"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

🛡 *23. एप्रिल* 🛡

         🛡 *23. एप्रिल* 🛡
🔻====●●●★●●●====🔻
★ जागतिक पुस्तक दिन
★ हा या वर्षातील ११३ वा (लीप वर्षातील ११४ वा) दिवस आहे.

    ~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
  🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९९० : नामिबिया संयुक्त राष्ट्रांत प्रवेश होऊन तो १६० वा सदस्य देश बनला.
●१८१८ : दोनशे युरोपियन व दोनशे एतद्देशीय शिपायांसह इंग्रज अधिकारी मेजर हॉल यास कर्नल प्रॉयर याने रायगड किल्ल्याची टेहळणी करण्यास पाठविले.

    ~*★ जन्मदिवस / जयंती ★*~
  🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१८९७ : लेस्टर बी. पिअर्सन – कॅनडाचे १४ वे पंतप्रधान आणि नोबेल पारितोषिक विजेते
◆१८७३ : महर्षि विठ्ठल रामजी शिंदे – अस्पृश्यता निवारण हे जीवनध्येय मानलेले व्यासंगी समाजसुधारक (मृत्यू: २ जानेवारी १९४४)
◆१८५८ : पंडिता रमाबाई – विधवा, परिक्त्यक्ता आणि स्त्रियांच्या सर्वांगीण उद्धारासाठी कार्य करणाऱ्या समाजसुधारक आणि ’आर्य महिला समाज’ च्या संस्थापिका, संस्कृत पंडित (मृत्यू: ५ एप्रिल १९२२)
◆१८५८ : मॅक्स प्लँक – नोबेल पारितोषिक विजेते जर्मन भौतिक शास्त्रज्ञ (मृत्यू: ४ आक्टोबर १९४७)
◆१५६४ : विल्यम शेक्सपिअर – इंग्लिश नाटककार आणि अभिनेता. युनेस्कोने घेतलेल्या पुढाकारामुळे विल्यम शेक्सपिअर यांच्या सन्मानार्थ ◆१९९५ पासून आजचा दिवस हा ’जागतिक पुस्तक दिन’ म्हणून साजरा केला जातो. (मृत्यू: २३ एप्रिल १६१६)

     ~*★ मृत्यू / पुण्यतिथी ★*~
   🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००७ : बोरिस येलत्सिन – रशियन फेडरेशनचे पहिले अध्यक्ष
●२००१ : जयंत श्रीधर तथा जयंतराव टिळक – संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे एक नेते, गोवा मुक्ती संग्रामातील एक झुंजार सेनापती, लोकमान्य टिळकांचे नातू, महाराष्ट्र विधान परिषदेचे अध्यक्ष  व केसरीचे संपादक
●२००० : मराठी चित्रपटांना आधार मिळावा या ध्येयाने प्रेरित होऊन गेली ४० वर्षे लालबागमधील ’भारतमाता’ चित्रपटगृह चालवणारे यशवंत सदाशिव ऊर्फ बाबासाहेब भोपटकर यांचे निधन
●१९९२ : सत्यजित रे – ख्यातनाम चित्रपट निर्माते व दिग्दर्शक आणि भारतरत्‍न. ’पथेर पांचाली’ या त्यांच्या पहिल्याच चित्रपटाला देशविदेशात अनेक गौरव मिळाले. त्यांना विशेष ऑस्कर पुरस्कारही देण्यात आला होता. (जन्म: २ मे १९२१)
●१९२६ : हेन्‍री बी. गुप्पी – ब्रिटिश वनस्पतीशास्त्रज्ञ
●१९५८ : शंकर श्रीकृष्ण देव – निष्ठावान समर्थभक्त, समर्थ वाङ्‌मयाचे आणि संप्रदायाचे अभ्यासक व प्रकाशक
●१८५० : विल्यम वर्डस्वर्थ – काव्यातील स्वच्छंदतावादाचे प्रणेते इंग्लिश कवी. त्यांची ’डॅफोडिल्स’ ही अतिशय गाजलेली कविता आहे.
●१६१६ : विल्यम शेक्सपिअर – इंग्लिश नाटककार आणि अभिनेता. युनेस्कोने घेतलेल्या पुढाकारामुळे विल्यम शेक्सपिअर यांच्या सन्मानार्थ ●१९९५ पासून आजचा दिवस हा ’जागतिक पुस्तक दिन’ म्हणून साजरा केला जातो. (जन्म: २३ एप्रिल १५६४)

No comments:

Post a Comment