"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

🛡 *24. एप्रिल* 🛡

        🛡 *24. एप्रिल* 🛡
🔻====●●●★●●●====🔻
★ जलसंपत्ती दिन
★ हा या वर्षातील ११४ वा (लीप वर्षातील ११५ वा) दिवस आहे.
★ जागतिक श्वान दिन

    ~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
 🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९९३ : इंडियन एअरलाइन्सच्या फ्लाईट ४२७ या दिल्लीहून श्रीनगरला जाणार्‍या विमानाचे ३ अतिरेक्यांनी अपहरण केले. ब्लॅक कॅट कमांडोजनी केलेल्या कारवाईत तिन्ही अतिरेकी ठार झाले व सर्व १४१ प्रवाशांची सुखरुप मुक्तता झाली.
●१९९० : डिस्कव्हरी या अंतराळयानातुन हबल ही दुर्बिण सोडण्यात आली.
●१९६७ : वेळेवर पॅराशूट न उघडल्यामुळे व्लादिमिर कोमारोव्ह हा मरण पावणारा पहिला अंतराळवीर ठरला.
●१८०० : अमेरिकेतील महाप्रचंड अशा लायब्ररी ऑफ काँग्रेसची (Library of Congress) स्थापना झाली. हे जगातील सर्वोत्तम ग्रंथालय आहे.
●१६७४ : भोर-वाई प्रांतातील केंजळगड शिवाजी महाराजांनी स्वारी करुन जिंकला.

    ~*★ जन्मदिवस / जयंती ★*~
  🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९७३ : सचिन तेंडुलकर – महान क्रिकेटपटू, भारतर‍त्‍न
◆१९७० : डॅमियन फ्लेमिंग – ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू
◆१९४२ : बार्बारा स्ट्रायसँड – अमेरिकन अभिनेत्री, गायिका, चित्रपट निर्माती व दिग्दर्शिका
◆१९२९ : राजकुमार – कन्नड चित्रपट अभिनेता व गायक
◆१९१० : राजा परांजपे – चित्रपट दिग्दर्शक, निर्माते आणि अभिनेते
◆१८९६ : रघुनाथ वामन दिघे – रसाळ लेखन करणारे कादंबरीकार. ’ त्यांच्या कादंबर्‍या अतिशय गाजल्या.

    ~*★ मृत्यू / पुण्यतिथी ★*~
 🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२०११ : सत्यनारायण राजू ऊर्फ ’सत्य साईबाबा’ – आध्यात्मिक गुरू
(जन्म: २३ नोव्हेंबर १९२६)
●१९९४ : शंतनुराव किर्लोस्कर – पद्मभुषण पुरस्कार विजेते उद्योगपती, किर्लोस्कर उद्योगसमूहाचे आधारस्तंभ
●१९७४ : रामधारी सिंह ’दिनकर’ – देशभक्त व हिन्दी साहित्यिक
●१९६० : लक्ष्मण बळवंत तथा अण्णासाहेब भोपटकर – नामवंत वकील, महाराष्ट्र मंडळाचे एक संस्थापक, केसरीचे संपादक आणि हिंदू महासभेचे नेते
●१९४२ : मास्टर दीनानाथ मंगेशकर – शास्त्रीय व नाट्यसंगीत गायक व अभिनेते (जन्म: २९ डिसेंबर १९००)

No comments:

Post a Comment