, त्याच्याजवळ सामर्थ्य असेपर्यंत लोक त्याला नमून असतात. पण तो निर्बल झाला म्हणजे त्याचा उपहासच केला जातो.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ] ❂ प्रेरणादायी विचार ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

23. *सुखाची अपेक्षा असेल......*
*तर दुःख ही भोगावे लागेल.....*

*प्रश्न विचारावयाचे असतील.....*
*तर उत्तर हि द्यावे लागेल.....*

*हिशोब भावनांचा अन वेदनांचा कधीच*
*लावता येत नाही जगात.....*

*जीवनात यश हवे असेल....*
*तर संकटांना सामोरे जावेच  लागेल.....*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ]   ❂ सामान्य ज्ञान ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

23. *✿ सामान्य ज्ञान प्रश्नावली ✿*
       ◑◑◑◆◑◑●★●◑◑◆◑◑◑
■ क्षेत्रफळाने मोठा जिल्हा?
👉 कच्छ

■ लोकसंख्येने मोठा जिल्हा?
👉 ठाणे

■ सर्वाधिक पावसाचे ठिकाण?
👉 मावसनिराम

■ सर्वांत मोठे वाळवंट कोणते?
👉 सहारा ( आफ्रिका )

■ सर्वांत मोठे बेट कोणते?
👉 ग्रीनॅलंड
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ] ❂थोरव्यक्ती परिचय ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

23. *❒ ♦श्रीपाद अमृत डांगे♦ ❒* 
     ━━═•●◆●★◆★●◆●•═━━
◆टोपणनाव :~ कॉम्रेड डांगे
●जन्म :~ १०ऑक्टोबर १८९९, नाशिक
●मृत्यू :~ २२ मे १९९१
◆संघटना :~ कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया
◆प्रभाव :~ बाळ गंगाधर टिळक

            ★ श्रीपाद अमृत डांगे ★
     ह्यांनी भारतीय कम्युनिस्ट पक्षाची १९२५ साली स्थापना केली. ते तत्कालीन मुंबई प्रांतातील दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून इ.स. १९५७ आणि इ.स. १९६७ च्या निवडणुकांमध्ये निवडून गेले.

    कॉम्रेड डांगे यांना भारतातील कम्युनिस्ट चळवळीतील भीष्माचार्य असे म्हणतात.

    डॉ. अशोक चौसाळकर यांनी लिहिलेले कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांचे चरित्र डांगे यांच्या जीवनकार्यांचा नेमका वेध घेते. या पुस्तकतील परिशिष्टे अभ्यासकांसाठी महत्वाची आहेत.
   बानी देशपांडे हे कमुनिस्ट पक्षाचे टोलेजंग व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जाणार्‍या कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांचे जावई- त्यांच्या रोझा नावाच्या मुलीचे पती होते. कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे व त्यांच्यात गुरू-शिष्याचे नाते होते.

    कम्युनिस्ट असले तरी त्यांना इतर मार्क्सवाद्यांप्रमाणे हिंदुस्थानी परंपरागत तत्त्वज्ञान, वेदवाङ्मय याविषयी इतर मार्क्सवाद्यांप्रमाणे घृणा नव्हती. त्यांचा संस्कृतचा आणि वेदान्ताचा गाढा अभ्यास होता. दोन वर्षांच्या अथक अभ्यासाअंती त्यांनी ‘युनिव्हर्स ऑफ वेदान्त’ हे पुस्तक लिहिले.

    कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांनी स्वतः या पुस्तकाला प्रस्तावना लिहिली आहे. डायलेक्टिक्स वेदान्तात आहे, असे बानींनी पुस्तकात म्हटले आहे. या पुस्तकाला कॉ. डांगे यांनी प्रस्तावना दिल्यामुळे डांगे यांच्यावर कम्युनिस्टांनी त्यावेळी सडकून टीका केली होती. मात्र तरीही डांगे आपल्या भूमिकेवर ठाम राहिले.

     पक्षाध्यक्षपदी कॉ. डांगे या प्रकरणात डांगे यांच्या लोकसभेतील संस्मरणीय कामगिरी आपल्यासमोर येते. डांगे यांच्यासमोर कोणती आव्हाने होती हे देखील लक्षात येते. नव्या पिढीला डांगे याचे कर्तुत्व समजून घेण्यासाठी हे चरित्र महत्वाचे ठरावे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹🔅✹★✹◑◎●••
            *✍संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
   ♦📱 7875840444 ♦
 *✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❃❂❃█║▌║█║▌

*◆ बुधवार ~ 23/05/2018 ◆*
*⋐⋑⛯⋐⋑⋐ MSP ⋑⋐⋑⛯⋐⋑*

No comments:

Post a Comment