*25/05/18 शुक्रवारचा परीपाठ*
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
*🌅 _महाराष्ट् शिक्षक पॅनल_* 🌅
━━═•●◆●★❂★●◆●•═━━
*Ⓜ💲🅿 _परीपाठ_ Ⓜ💲🅿*
====●●●★♦★●●●====
*❂ दिनांक:~ 25/05/2018 ❂*
*🔘 वार ~ शुक्रवार 🔘*
*⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽⌘⌘⌘*
*💥🇮🇳 राष्ट्रगीत 🇮🇳💥*
➖➖➖➖➖➖➖➖
*💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
➖➖➖➖➖➖➖➖
*💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐ MSP ⋑⋐⋑⛯⋐⋑*
*💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
🔘 *"माझी शाळा"* 🔘
*ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
🔗🔗👇👇🔗🔗
http://satishborkhade.blogspot.in/?m=1
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ] ❂ आजचे पंचाग ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━
🍥 *25. मे :: शुक्रवार* 🍥
━━═•●◆❃★❂★❃◆●•═━━
अधिक जेष्ठ शु. ११
तिथी : शुक्ल पक्ष एकादशी,
नक्षत्र : हस्त,
योग : सिद्धि, करण : वणीज,
सूर्योदय : 06:01, सूर्यास्त : 19:09,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ] ❂ सुविचार ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━
25. दोष लपवला की तो मोठा होतो आणि कबूल केला की नाहीसा होतो.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ] ❂ म्हणी व अर्थ ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━
25. *नाकापेक्षा मोती जड*
*★अर्थ ::~*
गौण वस्तूला मुख्य वस्तूपेक्षा जास्त महत्त्व देणे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ] ❂ सुभाषीत ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━
25. *विद्या गुरूणां गुरु: ।*
⭐अर्थ ::~
विद्या गुरुजनांनाही पूज्य आहे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ] ❂ दिनविशेष ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━
🛡 *★25. मे ★* 🛡
🔻====●●●★●●●====🔻
★हा या वर्षातील १४५ वा (लीप वर्षातील १४६ वा) दिवस आहे.
~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९९९ : सुमारे १०० वर्षांपासून पंढरपूरला येणार्या लाखो वारकर्यांची आणि नागरिकांची सेवा केलेल्या पंढरपूर-कुर्डुवाडी या नॅरोगेज रेल्वेला निरोप देण्यात आला.
●१९९२ : विख्यात बंगाली साहित्यिक सुभाष मुखोपाध्याय यांना १९९१ चा ‘ज्ञानपीठ पुरस्कार’ जाहीर
●१९७७ : चिनी सरकारने विल्यम शेक्सपिअरच्या साहित्यावरील बंदी उठवली. सुमारे १० वर्षे ही बंदी अमलात होती.
●१९५५ : कांचनगंगा हे जगातील तिसरे सर्वोच्च शिखर प्रथमच जो ब्राऊन आणि जॉर्ज बॅन्ड या ब्रिटिश गिर्यारोहकांनी सर केले.
●१६६६ : शिवाजी महाराज आग्रा येथे नजरकैदेत.
~*★ जन्मदिवस / जयंती ★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१८९९ : काझी नझरुल इस्लाम – स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारक व हिंदु मुस्लिम ऐक्याचे समर्थक असलेले बंगाली कवी.
◆१८९५ : त्र्यंबक शंकर शेजवलकर – इतिहासकार व लेखक
◆१८८६ : रास बिहारी घोष – क्रांतिकारक
◆१८३१ : सर जॉन इलियट – भारतातील हवामानशास्त्रविषयक कार्यामुळे प्रसिद्धी पावलेले ब्रिटिश हवामान शास्त्रज्ञ. १८८७ ते १८९३ या कालावधीत ते भारत सरकारच्या हवामान खात्याचे प्रमुख होते.
