"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

🛡 ★ 26. मार्च ★ 🛡

🔻====●●●★●●●====🔻
★ जागतिक संगीतोपचार दिन
★ हा या वर्षातील ८५ वा (लीप वर्षातील ८६ वा) दिवस आहे.
★ बांगलादेशचा स्वातंत्र्यदिन
   
                        ~*🔺महत्त्वाच्या घटना 🔺*~
                       🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२०१३ : त्रिपूरा उच्‍च न्यायालयाची स्थापना
●२००० : ब्लादिमिर पुतिन यांची रशियाच्या अध्यक्षपदी निवड झाली.
●१९७४ : गढवालमधील हेनवलघाटी येथे गौरा देवी यांच्या नेतृत्त्वाखाली ’चिपको’ आंदोलनाची सुरूवात.
●१९७२ : नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे पहिल्या जागतिक संस्कृत परिषदेस सुरूवात झाली.
●१९४२ : इंदिरा नेहरू व फिरोझ गांधी यांचा विवाह
●१९१० : लक्ष्मणराव किर्लोस्कर यांनी औंध संस्थानातील कुंडलच्या माळावर कारखाना उभारण्यास सुरूवात केली. हा परिसर पुढे किर्लोस्करवाडी म्हणून ऒळखला जाऊ लागला.
●१९०२ : नेमस्त पक्षाचे अध्वर्यू नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांचे मध्यवर्ती कायदेमंडळात अर्थसंकल्पावर पहिले भाषण झाले. या प्रभावी भाषणामुळे त्यांचे कर्तृत्व व नेतृत्व देशमान्य झाले.
●१५५२ : गुरू अमर दास शिखांचे तिसरे गुरू बनले.

                       ~*★जन्मदिवस / जयंती★*~
                        🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९८५ : प्रॉस्पर उत्सेया – झिम्बाब्वेचा क्रिकेट खेळाडू
◆१९०९ : बाळकृष्ण दत्तात्रेय तथा बा. द. सातोस्कर – साहित्यिक, संशोधक, ’दैनिक गोमंतक’चे पहिले संपादक
◆१९०७ : महादेवी वर्मा – हिन्दी कवयित्री, स्वातंत्र्यसैनिक, शिक्षणतज्ञ, प्रयाग महिला विद्यापीठाच्या प्राचार्या व कुलगुरू, ’यामा’ या काव्यसंग्रहासाठी त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार देण्यात आला. (मृत्यू: ११ सप्टेंबर १९८७)
◆१८७५ : सिंगमन र्‍ही – दक्षिण कोरियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष


                          ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
                        🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२०१२ : माणिकराव गोडघाटे ऊर्फ ’ग्रेस’ – प्रसिद्धीपराङमुख गीतकार व कवी (जन्म: १० मे १९४०)
●२००८ : बाबुराव बागूल – दलित साहित्यिक
●२००३ : गुजरातचे मंत्री हरेन पंड्या यांची हत्या
●१९९९ : आनंद शंकर – प्रयोगशील संगीतकार
●१९९७ : नवलमल फिरोदिया – गांधीवादी, स्वातंत्र्यसैनिक आणि उद्योगपती
●१८२७ : लुडविग व्हान बीथोव्हेन या कर्णबधिर संगीतकाराचे निधन. मी स्वर्गात नक्‍कीच संगीत ऐकू शकेन, हे त्याचे अखेरचे शब्द होते. 

No comments:

Post a Comment