"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

*26/05/18 शनिवारचा परीपाठ*
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
*🌅 _महाराष्ट् शिक्षक पॅनल_* 🌅
 ━━═•●◆●★❂★●◆●•═━━
*Ⓜ💲🅿 _परीपाठ_ Ⓜ💲🅿*
====●●●★♦★●●●====

*❂ दिनांक:~ 26/05/2018 ❂*
      *🔘 वार ~ शनिवार 🔘*
*⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽⌘⌘⌘*
  *💥🇮🇳 राष्ट्रगीत  🇮🇳💥*
➖➖➖➖➖➖➖➖
    *💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
➖➖➖➖➖➖➖➖
  *💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐ MSP ⋑⋐⋑⛯⋐⋑*

  *💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
       🔘 *"माझी शाळा"* 🔘
   *ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
    🔗🔗👇👇🔗🔗

http://satishborkhade.blogspot.in/?m=1
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ]   ❂ आजचे पंचाग ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

     🍥 *26. मे :: शनिवार* 🍥
 ━━═•●◆❃★❂★❃◆●•═━━
          अधिक जेष्ठ शु. १२
     तिथी : शुकल पक्ष द्वादशी,
               नक्षत्र : चित्रा,
    योग : व्यतिपात, करण : बव,
सूर्योदय : 06:01, सूर्यास्त : 19:10,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ]    ❂ सुविचार ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

26. कधी कधी हक्क मागून मिळत नाहीत; ते मिळवावे लागतात.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ]    ❂ म्हणी व अर्थ ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

26.  *दुधाने तोंड पोळले म्हणजे ताक फुंकुन पितात*   *★अर्थ ::~* 
    एकदा वाईट अनुभव आला म्हणजे पुन्हा विचार करून वागतात.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ]    ❂ सुभाषीत ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

26. *ज्ञानस्याभरणं क्षमा ।*
           ⭐अर्थ ::~
   क्षमा हे ज्ञानाचे भूषण होय.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ]    ❂ दिनविशेष ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

       🛡 *★26. मे ★* 🛡
🔻====●●●★●●●====🔻
★हा या वर्षातील १४६ वा (लीप वर्षातील १४७ वा) दिवस आहे.

     ~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
   🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९९९ : श्रीहरिकोटा येथून ’पी. एस. एल. व्ही. - सी. २’ या धृवीय उपग्रहवाहकाने भारताचा ’आय. एस. एस. पी. ४’ (ओशनसॅट), कोरियाचा किटसॅट व जर्मनीचा डी. एल. आर. - टबसॅट या तीन उपग्रहांना त्यांच्या कक्षेत यशस्वीरीत्या पोहोचवले. या उड्डाणाद्वारे भारताने प्रथमच उपग्रह प्रक्षेपणाची सेवा देणार्‍या जागतिक बाजारपेठेत प्रवेश केला.
●१९८९ : मुंबईजवळच्या ’न्हावा-शेवा’ बंदराचे उद्‍घाटन झाले.

   ~*★ जन्मदिवस / जयंती ★*~
   🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९४५ : विलासराव देशमुख – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि केंद्रीय अवजड उद्योग मंत्री
◆१९०६ : बेन्जामिन पिअरी पाल – आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भारतीय कृषी संशोधक, पद्मश्री, पद्मभूषण, तांबेरा रोगाला दाद न देणार्‍या व अधिक उत्पादन देणार्‍या गव्हाच्या जाती त्यांनी शोधून काढल्या.
◆१९०२ : सदाशिव अनंत शुक्ल ऊर्फ 'कुमुदबांधव' – नाटककार व साहित्यिक
◆१८८५ : राम गणेश गडकरी – नाटककार, कवी व विनोदी लेखक. ते ’गोविन्दाग्रज’ या टोपणनावाने कथालेखन करीत तर ’बाळकराम’ या नावाने विनोदी लेखन करीत.

      ~*★ मृत्यू / पुण्यतिथी ★*~
  🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००० : श्रीपाद वामन काळे – अर्थतज्ञ व लेखक, मराठी भाषेतील पहिल्या अर्थविषयक नियतकालिकाचे संपादक
●२००० : प्रभाकर शिरुर – चित्रकार
●१९०८ : मिर्झा गुलाम अहमद – अहमदिया पंथाचे संस्थापक
●१७०३ : सॅम्युअल पेपिस – विख्यात इंग्रजी रोजनिशीकार व कुशल प्रशासक
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
   💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व "मुख्य मराठी" बातम्या
 वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..

     https://goo.gl/8D33ox
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0६ ]    ❂ बोधकथा ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

