"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

🛡 ★23.फेब्रुवारी★ 🛡

🔻====●●●★●●●====🔻
★हा या वर्षातील ५४ वा दिवस आहे.

                    ~*🔺महत्त्वाच्या घटना 🔺*~
                 🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००० : संस्कृत पंडित रा. ना. दांडेकर आणि काश्मिरी कवी रेहमान राही यांना साहित्य अकादमीची फेलोशिप जाहीर
●१९९७ : रशियाच्या ’मीर’ या अंतराळस्थानकामधे आग लागली.
●१९९६ : कोकण रेल्वेच्या चिपळूण - खेड टप्प्यातील वाहतूकीचा शुभारंभ
●१९६६ : सीरियात लष्करी उठाव झाला.
●१९५२ : संसदेने कामगार भविष्य निर्वाह निधी विधेयक मंजूर केले.
●१९४७ : आंतरराष्ट्रीय मानक संस्थेची (ISO) स्थापना
●१४५५ : पाश्चिमात्य देशातील पहिले छापील पुस्तक ’गटेनबर्ग बायबल’ प्रकाशित झाले.

                      ~*★जन्मदिवस / जयंती★*~
                🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९६५ : हेलेना सुकोव्हा – झेकोस्लोव्हाकियाची टेनिस खेळाडू
◆१९६५ : अशोक कामटे – मुंबईच्या आतंकवादी हल्ल्यात शहीद झालेले पोलिस कमिशनर
(मृत्यू: २६ नोव्हेंबर २००८)
◆१९१३ : प्रफुल्लचंद्र तथा पी. सी. सरकार – जादूगार
◆१८७६ : देबुजी झिंगराजी जानोरकर ऊर्फ ’संत गाडगे महाराज’ – कमालीचे अज्ञान, अनिष्ट चालीरीती व अंधश्रद्धा पाहून त्यांनी निरपेक्ष सेवेचे व्रत घेतले आणि त्यासाठी कीर्तनाचे माध्यम प्रभावीपणे वापरले.
 (मृत्यू: २० डिसेंबर १९५६)

                          ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
                  🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००४ : विजय आनंद – हिन्दी चित्रपट निर्माते व दिग्दर्शक
●२००० : वासुदेवशास्त्री धुंडिराज तांबे – वेदशास्त्राचे गाढे अभ्यासक
●१९६९ : मुमताज जहाँ बेगम देहलवी ऊर्फ मधुबाला – चित्रपट अभिनेत्री (जन्म: १४ फेब्रुवारी १९३३ - दिल्ली)
●१९४४ : लिओ हेन्ड्रिक आर्थर बेकेलँड – अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ, १९०९ मधे त्यांनी लाखेवर अनेक प्रयोग करुन ’बॅकेलाईट’ नावाचा पदार्थ तयार केला. ही प्लॅस्टिक युगाची सुरुवात मानली जाते.
●१९०४ : महेन्द्र लाल सरकार – होमिओपाथीच्या प्रसारक, समाजसुधारक व विज्ञानप्रसारक,
१७७७ : कार्ल फ्रेड्रिक गाऊस – जर्मन गणितज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ, आर्किमिडीज व न्यूटन यांच्या तोडीचे गणितज्ञ

No comments:

Post a Comment