"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

🛡 ★ 25. ऑक्टोबर ★ 🛡

🔻====●●●★●●●====🔻
★हा या वर्षातील २९८ वा (लीप वर्षातील २९९ वा) दिवस आहे.

                   ~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
                 🔹•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔹
●१९९९ : दक्षिण अफ्रिकेतील लेखक जे. एम. कोएत्झी यांना साहित्य क्षेत्रातील प्रतिष्ठेचे मानले जाणारे ’बूकर पारितोषिक’ दुसर्‍यांदा मिळाले.
●१९९४ : ए. एम. अहमदी यांनी भारताचे २६ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
●१९५१ : स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्याच निवडणूकांना सुरुवात झाली. हिमाचल प्रदेशातील चिन्नी येथे पहिले मतदान झाले. २१ फेब्रुवारी १९५२ रोजी या निवडणूकांचा शेवटचा टप्पा पार पडला. या निवडणुकीत ४५.७% मतदान झाले.

                  ~*★ जन्मदिवस / जयंती ★*~
                🔸•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔸
◆१९४५ : अपर्णा सेन – अभिनेत्री, चित्रपट निर्माती आणि पटकथालेखिका
◆१९३७ : डॉ. अशोक रानडे – संगीत समीक्षक
◆१८८१ : पाब्लो पिकासो – स्पॅनिश चित्रकार आणि शिल्पकार

                    ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
                 🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२०१२ : जसपाल भट्टी – विनोदी अभिनेते
●२००३ : पांडुरंगशास्त्री आठवले – कृतीशील विचारवंत आणि तत्त्वज्ञ.  अवघ्या वीस सहकार्‍यांना बरोबर घेऊन त्यांनी ’स्वाध्याय परिवार’ सुरू केला. त्यांचा जन्मदिन स्वाध्याय परिवारातर्फे ’मनुष्य गौरव दिन’ म्हणून साजरा केला जातो. (जन्म: १९ आक्टोबर १९२०)
●१९८० : अब्दूल हयी ऊर्फ ’साहिर लुधियानवी’ – शायर व गीतकार
●१९५५ : पं. दत्तात्रय विष्णू ऊर्फ बापूराव पलुसकर – शास्त्रीय गायक, ’पायोजी मैने रामरतन धन पायो’, ’ठुमक चलत रामचंद्र’, ’चलो मन गंगा जमुनातीर’ ही त्यांनी गायलेली काही अत्यंत लोकप्रिय गाणी आहेत.
●१६४७ : इव्हानजेलिस्टा टॉरिसेली – इटालियन गणिती व पदार्थ वैज्ञानिक, हवादाबमापीचा (barometer) संशोधक 

No comments:

Post a Comment