"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

🛡 * 24. जुलै * 🛡

 🔻====●●●★●●●====🔻
★हा या वर्षातील २०५ वा (लीप वर्षातील २०६ वा) दिवस आहे.

       ~*🔺महत्त्वाच्या घटना 🔺*~
      🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२०२२: वर्ल्ड अथलेटिक्स चॅम्पियनशिप भालाफेक मध्ये नीरज चोप्रा यांनी 88.13मीटर भाला फेकून सिल्वर मेडल जिंकले.
●२००१ : जपानमधील टोकियो येथे झालेल्या जागतिक जलतरण स्पर्धेत भारताच्या शिखा टंडनने फ्रीस्टाईल प्रकारात १०० मीटर अंतर ५९.९६ सेकंदात पार केले. ही शर्यत एक मिनिटापेक्षा कमी वेळात पूर्ण करणारी ती भारताची सर्वात लहान खेळाडू आहे.
●१९९७ : माजी हंगामी पंतप्रधान गुलझारीलाल नंदा आणि स्वातंत्र्यसैनिक अरुणा असफ अली यांना स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात सर्वोच्‍च नागरी सन्मान भारतरत्‍न प्रदान
●१९९७ : ख्यातनाम बंगाली लेखिका महाश्वेतादेवी यांना पत्रकारिता, साहित्य व कला या क्षेत्रातील कामगिरीसाठी ’रॅमन मॅगसेसे पुरस्कार’ जाहीर
●१९९१ : अर्थमंत्री मनमोहन सिंग यांनी आर्थिक सुधारणांचा पाया घालणारा? अर्थसंकल्प संसदेत सादर केला.
●१९७४ : वॉटरगेट प्रकरण – अमेरिकेच्या सर्वोच्‍च न्यायालयाने निकाल दिला की राष्ट्राध्यक्ष रिर्चड निक्सनने स्वत:विरुद्धचा पुरावा अवैधरीत्या दडवून ठेवला होता.
●१९६९ : सफल मानवी चांद्रमोहिमेनंतर अपोलो ११ हे अंतराळयान पॅसिफिक समुद्रात सुखरूप उतरले.
●१९४३ : दुसरे महायुद्ध – ऑपरेशन गोमोरा - दोस्त राष्ट्रांनी जर्मनीतील हॅम्बर्ग शहरावर तुफानी बॉम्बहल्ले सुरू केले. हे हल्ले पुढील आठ दिवस सुरू होते. या हल्ल्यांना हॅम्बर्गचे हिरोशिमा असे म्हणण्यात येते.

       ~*★जन्मदिवस / जयंती★*~
     🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९६९ : जेनिफर लोपेझ – अमेरिकन अभिनेत्री, गायिका आणि नर्तिका
◆१९४५ : अझीम प्रेमजी – दानशूर व्यक्ति आणि ’विप्रो’ (WIPRO) चे चेअरमन
◆१९२८ : केशुभाई पटेल – गुजरातचे मुख्यमंत्री आणि राज्यसभा सदस्य
◆१९११ : अमल ज्योती तथा ’पन्‍नालाल’ घोष – बासरीवादक व संगीतकार
◆१९११ : गोविंदभाई श्रॉफ – हैदराबाद मुक्तिसंग्रामातील झुंजार स्वातंत्र्य सेनानी

         ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
     🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९८० : अरुण कुमार चटर्जी तथा ’उत्तम कुमार’ – बंगाली व हिन्दी चित्रपट अभिनेते
●१९८० : पीटर सेलर्स – इंग्लिश विनोदी अभिनेता आणि गायक
●१९७४ : सर जेम्स चॅडविक – अणूमधील न्यूट्रॉनच्या शोधाबद्दल
●१९३५ मधे नोबेल पारितोषिक मिळालेले ब्रिटिश पदार्थवैज्ञानिक

No comments:

Post a Comment