26.  *❃❝ कृती महत्वाची ❞❃*
     ━━═•●◆●★◆★●◆●•═━━
     स्वामीजींच्या प्रवचनासाठी गावोगावहून लोक आले होते. स्वामीजी आपल्या श्रोत्यांना उत्तम उपदेश करत. या उपदेश सभेला ‘सत्संग‘ म्हणत. एकदा स्वामीजींना काही लोकांनी सत्संगासाठी निमंत्रित केल होत. दिवस थंडीचे होते. येणारे लोक शाली, स्वेटर घालून तसेच मफलर बांधून आले होते. त्यात काही काही उच्चभ्रू श्रीमंतही होते. मात्र, स्वामीजींचा वेश साधाच. अंगावर घाबळी पांघरलेली.
    एका मोठया प्रशस्त दिवाणखान्यात सभा सुरू झाली आधी एक भजन सुरू होते. मग स्वामीजींचा उपदेश. तेवढ्यात एक याचक त्या दिवाणखान्याच्या दाराशी आला. उघडाबंब थंडीने कुडकुडत, हातात कटोरा घेऊन उभा होता. दिनवाण्या मुद्रेने त्याने आत पाहिल. भजन सुरूच होत. स्वामीजी उठून त्या याचकाकडे गेले. आपल्या अंगावरची घाबळी त्याच्या अंगावर पांघरली आणि शिष्याला खूण केली. शिष्याने काही नाणी त्याच्या कटो-यात टाकली आणि मग तो गरीब याचक निघून गेला. हे सर्व दृष्य सर्वच लोक बघत होते. भजन संपलं.
     सत्संग सूत्रसंचालक म्हणाला, ‘आता स्वामीजी आपल्याला उपदेश करतील. आपले कान त्यासाठी आतुरले आहेत‘. पण स्वामीजी काही बोलेनात. बराच वेळ झाला तरी ते स्वस्थच बसून होते. श्रोत्यांमध्ये चुळबूळ सुरु झाली. अखेर सूत्रसंचालक म्हणाला, ‘स्वामीजी, आपण आम्हाला उपदेश देताय ना?‘
‘मी उपदेश दिला आहे,‘ स्वामीजी खणखणीत आवाजात म्हणाले.
’आपण काहीच बोलला नाहीत,‘ सुत्रसंचालक म्हणाला.
‘अस्स! म्हणजे तुम्हाला फक्त शब्दांचा उपदेश हवा आहे; कृती नको. त्या थंडीत कुडकुडणा-या माणसाची अवस्था तुमच्या ध्यानी नाही आली? मी केलेली कृती हाच माझा उपदेश!
सर्व श्रोते थक्क झाले.

      *🌀❝ तात्पर्य ❞ ::~*
   केवळ कोरड्या शब्दांपेक्षा कृती महत्वाची असते.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ] ❂ प्रेरणादायी विचार ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

26.  गरजं संपली की ​विसरणारे​ फार
    ​असतात​...
गरजं ​नसताना सुद्धा​ आपली.
   आठवण ​काढणारे​ खूप कमी ​असतात..!​

  "झाडांसारखे जगा; खुप मोठे व्हा
पण जीवन देणाऱ्या ‘मातीला‘
आणि प्रेम देणाऱ्या माणसांना
       कधी विसरु नका ..!!"
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ]   ❂ सामान्य ज्ञान ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

26. *✿ सामान्य ज्ञान प्रश्नावली ✿*
       ◑◑◑◆◑◑●★●◑◑◆◑◑◑
■ सर्वाधिक लोकसंख्येचे शहर?
👉 मुंबई

■ सर्वाधिक साक्षर असलेले राज्य?
👉 केरळ

■ सर्वांत मोठा धबधबा कोणता?
👉 गिरसप्पा धबधबा

■ सर्वांत जास्त उष्ण ठिकाण?
👉 गंगानगर ( राजस्थान )

■ सर्वांत लांब नदी कोणती?
👉 ब्रह्यमपुत्रा
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ] ❂थोरव्यक्ती परिचय ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

26. *❒ विलासराव देशमुख ❒* 
     ━━═•●◆●★◆★●◆●•═━━
●जन्म :~ २६ मे १९४५
●मृत्यू :~ १४ ऑगस्ट २०१२

◆जन्मगावः बाभळगाव, लातूर
◆शिक्षणः बीएससी, बीए, एलएलबी

 ★ विलासराव दगडोजीराव देशमुख
    हे मराठी, भारतीय राजकारणी होते. इ.स. १९७४ साली बाभळगाव ग्रामपंचायत च्या सरपंच पदापासून आपली राजकीय कारकीर्द सुरू करणारे विलासराव १८ ऑक्टोबर, इ.स. १९९९ ते १६ जानेवारी, इ.स. २००३ व १ नोव्हेंबर, इ.स. २००४ ते ४ डिसेंबर, इ.स. २००८ या कालखंडांदरम्यान ते दोन वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. ते मनमोहनसिंग मंत्रिमंडळात अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम खात्याचे केंद्रीय मंत्री होते. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सदस्य होते. हिंदी चित्रपटांतील अभिनेता रितेश देशमुख हा त्यांचा पुत्र आहे.