~*★ मृत्यू / पुण्यतिथी ★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००५ : सुनील दत्त – अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक व केंद्रीय मंत्री
●१९९९ : बाळ दत्तात्रय तथा बी. डी. टिळक – संशोधक, राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे (NCL) संचालक, राष्ट्रीय विज्ञान व तंत्रज्ञान समितीचे अध्यक्ष, शांतिस्वरुप भटनागर पारितोषिक विजेते, पी. सी. रे पारितोषिक विजेते
●१९९८ : लक्ष्मीकांत शांताराम कुडाळकर – चित्रपटसृष्टीत चार दशके लोकप्रिय संगीत देणार्या ’लक्ष्मीकांत-प्यारेलाल’ या जोडीतील संगीतकार
●१९५४ : गजानन यशवंत ताम्हणे तथा माणिकराव – आधुनिक भारतीय व्यायामविद्येचे प्रवर्तक, ‘कन्या आरोग्य मंदिरा’चे संस्थापक,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व "मुख्य मराठी" बातम्या
वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..
https://goo.gl/8D33ox
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0६ ] ❂ बोधकथा ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━
25. *❃❝ विश्वास...!! ❞❃*
━━═•●◆●★◆★●◆●•═━━
एका बहुचर्चित वक्त्याने हातात ५०० रुपयांची नोट हलवत आपल्या कार्यक्रमाची सुरुवात केली. सभागृहात बसलेल्या शेकडो लोकांना त्यानं विचारलं की,
“ही ५०० रुपयांची नोट कोणाला हवी आहे?”
सर्वांनी हात वर केला. त्यानंतर तो म्हणाला, “मी ही नोट तुमच्यापैकी कोणातरी एकालाच देईन.
पण त्यापूर्वी मला हे करू द्या.” आणि त्याने त्या नोटेला आपल्या मुठीत चुरगळण्यास सुरुवात केली आणि मग त्यानं विचारलं,
“कोण आहे ज्याला अजूनही ही नोट हवी आहे?” अजूनही लोकांचे हात वर येत होते. “बरं!” तो म्हणाला,
“जर मी ही नोट पायाने चुरगळली तर किती जण ही नोट घेतील?” यावेळी मात्र त्या नोटेची अवस्था बिकट झाली होती. ती खूपच मळकटली आणि चुरगळली होती, तरीही अनेक लोकांनी हात वर केला.
मित्रांनो...
आज तुम्ही अत्यंत महत्त्वाचा धडा घेतला आहे. मी या नोटेबरोबर इतका वाईट व्यवहार केला, तरीही तुम्ही या नोटेला घेऊ इच्छिता. कारण हे
सगळं होऊनदेखील या नोटेची किंमत कमी झालेली नाही. तिची किंमंत अजूनही पाचशे रुपयेच आहे.
आयुष्यात कित्येक वेळा आपण पडतो, आपल्यासाठी आपण घेतलेले निर्णय आपल्याला जमिनीवर
पाडतात. आपल्याला असं वाटू लागतं की, आपली काहीच किंमत नाही.
पण भलेही तुमच्याबरोबर
काहीही झालं असेल किंवा भविष्यात होणार असेल तरी देखील तुमची किंमत कमी होत नाही.
तुमच जीवन कितीही चुरगळलेल असू दे पण जीवनाची घडी नीट घाला.
तुम्ही विशेष आहात हे कधीच विसरू नका. आपल्या भूतकाळात घडलेल्या वाईट गोष्टींमुळे आपल्या भविष्यात होणाऱ्या चांगल्या गोष्टींवर परिणाम
होऊ देऊ नका.
स्वत: घेतलेल्या निर्णयाशी स्वत:चीच हार होऊ देवू नका, पुर्ण मेहनत करत चला, वेळ लागेल, तुम्ही नक्कीच
जिकंणार...!!
*🌀❝ तात्पर्य ❞ ::~*
जग तुम्हाला जिकंताना बघायला तयार आहे. फक्त संयम ठेवा, लक्षात ठेवा,
तुमच्याकडे सर्वांत मौल्यवान जर कोणती गोष्ट असेल तर ती म्हणजे...