       ◆ कारकीर्द :~
   विलासराव देशमुखांनी पुणे विद्यापीठातून बीएससी आणि नंतर कायद्याची पदवी घेतली. वयाच्या एकोणतिसाव्या वर्षी म्हणजे इ.स. १९७४ मध्ये ते बाभळगावचे सरपंच झाले. विलासराव देशमुख यांनी वयाच्या एकोणतिसाव्या वर्षी म्हणजे इ.स. १९७४ मध्ये बागूळगांवचे सरपंच म्हणून राजकीय कारकीर्दीस सुरूवात केली. युवक काँग्रेसचे नेते, तेव्हाच्या एकत्रित उस्मानाबाद बँकेचे संचालक, पंचायत समितीचा उपसभापती, जिल्हा परिषद सदस्य असे करीत करीत ते इ.स. १९८० मध्ये पहिल्यांदा विधानसभेवर निवडून गेले. १९७४ ते १९८० दरम्यान त्यांनी लातूर पंचायत समितीच्या उपाध्यक्षपदाचा कार्यभार सांभाळला. उस्मानाबाद जिल्हा युवक कॉंग्रेस अध्यक्षपदाच्या कार्यकाळात त्यांनी पंचसूत्री कार्यक्रम राबवण्याचा प्रयत्न केला. जिल्ह्यातील तरूणांना कॉंग्रेसच्या झेंड्याखाली संघटीत करून ते कॉंग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष झाले.

    इ.स. १९८२ मध्ये बाबासाहेब भोसले यांनी त्यांना पहिल्यांदा राज्यमंत्रिपद दिले. आमदारकीच्या पहिल्याच टर्ममध्ये अवघ्या दोन वर्षात मंत्रिपद मिळालेल्या विलासरावांनी नंतर मागे वळून पाहिले नाही. पुढे इ.स. १९९५ पर्यंत काँग्रेसचे अनेक मुख्यमंत्री झाले. पण विलासराव सदैव मंत्रिमंडळात राहिले. शिक्षण, कृषि, उद्योग, सांस्कृतिक, महसूल अशा अनेक महत्त्वाच्या खात्यांचा कारभार त्यांनी कार्यक्षमपणे केला.
यानंतर त्यांनी राज्याच्या राजकारणात पाय रोवण्यास सुरूवात केली. १९८० ते १९९५ पर्यंत ते सलग तीनदा आमदार म्हणून राज्य विधानसभेवर निवडून गेले. या कालावधीत त्यांनी गृह, सार्वजनिक प्रशासन, सहकार, उद्योग, ग्रामीण विकास, शिक्षण, तंत्रशिक्षण आणि क्रिडा व युवक-कल्याण मंत्रालयांचा कार्यभार सांभाळला.

   १९९५ मध्ये ते त्यांच्याच मतदारसंघात पराभूत झाल्याने त्यांच्या राजकीय कारकीर्दीवर प्रश्चचिन्ह निर्माण झाले. त्यांच्यासमोरील राजकीय अस्तित्वाचे हे मोठे आव्हान होते. मात्र १९९९ ते परत विधानसभेवर निवडून आले आणि त्यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडली. १८ ऑक्टोबरला ते मुख्यमंत्रीपदावर आरूढ झाले. दरम्यान राज्यातील राजकीय घडामोडींमुळे १७ जानेवारी २००३ मध्ये त्यांना मुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हावे लागले आणि सुशिलकुमार शिंदे मुख्यमंत्री बनले.

    ऑक्टोबर २००४ मध्ये राज्यात विधानसभा निवडणूकीनंतर नोव्हेंबर महिन्यात देशमुख दुसर्‍यांदा मुख्यमंत्री बनले. मात्र २००८ मधील मुंबई हल्ल्यानंतर वादात सापडलेल्या विलासरावांना नोव्हेंबर महिन्यात मुख्यमंत्रीपद सोडावे लागले. पक्षश्रेष्ठींना त्यांना राज्याच्या राजकारणातून केंद्रात कार्यरत करण्याचा निर्णय घेतला. ते राज्यसभेवर निवडून आले आणि २००९ मध्ये त्यांना अवजड उद्योग मंत्रालय देण्यात आले. यानंतर ग्रामीण विकास मंत्रालयाचा कार्यभार त्यांना सोपवण्यात आला.

    ते पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळात केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाचा कार्यभार सांभाळत होते. विलासराव देशमुख हे निव्वळ राजकारणी नव्हते. वडिल दगडोजी यांच्याकडून शास्त्रीय संगीताच्या उत्तम जाणकारीचा वारसा त्यांना लाभला होता. मराठी पुस्तकं असोत की नाटकं त्यांचे ते उत्तम भोक्ते रसिक होते. त्यांचं लावणीचं प्रेमही असंच रसिक होतं. त्यामुळे सर्वच कलाकाऱांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. बहुरंगी आणि बहुश्रुत व्यक्तिमत्वामुळे त्यांचं वक्तृत्व हेही प्रसन्न आणि उमदं होतं.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹🔅✹★✹◑◎●••
            *✍संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
   ♦📱 7875840444 ♦
 *✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❃❂❃█║▌║█║▌

*◆ शनिवार ~ 26/05/2018 ◆*
*⋐⋑⛯⋐⋑⋐ MSP ⋑⋐⋑⛯⋐⋑*

No comments:

Post a Comment