"तुम्ही स्वतः" आणि तुमचा
तुमच्यावरच असलेला विश्वास..
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ] ❂ प्रेरणादायी विचार ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━
25. प्रत्येकाच्या वयाप्रमाणे आदर
केलाच पाहिजे , मान दिला पाहिजे, बोलताना शब्दांचा जपून वापर केलापाहिजे. शब्द दुवा आहे, शब्द दवा आहे, शब्द दावा आहे, शब्द माणुसकीचा ठेवा आहे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ] ❂ सामान्य ज्ञान ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━
25. *✿ सामान्य ज्ञान प्रश्नावली ✿*
◑◑◑◆◑◑●★●◑◑◆◑◑◑
■ सर्वांत मोठी घुमट कोणती?
👉 गोल घुमट
■ सर्वांत मोठे वाळवंट कोणते?
👉 थरचे वाळवंट
■ सर्वांत उंच पुतळा कोणता?
👉 गोमटेश्वर ( बाहुबली )
■ सर्वांत मोठे धरण कोणते?
👉 भाक्रा नांगल
■सर्वांत उंच धरण कोणते?
👉 टिहरी
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ] ❂थोरव्यक्ती परिचय ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━
25. *❒ ♦मा.लक्ष्मीकांत♦ ❒*
━━═•●◆●★◆★●◆●•═━━
चित्रपटसृष्टीत चार दशके लोकप्रिय संगीत देण्याऱ्या ’लक्ष्मीकांत-प्यारेलाल’ या जोडीतील
मा. लक्ष्मीकांत
●जन्म :~ ३ नोव्हेंबर १९३७
●मृत्यू :~ २५ मे १९९८
लक्ष्मीकांत शांताराम कुडाळकर हे त्यांचे पूर्ण नाव. ते मॅन्डोलिन वादनात ख्यातनाम. चित्रपट मिळविणे ही त्यांची जबाबदारी. प्यारेलाल रामप्रसाद शर्मा ट्रम्पपेंटर म्हणून ख्यातनाम. आपल्या वडिलांकडून त्यांच्याकडे संगीत वारसा आला. बांधणीत चाल व वाद्यवृंद यांचा मेळ घालणे गरजेचे असते, दोघेही दोन्हींत मातब्बर. बऱ्याचदा लक्ष्मीकांतजींना ‘चाल’ लावण्यास विशेष आनंद वाटे, सोपी चाल हे त्यांचे वैशिष्टय़. ‘सरगम’चे परबत के उस पार, ‘खलनायक’चे चोली के पीछे क्या है, ‘हम पाँच’चे आती है पालखी सरकार की, ‘एक दूजे के लिए’चे हम बने तुम बने, ‘हम’चे जुम्मा चुम्मा दे दे ही उदाहरणे पुरेशी आहेत. लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांनी ‘चित्रपट संगीता’ला सुरुवात केली तेव्हा शंकर जयकिशन, नौशाद, मदन मोहन, रोशन, ओ. पी. नय्यर, सचिन देव बर्मन, सलिल चौधरी, रवी, कल्याणजी-आनंदजी यांचा विलक्षण दबदबा होता. साधा शिरकाव करणे अवघड होते, पण यांनी तर आपली जागा निर्माण केली. पहिल्याच ‘पारसमणी’ चित्रपटात हसता हुआ यह नुरानी चेहरा, वो जब याद आये अशी हिट गाणी देत त्यांनी लक्ष वेधले. अशा फॅण्टसी चित्रपटाला तेव्हा प्रतिष्ठा नव्हती. त्यामुळे संगीतकाराला नाव ते काय मिळणार? हरिश्चंद्र तारामती, संत ज्ञानेश्वर अशा चित्रपटांना संगीत देऊन फार काही साध्य होणारे नव्हते. ‘संत ज्ञानेश्वर’मधील ‘ज्योत से ज्योत जलाते चलो’ हे गाणे गाजले. १९६४ साली ‘फिल्म फेअर’च्या स्पर्धेत ‘संगम’च्या शंकर-जयकिशनवर मात करून ‘दोस्ती’साठी लक्ष्मीकांत-प्यारेलालनी बाजी मारली आणि चित्रपटसृष्टी, चित्रपट रसिक व प्रसारमाध्यमे या तिन्ही घटकांचे या जोडीकडे लक्ष गेले व ते बराच काळ राहिले. ‘दोस्ती’तील ‘मेरा ज्यो भी कदम है’, ‘राही मनवा दुख की चिंता’, ‘तेरी दोस्ती मेरा प्यार’ अशी सगळीच गाणी हिट ठरली. सिनेमाच्या जगात यशासारखे सुख नाही, पारितोषिकासारखे टॉनिक नाही व वाढत्या मागणीसारखा आनंद नाही. लक्ष्मी-प्यारे यांचा चौफेर संचार सुरू झाला, त्याचे साम्राज्यात कधी रूपांतर झाले हेदेखील समजले नाही. प्यार बाटते चलो, अजनबी तुम जाने पहचाने यह दर्द, भरा अफसाना कैसे रहू चूप की मैने दिल खिल प्यार ब्यार असे करीत करीत मिलन, दो रास्ते, मेरे नसीब अशा चित्रपटांच्या वेळी त्यांनी खूपच मोठी मजल मारली. त्या काळातील त्यांच्या चित्रपटात आये दिन बहार के, कर्ज, पत्थर के सनम, तकदीर, इज्जत, मेरे हमदम, मेरे दोस्त, राजा और रंक, अंजाना, आया सावन झुमके खूप महत्त्वाचे. भारतीय संगीत व विदेशी संगीत यांची युती करताना त्यांनी बऱ्याचदा लोकसंगीतावर भर दिला, तर अनेकदा चित्रपटाचे स्वरूप अर्थात मागणी पाहून ‘चाली’ बांधल्या. राज कपूर, मनोजकुमार, राज खोसला, मोहनकुमार, चेतन आनंद, विजय आनंद, मोहन सैगल, मनमोहन देसाई, राजकुमार कोहली, जे. ओम प्रकाश, सुभाष घई, के. बालचंदर, बी. आर. चोप्रा, रवी टंडन, दुलाल गुहा, रामानंद सागर, प्रमोद चक्रवर्ती, शक्ती सामंता अशा कितीतरी आघाडीच्या दिग्दर्शकांच्या चित्रपटांना त्यांनी संगीत देत आपले आसन बळकट केले, सुभाष घईच्या ‘वैभवा’त लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांचा वाटा खूप मोठा आहे. लाला पाठारी आणि अब्दूल करीम (इडस्ट्रीमधे "येडा करीम" म्हणून ओळखला जाणाऱ्या) हे दोघे ढोलकपटू म्हणजे एल.पीं.च्या संगीताचा ट्रेडमार्क. पं. हरीप्रसाद चौरसीया यांची आणि लक्ष्मीकांत यांची दोस्ती देखील अशीच स्ट्रगलींग च्या काळातली आणि अखेर पर्यंत टिकलेली होती. या जोडीने बॉलीवुड मध्ये ३५ यशस्वी वर्ष काम केले, ६३५ चित्रपटातील ३५०० च्या वर गाण्यांना संगीत दिले. व तब्बल सात फिल्मफेअर अवॉर्ड मिळवली. संगीतकार मा. *मा.लक्ष्मीकांत* यांचे २५ मे १९९८ रोजी निधन झाले.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹🔅✹★✹◑◎●••
*✍संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
♦📱 7875840444 ♦
*✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❃❂❃█║▌║█║▌
*◆ शुक्रवार ~ 25/05/2018 ◆*

No comments:
Post a Comment